MF Utility

म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी एम.एफ.युटीलिटी

खालील प्रश्नाचे उत्तर द्या.

१) तुम्हाला म्युचुअल फंड योजनेत प्रथमच गुंतवणूक कारवायाही आहे काय?

२) तुम्ही यापूर्वी आमचे मार्फत म्युचुअल फंडच्या योजनेत गुंतवणूक केली आहे काय?

३) तुम्ही या पूर्वी कोणत्याही माध्यमातून - बँक किंवा कोणत्याही म्युचुअल फंड वितरकाकडून गुंतवणूक केली आहे काय?

वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही एम.एफ.युटीलिटी, या सर्व प्रमुख म्युचुअल फंड कंपन्यांनी, म्युचुअल फंडात सुलभपणे व्यवहार करण्यासाठी सुरु केलेल्या, प्लॅटफॉर्म सोबत केवळ एकदाच नोंदणी करून नंतर केव्हाही तुमच्या सवडीनुसार तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकाल किंवा तुम्ही आमच्या ऑफिस मध्ये फोन करूनही व्यवहार करू शकाल. तुमच्या संमती शिवाय कोणताही व्यवहार पुरा होऊ शकत नाही. कोणत्याही म्युचुअल फंडाचे योजनेत नवीन एक रकमी गुंतवणूक कारणे, नवीन एस.आय.पी. सुरु कारणे, पैसे काढणे, पैसे एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग कारणे, पत्ता बदलणे, बँक बदलणे इ. सार्याच बाबी आपण एकदा का नोंदणी केली कि पेपरलेस करू शकता. फॉर्म भरावा लागत नाही, सही नको, चेक नको. सारे कसे सुलभपणे करता येते. तुम्ही गुंतवणुकीसाठी आमचा सल्लाही मोफत घेऊ शकता.

जर तुम्ही यापूर्वी कोणत्याही म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक केलेली असेल आणि जर का तुम्ही आमच्या मार्फत एकदाच नोंदणी केली तर तुम्हाला तुमच्या सर्व गुंतानुकीचा तपशील एकाच ठिकाणी पाहता येईल, यासाठी आम्ही तुम्हाला लॉगीन सुविधा उपलब्ध करून देऊ, त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा सारा तपशील पाहू शकालच याशिवाय सारे व्यवहार ऑनलाईन करता येतील, तुमचे अकाउंट स्टेटमेंट काढता येईल, आदि साऱ्या सुविधा तुम्हाला मिळतील.

आणखीन एक महत्वाचा फायदा म्हणजे, एकदा का नोंदणी केली कि, तुम्ही एम.एफ.यु. चे मोबाईल अॅप डाउनलोड करून तुमच्या मोबाईल चा वापर करून सारे व्यवहार, नवीन गुंतवणूक कारणे, पैसे काढणे, स्वीच कारणे, नवीन एस.आय.पी. करणे इ. सारे ऑनलाईन केव्हाही तुमच्या सवडीने, दिवसातील कोणत्याही वेळी व कोठूनही करू शकता. 

चला तर एकदाच नोंदणी प्रक्रिया करून घ्या, त्यासाठी खालील सारे फॉर्म व सूचना पत्रही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा, सूचना पत्राप्रमाणे सह्या करा, कागदपत्रे जोडा व आमचेकडे पाठवून द्या आणि निश्चिंत रहा. तुम्हाला सारे व्यवहार सुलभपणे करण्यासाठी एकच कॉमन अकाउंट मिळेल त्याचा वापर करून व्यवहार करता येतील. एकदा आमचे मार्फत नोंदणी झाल्यावर आम्ही तुमच्यासाठी लॉगीन तयार करू तुम्हाला एम.एफ.युटीलिटी कडून एक मेल येईल त्यातील लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वत:च तुमचा लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करा व तो वापरून सारे व्यवहार सुलभपणे केव्हाही दिवसातील कोणत्याही वेळी व जगातून कोठूनही तुमच्या सवडीनुसार करा.

डाउनलोड विभागातून आवश्यक ते फॉर्म डाउनलोड करून प्रिंट घ्या

सूचना पत्राप्रमाणे कृती करा.

फॉर्म कुरीअर किंवा पोस्टाने हवे आहेत काय?

तुम्हाला जर फॉर्म प्रिंट काढणे शक्य नसेल तर आम्ही ते तुम्हाला कुरिअर किंवा पोस्टाने पाठवून देऊ. ह्यामुळे जरी तुम्ही एखाद्या खेडेगावात रहात असलात व तुम्हाला म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावयाची असेल तर ती करणे तुम्हाला अगदी सुलभ होईल. यासाठी तुम्ही मला फक्त एक फोन करा किंवा WhatsApp वर मला तुमचा पत्ता कळवा. मोबाईल 9422430302.

एम.एफ.युटीलिटी सोबत एकदाच नोंदणी करून  मिळणारे लाभ खालीलप्रमाणे आहेत:

१)      तुमच्या PAN नंबर खाली तुम्ही कोठूनही केलेल्या गुंतवणुकीचा सर्वच तपशील तुम्ही २४/७ केव्हाही संगणक अथवा मोबाईलवर पाहू शकता.

२)      म्युचुअल फंडाचे कोणत्याही योजनेत नवीन गुंतवणूक करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, एस.टी.पी., एस.डब्ल्यू.पी. करणे या सुविधा तुम्ही ऑनलाईन कोणत्याही कागदपत्रांशिवाय करू शकता.

३)      एकाच वेळी अनेक योजनेत गुंतवणूक किंवा एस.आय.पी. करता येते.

४)      वेगवेगळ्या म्युचुअल फंडाचे वेबसाईटवर जाण्याची गरज नाही.

५)      तुम्ही एक किंवा अनेक बँका एकदाच रजिस्टर करून कोणत्याही बँक खात्यातून कोणतेही व्यवहार तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय करता येतील.

आमचा पत्ता:

THAKUR FINANCIAL SERVICES,
275, "Manisha", Near ICICI Bank, Kaviltali,
Chiplun-415605, Dist: Ratnagiri.
Tel: 02355-251089 Mobile: 9422430302
Email: tfscontactus@gmail.com

तुम्हाला कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास संपर्क करा.

Comments

Submitted by Sadanand on 23/Mar/2017 - 12:44 PM

Permalink

तुम्ही येथे तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. योग्य प्रतिक्रिया येथे प्रसिद्ध केल्या जातील. 

प्रतिक्रिया नोंदवताना कृपया सभ्यतेचे पालन करा. असभ्य भाषेतील असू नये किंवा  तुमच्या उत्पादनाची जाहिरात करू नये, ती तशी असल्यास डिलीट केली जाईल.

प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगीन कारणे अत्यावश्यक आहे.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838