मागिल कामगिरी

मागील कामगिरी निकषः

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना पुढे काय परतावा मिळेल हे माहीत नसतं आणि म्हणूनच मागील कामगिरी हा एकमेव उपयुक्त निकष समजला जातो. मागील कामगिरी तपासताना काय काळजी घ्यावीआपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट प्रथमतः ठरवावे. त्यानंतर आपले गुंतवणुकीचे उद्दिष्टाशी जुळणा-याच योजना विचारात घ्याव्यात. नंतर त्या सर्व योजनांची मागील कामगिरी तुलनात्मकदृष्ट्या तपासून घ्यावी. त्यानंतर एक किंवा जास्त योजनांची निवड करावी. 

 

उदा. तुमचे माहितीत दोन विद्यार्थी आहेत एक दहावीत शिकतो आहे, आजपर्यंत त्याने नियमित ९५% मार्क मिळवले आहेत, दुसऱ्या विद्यार्थाला नुकतेच शाळेत दाखल केले आहे, कोण दहावीत जास्त यशस्वी होईल, तुमचे तुम्हीच ठरवा.

मागील कामगिरी पाहताना योजनेच्या एन.ए.व्ही. ला फारसे महत्व देऊ नये, उलट समान काळात व समान प्रकारातील ज्या योजनेची एन.ए.व्ही. सर्वात जास्त वाढली आहे ती योजनाच सर्वोत्तम कामगिरी करणारी असते.  समजा एका योजनेची एन.ए.व्ही. रु.१८० आहे व दुसऱ्या योजनेची ती रु.१००० जर दोन्ही योजना एकाच प्रकारातील असतील व मार्केट जर काही ठराविक काळात २५% वाढले तर रु.१८० ची एन.ए.व्ही. रु.२२५ होईल व रु.१००० ची एन.ए.व्ही. रु.१२५० होईल.

 

तुमची गुंतवणुकीची योजना तुमचे गरजेनुसार निवडण्यासाठी शक्यतो आमची मदत घ्या त्यासाठी आम्हाला आवश्यक ती पूर्ण माहिती देऊन सहकार्य करा.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 11th & 12th Aug 2018 (Saturday & Sunday)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 4th & 5th Aug 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838