आमच्या बाबत

"ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस" हि वित्तीय सेवा देणारी, नीतीने काम करणारी विश्वसनीय संस्था आहे. १) ठाकूर फायनान्शिल सर्व्हिसेस ची स्थापना सन २००० मध्ये झाली. मुख्यत्वेकरुन आम्ही म्युच्युअल फंडाचे वितरक म्हणून काम करतो. २) आम्ही नेहमीच नीतीने व प्रामाणिकपणे व्यवसाय करण्यावर भर देतो. ३) ग्राहकाचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे, त्यांचा विश्वास संपादन करणे, सतत संपर्क ठेवणे आणि विक्रीपश्चात सदैव सेवा देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. मी, सदानंद ठाकूर, "ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस" चा मालक असून मला म्युचुअल फंड व शेअर बाजार या क्षेत्राचा १५ वर्षांचा अनुभव आहे. या क्षेत्राशी निगडीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, एम.सी.एक्स., तसेच अनेक म्युचुअल फंड हाउसेस व्दारा आयोजित विविध कोर्सेस मी यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. या विषयासंबंधी वाचन व अभ्यास मी नेहमीच करत असतो. त्याच प्रमाणे मी म्युचुअल फंड व शेअर बाजारासंबंधी माहिती देणारे लेख मी या संकेतस्थळावर तसेच काही मासिकात व दैनिकात मधून मधून लिहित असतो. म्युचुअल फंड विकताना मी प्रत्येक व्यक्तीची गुंतवणुकीची गरज, उदिष्ठ, वय, जोखीम स्वीकारण्याची तयारी, कालावधी आदी बाबींबाबत त्या व्यक्तीशी सविस्तर चर्चा करून योग्य तीच योजना सुचवतो. हे करत असताना मी पूर्णपणे पारदर्शक व्यवहार करण्याला प्राधान्य देतो. आयसीआयसीआय सिक्युरिटीज बरोबर मी सब ब्रोकर (ए.पी.) म्हणून सलंग्न आहे. आमचे सोबत ३ इन १ खाते उघडल्यावर तुम्हाला आयसीआयसीआय बँके चे बचत खाते + आयसीआयसीआय सिक्युरिटीज चे ट्रेडिंग खाते + डीमॅटखाते तुम्हाला प्राप्त होईल. मी एच.डी.एफ.सी. लाईफ सोबत एजंट म्हणून काम करतो, मात्र मी फक्त टर्म इन्शुरन्स वय वर्षे ३५ पर्यंत चे व्यक्तीला सुचवत असतो. कमिशन मिळवण्यासाठी इन्शुरन्स मी विकत नाही. अपवादात्मक परिस्थितीत जर ४५ वर्षे वयापेक्षा जास्त वयाची व्यक्ती असेल व त्याला जर विम्याची जरुरीच असेल तर मी युलिप सुचवतो. मी विकत असलेली सर्वच आर्थिक उत्पादने विकत असताना मी ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा व सुविधा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. गुंतवणुकीचा मागोवा घेण्यासाठी मोबाईल अॅप, माझे संकेतस्थळावर लॉगीन करून पोर्टफोलिओ केव्हाही २४/७ पाहण्याची सुविधा देणे, सर्वच ऑनलाईन व्यवहारांसाठी एम.एफ.यु. चा प्लॅटफॉर्म वापरण्यास देणे आदी सुविधा मी देत असतो. याचप्रमाणे गुंतवणूक करण्यापूर्वी तसेच गुंतवणूक करून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्ही माझेशी मोबाईलवर चर्चा करू शकता. मी या व्यवसायात येण्यापूर्वी कर सल्लागार म्हणून सुमारे १७ वर्षे काम करत होतो. माझे पश्चात माझा मुलगा ज्याने फायनान्समध्ये एम.बी.ए. केलेले आहे तो त्याचे पत्नीसोबत, जी सी.एस. फायनल करत आहे, हा व्यवसाय पुढे चालू ठेवेल.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 17th & 18th November, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 1st & 2nd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838