एस.आय.पी.

Systematic Investment Plan (SIP) म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक:

आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला हा एकच जन्म आहे. गुंतवणुकीचे निर्णय महत्त्वाचे आहेत आहेत कारण आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला त्या निर्णयांचीच मदत होते. Systematice Investment Plan (SIP)म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन दरमहा रुपये 500/- इतक्या कमी रकमेने सुरु करता येतो. म्हणूनच हि योजना म्हणजे काही कालावधीत संपत्ती निर्माण कारण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आर्थिक नियोजनाचे एक सर्वोत्तम साधन आहे.

Systematic Investment Plan (SIP) म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन हे एक गुंतवणुक तंत्र असून त्याद्वारे तुमच्या पसंतीच्या म्युचल फंड योजनांमधून लहान लहान रकमा गुंतवून तुम्हाला भविष्यासाठी तरतुद करता येते. या योजनेद्वारे खात्री होते की गुंतवणूकदाराची गुंतवणूक शिस्तबद्ध रीतीने होत राहील आणि त्यामुळे आपली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी तो योग्य मार्गावर राहील. शिवाय गु्तवणूकीसाठी आयुष्यात लवकर सुरुवात केल्याने दोन शक्तिशाली गुंतवणूक धोरणांचा लाभ घेता येतो : रुपयाच्या किंमतीची सरासरी आणि चक्रवाढीची शक्ति. त्यामुळे चलनवाढ आणि चढत्या किंमती अशी स्थिती असताना दीर्घकालीन गुंतवणूक क्षितीज तुम्हाला संपत्ती निर्माणासाठी आणि उद्याची तरतुद करण्यासाठी मदतच करील.

SIP चे फायदे:

1) गुंतवणुकीचा शिस्तबद्ध पर्याय.

2) रुपयाचे किंमतीचे सरासरीचा फायदा मिळतो.

3) साधी, सोपी, सोयीची आणि लक्ष ठेवण्यास सुलभ अशी योजना.

4) चक्रवाढीचे लाभ.

एक मात्र लक्षात ठेवा म्युचल फंडात पैसे गुंतवताना दीर्घ काळासाठीच करा. शॉर्ट टर्म मध्ये काहीही होऊ शकते पण दीर्घ मुदतीत फायदाच होतो. दीर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष. सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्याय निवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरून देणे. गुंतवणूक शक्यतो काही दशकांसाठीच नियमितपणे करावी.

दरवर्षी आपले पगाराचे किंवा व्यवसायातील उत्पन्न हे वाढतच असते म्हणून आपली एस.आय.पी.ची मासिक गुंतवणूक सुद्धा दरवर्षी १०% ते २५% या प्रमाणात वाढवावी. हल्ली बहुतांशी फंड हाउसेस स्टेप अप एस.आय.पी. हा पर्याय फॉर्म भरतानाच देत असतात ज्यात दर सहा महिन्यांनी अथवा वार्षिक रु.५०० किंवा पाचशेच्या पटीत आपली गुंतवणूक वाढवण्याची सुविधा देतात, याचा प्रत्येक नवीन एस.आय.पी. सुरु करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने वापर अवश्य करावा.

 

Click Here for HDFC SIP information in Marathi

 

 

 


 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Prathamesh 7276043165 
Sadanand 9518752605
पुढील भेटीची तारीख: 6th and 7th Jan 2018 (1st Saturday & Sunday of January, 2018)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 27th & 28th January, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०