शेअर बाजार कि म्यु.फंड

मी गुंतवणूक कोठे करावी - शेअर बाजारात की म्युच्युअल फंडात? खरोखरच हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

शेअर मार्केट जेव्हा पूर्णपणे तेजीत असते तेव्हा  जवळपास प्रत्येकालाच शेअर मार्केट मधून भरघोस नफा मिळतो. पण किती जणांनी तो खिशात घालतात? फारच थोडे. कारण आपण वेळीच नफ्यात असताना विक्री करत नाही. उगाचच एखाद्या शेअरच्या प्रेमात पडतो. आपल्याला वाटत की आपल्याला शेअर बाजारातलं बरंच काही कळत. पण खरंच काहो आपल्याला कळत? स्वतःलाच प्रामाणिकपणे विचारा उत्तर मिळेल.(आणि ज्यांना खरंच शेअर बाजारातील कळतं त्यांचेसाठी या साईटची गरजच नाही).आपल्याकडे पुरेसे रिसर्च नसते. मार्केट टायमिंग बरेच वेळा चुकत. अशी अनेक कारण असतात आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त जणांना नुकसानच होते. दुसरे म्हणजे केव्हातरी व कोणाच्याही सांगण्यावर विसंबून आपण शेअर बाजारात गुंतवणूक करतो, बहुतांशी वेळा चुकीच्या वेळी पैसे गुंतवतो किंवा गुंतवलेली रक्कम काढून घेतो. ज्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाते त्या कंपनीची तुम्हाला काही माहिती असते काय, ती काय उत्पादन करते, तिला किती फायदा होतो, पुढे किती ऑर्डर्स आहेत. कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत, त्यांचा पूर्वेतिहास काय आहे, हे तपासले जाते काय?

डे-ट्रेडिंग, फ्युचर्स व ऑपशन्स आणि कमोडीटी ट्रेडिंग - नकोरे बाबा - खरं म्हणजे अजिबात करू नये. तो एक जुगारच आहे. आणि जुगारात किती जणांना बरं पैसे मिळाले आहेत. मी तर वरील सर्व गोष्टी करून बसलो आहे. भरपूर नुकसान सोसले. शेवटी म्युच्युअल फंडच आपल्यासारख्या सामान्य लोकांना फार चांगला.  ज्यांनी एका चांगल्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत ग्रोथ ऑप्शनमध्ये डिसेंबर १९९५ पासून दरमहा रुपये एक हजार मात्र गुंतवले आहेत आज त्याची व्हॅल्यू 53 लाख रुपये आहे .

एक मात्र लक्षात ठेवा म्युच्युअल फंडाचे समभाग संबधीत योजनेत पैसे गुंवताना दीर्घ काळासाठीच गुंतवणूक करा. शॉर्ट टर्म मध्ये काहीही होवू शकते पण दीर्घ मुदतीत फायदाच होतो. दीर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष. सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्यायनिवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरून देणे.

 

मात्र जर आपणाला अल्प काळासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर म्युच्युअल फंडाचे कर्ज रोख्यांचे योजनेत (डेट फंड) गुंतवणूक करा.  यात अगदी २ दिवसापासून ते दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावी या योजनेत फक्त व्याज दराची व पत बदलाची जोखिम असल्यामुळे ती अत्यल्प असते.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 17th & 18th November, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 1st & 2nd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838