गुंतवणूकदारांचे माहितीसाठी

केवळ गुंतवणूकदारांचे माहिती व मार्गदर्शनासाठी.

आपण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करु इच्छित असल्यास कोठेही गुंतवणूक करण्या पुर्वी हे अवश्य वाचा.

गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी:

1)      स्वकष्टाने मिळविलेला पैसा गुंतवताना तो जेथे गुंतवला जाणार आहे त्याची परीपुर्ण माहिती करुन घ्या.

2)      जी व्यक्ती तुम्हाला एखादे गुंतवणूक साधन विकावयास येते तेव्हा त्याची पार्श्वभूमी समजाऊन घ्या, तो हे काम पुर्ण वेळ करतो कि अर्धवेळ करतो आहे.

3)      गुंतवणूक करणे हे तुमचे फायद्याचे आहे कि ते विकावयास आलेल्या व्यक्तीचे फायद्यासाठी तो तुम्हाला सुचवत आहे हे पडताळून पहा.  तो फक्त त्या साधनाचे चांगल्या बाजुचीच माहिती देत असेल व त्यातील जोखमीची जर पूर्ण माहिती देत नसेल तर सावधान व्हा.

 

4)      तुम्ही गुंतवत असलेल्या रकमेतून किती रक्कम वजा केली जाते हे तपासून पहा.  ज्या साधनात गुंतवणूकीचे रकमेतून मुळातच कपात केली जाते अश्या कोणत्याही साधनात गुंतवणूक करू नका त्यात तुमचेच नुकसान व ते विकावयास आलेल्या प्रतीनिधीचाच फक्त लाभ असतो.

5)      बाजारात येणा-या नविन योजनेच्या मोहात पडू नका, यांत तुमचेच नुकसान होण्याची शक्यता अधिक.

6)      जीवन विमा हा प्रत्येक व्यक्तीलाच अत्यावश्यक आहे मात्र जीवन विमा हे बचतीचे किंवा गुंतवणूकीचे साधन होऊच शकत नाही.  गुंतवणूकीसाठी बाजारात अनेक पर्याय आहेत, त्यांची माहिती करून घेऊन अशा साधनात गुंतवणूक करावी.  जीवन विमा हा फक्त टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा व गुंतवणूक हि फक्त गुंतवणूक साधनातच करावी.

7)       विमा प्रतीनिधी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा तो त्याला टर्म इंशुरन्सबद्दल माहिती देण्यास सांगा ह्यात तो टाळाटाळ करू लागला तर, एक तर त्याचे ज्ञान तोकडे आहे किंवा तो स्वत:चे कमीशनचाच विचार करतो आहे हे पक्के लक्षात घ्या.

 

8)      शेअर बाजाराचे त्रोटक ज्ञान किंवा दुस-याने दिलेल्या टिपस् आधारे शेअर बाजारात गुंतवणूक/ट्रेडिंग करुन नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते, त्यापेंक्षा म्युचअल फंडात दिर्घ मुदतीसाठी पण नियमीतपणे थोडी-थोडी का होईना गुंतवणूक केल्यास चांगला नफा होण्याचीच शक्यता असते.

युलिप व म्युचअल फंड तुलना

म्युचल फंड गुंतवणूकीचे माध्यम

युलिप (Unit Link Insurance Plan)

म्युचल फंड हे पूर्णतः गुंतवणूकीचे साधन आहे

ULIP हे इंशुरन्स कंपन्याचे प्रॉडक्ट आहे

म्युचल फंडाला एंट्री लोड अजीबात नसतो त्यामुळे सर्व रक्कम गुंतवणूकिला जाते

युलिप मध्ये पहिल्या वर्षी एंट्री चार्जेस २% ते १०% एवढे भारी असतात

याव्यतरीक्त दरवर्षी सुमाशरे ७% आकार पडतो

नंतर कितीही वेळा गुंतवणूक केली तरी वरिल प्रमा़णेच एंट्री लोड लागत नाही व सर्व रक्कम गुंतवणूकिला जाते.

युलिप मध्ये दुस-या  वर्षापासून ०% ते ४% एवढे असतात. याव्यतरीक्त दरवर्षी सुमाशरे ७% आकार पडतो

एंजटला कमिशन 0.5% ते 0.75% एवढेच मिळते

एंजटला कमिशन ५% ते १०% एवढे मिळते

वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तर ३ -या वर्षी एकूण निव्वळ परतावा सुमारे 33% पेंक्षा जास्त होतो

वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तरI ३ -या वर्षी एकूण एकूण गुंतवणूकी एवढेसुध्दा गुंतवणूक मुल्या होत तर नाहीच पण गुंतवणूकदार नुकसानीतच असतो

गुंतवणूक म्हणूनच विकले जाते आणि गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय

इंशुरन्स प्रॉडक्ट असूनही गुंतवणूकदारांची दिशाभूल करुन एजंट लोकं हे गुंतवणूक प्रॉडक्ट म्हणूनच विकतात

गुंतवणूकदाराला फायदेशीर

गुंतवणूकदाराचे नुकसान व फक्त एजंट साठी फायदेशीर

गुंतवणूकदाराने यात गुंतवणूक करावी

जीवन विमा हा अत्यावश्यक आहे यात काहीच संशय नाही मात्र तो टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा

म्युचअल फंडात गुंतवणूकीचे फायदे:

 • गुंतवणूक करताना कोणताही आकार नसल्यामुळे संपूर्ण रक्कम गुंतवणूकीला जाते. वजावट शुन्य.
 • तज्ञांचे मार्गदर्शन
 • कमी जोखीम
 • आवश्यक तेव्हा केव्हाही पैसे काढून घेण्याची सुवीधा.
 • रोजचे रोज मुल्य समजते
 • कमीत कमी खर्च
 • पारदर्शकता
 • आयकर मुक्त परतावे
 • सेबी व अँफीचे नियंत्रण
 • आयकर कलम 80-सी खाली वजावट मिळणारे योजनेत गुंतवणूकीची सुविधा - यात 3 वर्ष पैसे मात्र काढता येत नाहीत.

