एक रकमी गुंतवणुक

 एकरकमी गुंवणूक कोणी करावी?

ज्याचेकडे सद्दस्थीतीत एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. अचानक धनलाभ झाला असता अतिरिक्त असणारी रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवावी. मात्र अशी गुंतवणूकीत बाजाराची जोखीम जास्त येते, यास्तव अशी गुंतवणूक करताना जी रक्कम आपणाला पुढील किमान 5 वर्षे तरी लागणार नाही एवढीच रक्कम गुंतवावी.  चांगला व अपेक्षी फायदा झाला झाला असता जास्त मोहाला बळी न पडता रक्कम काढून घ्यावी अथवा 15 ते 20 वर्ष विसरुन जाता आले पाहिजे.

एक रकमी गुंतवणूक करताना खालील पर्य़ायाचा विचार अवश्य करा जेणे करुन मुद्दल तर सुरक्षीत राहील व मुद्दलावर मिळणा-या परताव्यासंबधीत गुंतवणूकी परतीच शेअर बाजाराची जोखिम राहील. (खालील पैकीडिव्हीडंड ट्रान्सफर योजना हा पर्याय निवडून मासीक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करावी).

मासीक उत्पन्न योजना (Monthly Income Plan - MIP)

ज्यांना दरमहा करमुक्त उत्पन्न हवे आहे त्यांनी या प्रकारचे डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी.  या योजनेत सर्वसाधारणपणे 80% गुंतवणूक हि निश्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक प्रकारात जसे कि सरकारी कर्ज रोखे, कंपन्यांचे कर्ज रोखे, मनी मार्केट इ. प्रकारचे पेपर्समध्ये केली जाते, ज्याची मुदत 1 ते 7 वर्षे असते असेच पेपर्स गुंतवणूकीसाठी निवडले जातात, जेणेकरुन व्याजदराचे बदलाचा कमीत-कमी परिणाम होतो.  उर्वरीत 20% रक्कम हि समभाग व समभाग संबंधीत गुंतवणूक प्रकारात केली जाते.  या योजनेत गुंतवणूकदाराला गुंतवणूकीचे तिन पर्याय असतात:

1)      वृध्दी पर्याय: या पर्यायात गुंतवणूकीचे मुल्य बदलत जाते (शक्यातो वाढत जाते).  रक्कम हवी तेव्हा काढता येते.  यातून एक वर्षाचे आत रक्कम काढल्यास 0.25% ते 0.75% एवढा निर्गमन आकार आकारला जातो.  एक वर्षानंतर रक्कम काढल्यास संपुर्ण रक्कम दिली जाते. या योजेत ज्याना कमीतकमी जोखिम व चांगले व करमुक्त उत्पन्न हवे आहे अशानी गुंतवणूकीसाठी हा पर्याय निवडावा.

2)      डिव्हीडंड पेआऊट पर्याय: यामध्ये परत दोन प्रकार आहेत:

अ)   मासिक डिव्हीडंड - हा पर्याय स्विकारला असता दरमहा डिव्हीडंड दिला जातो.   प्रतीमहा मिळणारा डिव्हीडंड हा कमी जास्त होतो.  मिळणारा डिव्हीडंड हा करमुक्त असतो.

आ) नियमित दर महिना उत्पन्न हवे आहे काय?

तुम्ही निवृत्त झालेली व्यक्ती आहात काय? तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर नियमित दर महिना ठराविक दराने (मासिक सुमारे  १%+) करमुक्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा आहे काय? सन १९९८ पासून नियमित दर वर्षी लाभांश दिला जात आहे, जानेवारी २०१६ पासून तो दर महिना देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा  

इ) तिमाही डिव्हिडंड पर्याय- हा पर्याय स्विकारल्यास दर तिन महिन्यांनी डिव्हिडंड दिला जातो. मिळणारा डिव्हीडंड हा करमुक्त असतो.

ई)      डिव्हीडंड पुर्नगुंतवणूक योजना: या योजनेत जाहिर होणारा डिव्हीडंड हा पुन: याच योजनेत गुंतवला जातो व यातील परतावा हा करमुक्त असतो.

उ)      डिव्हीडंड ट्रान्सफर योजना: योजनेत जाहिर होणारा डिव्हीडंड हा समभाग संबधीत योजनेत वर्ग केला जातो.  ज्या व्यक्तीना आपले मुद्दल पर्णत: सुरक्षीत रहावे व त्याचबरोबर शेअर बाजाराची थोडी जोखिम स्विकारुन आपले भांडवलात आकर्षक वृध्दी व्हाही असे वाटते त्यांचे साठी हा पर्याय सर्वोत्तम आहे.   ज्या व्यक्ती एकदाच एक ठरावीक रक्कम गुंतवून हा पर्याय दिर्घ मुदतीसाठी निवडतात त्याना एसआयपी प्रमाणे उत्तम परतावा मिळाला आहे.

३) कॅपिटल अॅप्रीशिएशन सिस्टीमॅटीक ट्रान्सफर प्लान चा प्रभावीपणे वापर करून जोखीम फक्त व्याजापुर्ती मर्यादित ठेवता येते. अशाप्रकारे गुंतवणूक करून एस.आय.पी. चा फायदाही घेता येतो. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 17th & 18th November, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 1st & 2nd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838