लार्ज व मिड कँप योजना

मोठ्या व मध्यम भांडवली कंपन्यामधील गुंतवणूक (Large & Midcap combination schemes)

 

या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नांवाप्रमाणेच मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. मोठ्या कंपन्याची वार्षीक सरासरी वाढ हि स्थीर असते, तसेच या कंपन्या बुडण्याची वा नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी म्हणजे जवळपास नसतेच. या कंपन्याच्या शेअर्स मधील गुंतवणूकीवर मिळणारा परतावाही स्थीर असतो. या कंपन्यांमधील गुंतवणूक तुलनेने कमी जोखीमीची असते. मध्यम आकाराच्या कंपन्यामधील गुंतवणूक हि तुलनेने जास्त जोखीमीची असते. हाय रिस्क – हाय रिटर्न या प्रकारात हि गुंतवणूक समजली जाते. गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर दिर्घ मुदतीत उत्तम परतावा मिळाल्याचे दिसते. शेअर बाजारात तेजी असताना अशा योजनेतून फार चांगला परतावा मिळतो व मंदी असताना नुकसानही होते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमीत दरमहा (एसआयपीव्दारे) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी मंदीवर मात करुन भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणूकीसाठी तुमचे उदिष्ठ किमान ७ वर्षे व शक्यतो १५ वर्षे असावे म्हणून शक्यतो आपल्या निवृत्तीपर्यंतची मुदत निवडावी, पैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुवीधा अशा योजनेत असते. तसेच दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवत नेणे जास्त फायदेशीर होते. गुंतवणूकीला जितक्या लवकर सुरुवात केली जाते तेवढा चक्रवाढीचा व रुपी कॉस्ट सरासरीचा अधीक फायदा मिळतो. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एसआयपी गुंतवणूक सुरु करावी. या योजनेत गुंतवणूक करुन भविष्यातील अनेक गरजा (लग्न, घर घेणे, गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरची तरतुद इ. अनेक गरजा) वेळच्या वेळी पुर्ण करणे सहज सुलभ होते.

Large & Mid Cap Schemes          
             
Name of the Scheme Date of Launch NAV as on 8 May 15 Returns since inception Total Amt. invested in SIP  Value of SIP of Rs.1000 PM  Online Investment
Axis Focussed 25   16.98 20.53 34000 45653 Invest Now
ICICI Prudential Dynamic Fund 31-Oct-02 188.07 26.41 150000 640311 Invest Now
Franklin India Opp Fund 10-Mar-04 55.24 18.15 134000 328609 Invest Now
TATA Equity Opp Fund 29-Mar-03 141.78 27.41 146000 470679 Invest Now

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
रोहन मोबाईल 8805025569 सदानंद 9422430302

पुढील भेटीची तारीख: १२ जून २०१७ 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०