 

म्युचअल फंडात गुंतवणूकीचे तोटे:

 • परतावे अनिश्चीत असतात.
 • शेअर बाजाराचे चढ उताराची जोखीम असते.
 • स्वत:ला नियंत्रण ठेवता येत नाही.
 • बाजार कोसळून नुकसान झाल्यास दिर्घ काळ थांबण्याची तयारी असावी लागते.
 • मागील कामगिरीचे आधारानेच गुंतवणूक करता येते.

 

 टर्म इंशुरन्स व म्युचअल फंड असे समीकरणाने गुंतवणूक केली तर पुढे काय होऊ शकते याचे काल्पनीक उदाहरण:

गुंतवणूक सुरु करताना वय

दर महा टर्म इंशुरन्स हप्ता

दर महा म्युचअल फंड गुंतवणूक

एकूण मासीक हप्ता

जीवन विमा मुदत वर्षे

मिळणारे जीवन विमा संरक्षण

गुंतवणूक काढून घेताना वय वर्ष

मिळणारे गुंतवणूक मुल्य

18

382

722

1104

30

25 लाख

48

50 लाख

19

391

722

1113

30

25 लाख

49

50 लाख

20

397

722

1119

30

25 लाख

50

50 लाख

21

411

722

1133

30

25 लाख

51

50 लाख

22

423

722

1145

30

25 लाख

52

50 लाख

23

436

722

1158

30

25 लाख

53

50 लाख

24

450

722

1172

30

25 लाख

54

50 लाख

25

466

722

1188

30

25 लाख

55

50 लाख

26

484

722

1206

30

25 लाख

56

50 लाख

27

505

722

1227

30

25 लाख

57

50 लाख

28

527

722

1249

30

25 लाख

58

50 लाख

29

552

3339

3891

30

25 लाख

59

50 लाख

30

582

3339

3921

30

25 लाख

60

50 लाख

31

618

3339

3957

30

25 लाख

61

50 लाख

32

662

3339

4001

30

25 लाख

62

50 लाख

33

709

3339

4048

30

25 लाख

63

50 लाख

34

762

3339

4101

30

25 लाख

64

50 लाख

35

821

3339

4160

30

25 लाख

65

50 लाख

36

773

3339

4112

25

25 लाख

61

50 लाख

37

837

3339

4176

25

25 लाख

62

50 लाख

38

907

3339

4246

25

25 लाख

63

50 लाख

39

985

3339

4324

25

25 लाख

64

50 लाख

40

1073

3339

4412

25

25 लाख

65

50 लाख

41

635

4000

4635

20

15 लाख

61

50 लाख

42

689

4000

4689

20

15 लाख

62

50 लाख

43

751

4000

4751

20

15 लाख

63

50 लाख

44

815

4000

4815

20

15 लाख

64

50 लाख

45

883

4000

4883

20

15 लाख

65

50 लाख

46

696

8000

8696

15

12 लाख

61

50 लाख

47

754

8000

8754

15

12 लाख

62

50 लाख

48

817

8000

8817

15

12 लाख

63

50 लाख

49

886

8000

8886

15

12 लाख

64

50 लाख

50

962

8000

8962

15

12 लाख

65

50 लाख

51

758

19500

20258

10

10 लाख

61

50 लाख

52

821

19500

20321

10

10 लाख

62

50 लाख

53

889

19500

20389

10

10 लाख

63

50 लाख

54

964

19500

20464

10

10 लाख

64

50 लाख

55

1047

19500

20547

10

10 लाख

65

50 लाख

56

 

29000

29000

0

0

61

25 लाख

57

 

29000

29000

0

0

62

25 लाख

58

 

29000

29000

0

0

63

25 लाख

59

 

29000

29000

0

0

64

25 लाख

60

 

29000

29000

0

0

65

25 लाख

 

वयाप्रमाणे जीवन विमा संरक्षण व मुदत यात यांत बदल केला आहे तसेच विमा हप्ता बदलला आहे.

वय वर्षे 18 त 55 पर्यंत मुदती अंती रुपये 50 लाख मिळावेत या दृष्टीने म्युचअल फंड गुंतवणूक 15% दराने करावयास हवी ती धरली आहे.

वय वर्षे 56 त 60 पर्यंत मुदती अंती रुपये 25 लाख मिळावेत या दृष्टीने म्युचअल फंड गुंतवणूक 15% दराने करावयास हवी ती धरली आहे.

हे फक्त उदाहरण आहे.  प्रत्यक्षात गुंतवणूकदाराचे गरजे नुसार व द.म. गुंतवणूकीचे क्षमतेनुसार बदल करावा लागेल.

म्युचअल फंडातून मिळणारा परतावा हा शेअर बाजाराचे चढ उतारावर अवलंबून असतो, सबब याकडे फक्त एक उदाहरण म्हणूनच पहावे.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838