Family Solutions

 

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):

 

 हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.

 

गेल्या २० ते २२ वर्षात या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर अत्यंत आकर्षक परतावा मिळालेला आहे जो कि वार्षिक २२% चक्रवाढ दराने मिळालेला आहे, मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक १५% दराने परतावा मिळेल असे समजून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी.  बाजारात ठरविक अंतराने मोठी तेजी व पाठोपाठ मोठी मंदी येत असते व हे चक्र अव्याहत चालूच असते.  या प्रकारे गुंतवणुक दीर्घ काळ करत राहिले असता बाजारातील जोखीम जवळपास नष्ट होऊन जाते. म्युचुअल फंडाचे जवळपास सर्वच योजनेत एस.आय.पी. करता येते, मात्र आपल्या जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार व किती काळ आपण गुंतवणूक करणार आहोत यानुसार योजना निवडावी.  तरुण व्यक्तीने शक्यतो मल्टी कॅप योजनेत व मिड कॅप योजनेत गुंतवणूक करावी, मध्यम वयाचे व्यक्तीने लार्ज कॅप योजनेत, बॅलन्सड योजनेत गुंतवणूक करावी, कर बचतीसाठी ELSS योजनेत एस.आय.पी. करावी. निरनिराळ्या योजनेतील मागील कामगिरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 


ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 7th & 8th July, 2018 (Saturday & Sunday)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th & 29th July, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

Language
English

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838