फंड कसा निवडावा

स्वतःसाठी योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा

प्रथमतः तुम्ही स्वतःलाच खालील प्रश्न विचारा व त्यांची प्रामाणिक उत्तरे द्या

माझ्या वयात मी किती रुपयांची गुंतवणूक करावी? मी किती जोखीम पत्करू शकतो? दिर्घकाळीन फायद्यासाठी अल्पकालीन नुकसान झाले तर मी विचलित तर होणार नाही ना? मला किती काळानंतर गुंतवलेली रक्कम परत हवी? मला तत्काळ पैसे काढावे तर लागणार नाहीत ना? मी माझे पैसे किती काळ गुंतवून ठेवू शकतो? मला कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे का?

आता पुढील टप्पे पार पाडा

म्युच्युअल फंड कंपनीची निवड करा

म्युच्युअल फंड कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? तुम्ही कंपनीचे नांव ऐकले आहे काय? त्याने मागील काही वर्षात योजनेच व्यवस्थापन कसे केले आहे? योजनेची कामगिरी समान उद्दिष्टाचे योजनेच्या तुलनेत कशी आहे? सेवा कशी दिली जाते? कामकाजात पारदर्शकता आहे का? फंड वारंवार आणि योग्यप्रकारे कामगिरी जाहीर करतो काय? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक मिळाली तर त्या फंडाची निवड करावयास हरकत नाही.

मागील कामगिरी तपासा

ज्या योजनेला किमान ५ वर्ष झाली आहेत व जी सतत मार्केट पेक्षा जास्त परतावा देत असेल तरच तिची निवड करा. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना मागील कामगिरी हाच सर्वा महत्त्वाचा निकष असतो. आमचेशी फोन, व्हिडिओ कॉन्फ़रन्स, प्रत्यक्ष भेट अथवा ईमेल द्वारे संपर्क साधा.

योग्य गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या.

जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा चांगल्या डॉक्टर कडे जाता, जेव्हा तुम्हाला कायदेशीर सल्ला आवश्यक असतो तेव्हा प्रख्यात वकिलाकडे जाता त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करावयाची असते तेव्हा कोणाच्यातरी सांगण्यावरून अथवा स्वत:चे मानाने कोणत्यातरी योजनेत गुंतवणूक करण्यापेक्षा ज्या व्यक्तीला याबाबतीत चांगले समजते अश्या गुंतवणूक मार्गदर्शकाची तुम्ही जर मदत घेतलीत तर तुमचाच फायदा होईल.

आम्ही तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन व योग्य साधनाची निवड करण्यास मदत करतो. अधिक माहितीसाठी इमेल अथवा मोबाईलवर संपर्क करा.

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 29th & 30th June, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 23rd & 24th June, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838