संपत्ती निर्माण करण्यासाठी कर बचत योजना

संपत्ती निर्माण करण्यासाठी कर बचत योजना (ELSS)

म्युच्युअल फंडाच्या कर बचत योजनेत शेअर बाजारातील गुंतवणूक असल्यामुलेश या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करणे शक्य होते.

एक प्रश्न वारंवार विचारला जातो कि अशी कोणती बचत योजना आहे कि ज्यातून निश्चितपणे जास्त उत्पन्न मिळवता येईल.  उत्तर सोपे आहे कि तुम्ही नियमित मासिक/त्रैमासिक/वार्षिक तत्वावर गुंतवणूक करत राहून चक्रवाढीचा फायदा मिळवून तुमचे उदिष्ट साध्य करू शकता. तुमची जशी जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल त्याप्रमाणे योग्य त्या साधनात गुंतवणूक करून तुम्ही हे साध्य करू शकता, मग तुम्ही जोखीम स्वीकारणारे आहात कि जोखीम तुम्हाला स्वीकारावयाची नाही यावर तुम्हाला मिळणारा परतावा अवलंबून असेल. ज्यांना अजिबात जोखीम स्वीकारावयाची नसेल त्यांना जे जोखीम स्वीकारण्यास तयार असतील त्यांच्या पेक्षा जास्त काळ गुंतवणूक करावी लागेल, व ज्यांची  कॅल्क्युलेतेड जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल ते कमी वेळात त्यांचे उदिष्ट साध्य करू शकतील एवढाच फरक आहे.

आता हीच गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी आम्ही पब्लिक पॉव्हीडंड फंड (PPF), बीएसई चा टोटल रिटर्न  इंडेक्स व म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्या योजना या तीन गुंतवणूक योजना विचारात घेतल्या आहेत. आयकर कलम ८०-सी अंतर्गत गुंतवणुकीसाठी वार्षिक रु.१.५० लाख एवढी मर्यादा आहे म्हणून आम्ही असे गृहीत धरले आहे कि जर गेले २० वर्षे नियमितपणे दर वर्षी रु.१.५० लाख एवढी गुंतवणूक या तीन प्रकारात केली असती तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य काय असते म्हणजेच गेल्या २ दशकांचा विचार आम्ही येथे केला आहे.  याचे कारण म्हणजे गेल्या दोन दशकात शेअर बाजार विविध प्रकारचा  स्थित्यंतरातून गेलेला आहे ज्यामध्ये आहेत बाजारात झालेले प्रमुख चढ उतार, घोटाळे, जागतिक घटनांचे परिणाम व भारतातील घटनांचे परिणाम या सर्वाचा आर्थिक घडामोडीवर झालेला परिणाम विचारात घेतला आहे.

पहिला पर्याय अर्थात सुरक्षित गुंतवणूक पी पी एफ  यात दिसते कि गेले २० वर्षे दर वर्षी जर रु.१.५० प्रमाणे एकूण रु.३० लाखाची गुंतवणूक या योजनते केली असती तर २० वर्षांनी, व्याज दरातील फरक होऊनही या गुंतवणुकीचे मूल्य असते रु.८२.१४ लाख म्हणजेच वार्षिक परतावा झाला ९.५९%

PPF

आता दुसरा  पर्याय जर आपण सेन्सेक फंडात  गेले २० वर्षे दर वर्षी जर रु.१.५० प्रमाणे एकूण रु.३० लाखाची गुंतवणूक या योजनते केली असती तर २० वर्षांनी, या गुंतवणुकीचे मूल्य असते रु.१ कोटी ४२ लाख म्हणजेच वार्षिक परतावा झाला १४.३८% या कालखंडात सेन्सेक्स २५३९ ते २७००० पर्यंत वाढला पण २००८ मध्ये तो २१००० पर्यंत वाढून नंतर तो ८००० पर्यंत आपटला होता परत तेथून उसळी घेऊन तो आता जवळपास २९००० झाला आहे.

Sensex

आता तीसरा  पर्याय जर आपण म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्या योजनेत  गेले २० वर्षे दर वर्षी जर रु.१.५० प्रमाणे एकूण रु.३० लाखाची गुंतवणूक या योजनते केली असती तर २० वर्षांनी, या गुंतवणुकीचे मूल्य असते रु.२  कोटी ७२  लाख म्हणजेच वार्षिक परतावा झाला १९.८१% या कालखंडात सेन्सेक्स २५३९ ते २७००० पर्यंत वाढला पण २००८ मध्ये तो २१००० पर्यंत वाढून नंतर तो ८००० पर्यंत आपटला होता परत तेथून उसळी घेऊन तो आता जवळपास २९००० झाला आहे. जर तुम्ही वार्षिक १.५० गुंतवणूक दर महा रु.१२,५००/- प्रमाणेही करू शकता. 

ELSS

आता वरील तिन्ही उदाहरणे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल कि म्युच्युअल फंडात नियमित दर महा गुंतवणूक करणे हे केव्हाही चांगलेच आहे दर महा नियमित गुंतवणूक केल्यामुळे सरासरी होते ज्यामुळे बाजार्तील चढ उतार हे आपल्या फायद्याचेच होतात. 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 17th & 18th November, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 1st & 2nd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838