अनिवासी भारतीय

अनिवाशी भारतीय NRI's व म्युचल फंड गुंतवणूकः

अनिवाशी भारतीयांची म्युचल फंडातिल गुंतवणूक नियमितपणे वाढत आहेः

भारताचे आर्थिक विकासात भारतात रहाणारे भारतीय नागरिकांचा सहभाग तर आहेच पण परदेशात रहाणारे भारतीयांचा सुध्दा यात भरीवं वाटा आहे.  म्युचल फंडात परदेशात रहाणारे भारतीयांची गुंतवणूक नियमितपणे वाढतच आहे.  रिझर्व्ह बॅकेने जाहिर केलेल्या तपशिलानुसार परदेशी रहाणारे भारतीयांची म्युचल फंडातिल गुंतवणूक २००३ साली रु.१०२८ कोटी होती ती २००४ साली रु.२६६३ कोटी झाली व २००५ साली रु.४९६६ कोटी झाली. 

परदेशी रहाणारे भारतीयांनी म्युचल फंडात गुंतवणूक का करावी? 

 • भारतीय अर्थव्यवस्था हि जगात अत्यंत वेगाने पुढे जात आहे हे सर्वमान्य सत्य आहे. 
 • परकिय गुंतवणूकदार नियमितपणे भारतिय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करित आहेत. 
 • अनेक सेझ मंजूर झाले आहेत व भविष्यात ते कार्यरत होतिल. 
 • येत्या ५ ते ७ वर्षात पायाभूत सुविधा विभागात जसे की पॉवर, रस्ते, धरणे, पाणी योजना, टेलिकम्युनिकेशन इ अनेक उद्योग धंद्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्याचे सरकारी व योजना आयोगाचे निर्णय झाले आहेत. 
 • सर्वच विभागात उद्योग धंद्याना पोषक वातावरण आहे. 
 • जीडिपी स्थीर आहे व पूढे वाढ अपेक्षीत आहे. 
 • काम करणा-या भारतीयांचे सरासरी वय फक्त ३५ आहे. 
 • सद्या देशातील एकूण गुंतवणुकीपैकी नगण्य म्हणजे 7 टक्के पेक्षा कमी गुंतवणूक म्युचल फंडात आहे. 
 • उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे. 
 • शेती व शेतीला पूरक उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे. 
 • अनेक परदेशी कंपन्यांचे काम भारतीय कंपन्या करत आहेत. 
 • भारतीय शेअर बाजार अद्यावत आहे व त्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत. 
 • भारतीय अर्थसंस्था व उद्योगधंद्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत. 

अनिवाशी भारतीय म्हणजे कोण? 

भारतिय नागरिक किंवा भारतिय वंशाच्या व्यक्ति जे परदेशात शिक्षण नोकरी किंवा धंद्यासाठी रहातात त्याना परदेशस्थ भारतीय म्हणून ओळखले जाते. 

अनिवाशी भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक करु शकतात काय? 

होय करु शकतात. 

अनिवाशी भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक कशी करु शकतात? 

भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक करण्यासाठी  परदेशी भारतीयाना खालिल तीन प्रकारातील कोणत्याहि एका प्रकारचे खाते, ज्या बॅंका अशी सुविधा पुरवतात अशा कोणत्याही बॅंकेत, खाते उघडावे लागतेः 

 

 • नॉन रेसिडंट (एक्स्टर्नल) रुपी (एनआरइ) खाते ज्यात भारतीय रुपयात तसेच परदेशी चलनातही पैसे भरता येतात व काढताही येतात व परदेशात नेताही येतात. 
 • आर्डिनरि नॉन रेसिडंट रुपी (एनआरओ) खाते ज्यात भारतीय रुपयात तसेच परदेशी चलनातही पैसे भरता येतात मात्र परदेशी चलनात काढता येत नाहित व परदेशात नेताही येत नाहीत.
 • फूल्ली कन्वर्टीबल नॉन रुपी (एफएनसीआर) खाते हे एनआरइ खात्यासारखेच असते मात्र यातील शिल्लक हि परदेशी चलनातच खात्यात शिल्लक रहाते.< >एनआरइ खात्यावरिल चेक द्वारा रुपयांमधे किंवा अमेरिकन डॉलरमधे त्यावेळच्या विनिमय दरानुसार अदा केले जातात रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाअधीन जर गुंतणूक परदेशी चलनात परत नेण्याचे सुचनेनुसार गुंतविली असेल तरच अमेरिकन डॉलरमधे पैसे परत केले जातात. जर गुंतवणूक एनआरओ खात्यातून केली असेल तर एनआरओ खात्यावरिल भारतीय रुपयात रक्कम परत केली जाते. पैसे परत करताना टिडिएस वजा करुन सर्टिफिकेट सोबत परत केले जातात. परदेशी चलनात पैसे नेण्याच्या सुविधेने गुंतवणूक केली असेल तर ३०% कॅपिटल गेन टॅक्स वजा केलेली रक्कम नेता येते. 
 • तसेच परदेशी चलनात पैसे नेण्याच्या सुविधेने गुंतवणूक केली असेल तर टॅक्स पश्चात डिव्हीडंडची रक्कमही नेता येते. 

अनिवाशी भारतीयाना म्युचल फंडात गुंतवणूक करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेणे आवश्यक आहे का? 

बहूतेक भारतिय म्युचल फंड कंपन्यानी त्यांचे योजनेमधे परदेशात रहाणारे भारतीयांनी गुंतवणूक करण्यासाठी आधीच रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेवुन ठेवलेली असल्यामुळे अशी परवानगी त्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी घ्यावी लागत नाही. 

परदेशी चलनात अशी गुंतवणूक करता येते काय? 

नाही.  भारतीय रुपयातच करावी लागते.   एनआरइ खात्यातून अशी गुंतवणूक करणे उत्तम असते. 

पैसे कसे काढता येतात?

ओपन-एंडेड स्किममधून पैसे काढण्यासाठी रिडमशन स्लीप एक तर सही करुन आमचेकडे पाठवा अथवा म्युचल फंड कंपनीचे इंव्हेस्टर सर्व्हिस सेंटर कडे पाठवावी.  सामान्यतः रिडमशन स्लीप मिळाल्या पासून ३ त ५ दिवसात चेक पाठविले जातात.

क्लोज-एंडेड स्किम असल्यास रिडमशन स्लीप नोंदणीकॄत स्टॉक एक्सचेंज वर विकावी लागते.

काढलेले पैसे कोणत्या स्वरुपात अदा केले जातात?

परदेशी चलनात पैसे नेता येतात काय?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान मधे गुंतवणूक करता येते काय?

होय करता येते.

गुंतवणूकीचे मुल्य कसे समजेल?

आमचे साइटवर लॉगीन करुन समजेल. तसेच www.amfiindia.com वर रोजचेरोज NAV जाहिर केली जाते.

टॅक्स बाबत

नातेवाईकाना युनिटस् बक्षीस देता येतात काय?

होय

इंडेक्सशेसन फायदा मिळतो काय?

होय. जर गुंतवणूक ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवली असेल तर.

शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती आहे?

व्यक्तिला कर रचने प्रमाणे.

या लेखाचे खाली दिलेले टेबल पहा.

अधिक जाणकारिसाठी तुमच्या कर सल्लागाराशी बोला.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 17th & 18th November, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 1st & 2nd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838