कर बचतीसाठी

आयकर कलम ८० सी खाली कर बचतीसाठी म्युच्युअल फंड योजना

म्युच्युअल फंडाचे Equity Link Savings Schemes (ELSS) अंतर्गत योजनेत गुंतवणूक (रु.एक लाख पन्नास हजारापर्यंत) केली असता ती आयकर कलम ८० सी खाली उत्पन्नातून वजावटीस पात्र असते ज्याद्वारे रु.४९,५००/- पर्यंत कर बचत करता येऊ शकते.

ह्या योजनेतील गुंतवणूक हि कंपन्यांचे समभागात दिर्घ मुदतीचे उद्देशाने गुंतवली जाते जेणेकरुन शेअर बाजाराचा दिर्घ मुदतीचे गुंतवणूकीमुळे संपत्ती निर्माण करण्याचे क्षमतेचा लाभही मिळू शकतो.  या योजनेत केलेली गुंतवणूक हि ३ वर्षे काढता येत नाही.  तीन वर्षानंतर केव्हाही संपूर्ण किंवा आवश्यक तेवढी रक्कम काढण्याची सुविधा असते व अशी काढलेली रक्कम हि पुर्णता करमुक्त असते.

 

सर्वसाधारणपणे अशा योजनेतील पैशांची गुंतवणूक हि मोठ्या, मध्यम व लहान अशा तिन्ही प्रकारातील कंपन्यांचे समभागात केली जाते. दिर्घ मुदतीत केलेल्या गुंतवणूकीसाठी हि योजना फारच चांगली असते. या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे दुहेरी फायदा होतो एक म्हणजे देय कराची बचत होते (कर बचत म्हणजे एक प्रकारे जास्त बचतीची संधी) व दुसरे म्हणजे गुंतवणूकीतून होणारी मुल्यवृध्दी हा होय.

या योजनेत सर्वसाधारणपणे दर वर्षी डिव्हिडंड दिला जातो (यासाठी डिव्हिडंड - पेआऊट हा ऑप्शन गुंतवणूक करताना घ्यावा लागतो) यामुळे नियमीत प्रॉफिट बुकिंगही होते व हि मिळणारी रक्कम परत अशाच योजनेत गुंतवून परत करबचतीचा लाभही घेता येतो. ह्या डिव्हिडंडचा नवीन गुंतवणूकदाराला सरासरी वार्षीक ८ ते १२ टक्के करमुक्त परतावा मिळतो, जो नंतर नंतर वाढतच जातो, ज्यानी १५ ते २० वर्षापुर्वी असा पर्याय स्विकारलेला होता त्याना आता साधारण वार्षीक डिव्हिडंड त्यांच्या मुळ गुंतवणूकीवर सरासरी ३० ते ६० टक्के एवढा दर वर्षी मिळत आहे.

कलम ८०-सी अंतर्गत उपलब्ध असणारे सर्वच गुंतवणुकीचे साधनात सर्वात कमी लॉक इन पिरीयड या योजनेतच आहे जो फक्त ३ वर्षे एवढाच आहे. तीन वर्षे सलग पैसे भरून नंतर याच योजनेतील पैसे काढून परत याच योजनेत गुंतवल्यास तीन वर्षानंतर तुम्हाला नवीन गुंतवणूक न करताही कर बचतीचा लाभ घेणे शक्य होऊ शकते.

प्रत्येक म्युच्युअल फंडाची अशी किमान एक तरी योजना असते.

या व्यतरिक्त रिटायरमेंट फंड योजनानाही हा कर बचतीचा लाभ आता मिळू लागला आहे.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 17th & 18th November, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 1st & 2nd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838