इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय

इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स - बँक ठेवींना सर्वोत्तम पर्याय

बँक ठेवींचे व्याज दर वार्षिक ७% पेक्षाही कमी झालेले आहेत. म्हणूनच बँक ठेवींना गुंतवणूक पर्याय आपण शोधलाच पाहिजे. म्युचुअल फंडाच्या इक्विटी सेव्हीग्स योजना या कमी जोखमीच्या असतात याचे कारण शा योजनेतील पैसे हे खालील प्रमाणे वेगवेगळ्या गुंतवणूक साधनात गुंतवले जातात व त्यामुळे जोखीम कमी का होते व बँक ठेवीपेक्षा जास्त लाभ कसा काय  होतो हे समजून घेता येईल.

१) शेअर बाजारातील तेजीचा जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी: बाजारात मंदी असताना फक्त १५% इतकी कमी रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते, मात्र जर बाजारात तेजी असेल तर त्याचा फायदा गुंतवणूकदाराला मिळावा म्हणून तेजीच्या काळात शेअरबाजारातील गुंतवणुकीची मर्यादा ४०% पर्यंत वाढवण्याची मुभा फंड मॅनेजरला असते, यामुळे तेजीच्या काळात जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो.

२) नियमित उत्पन्नासाठी: योजनेतील गुंतवणूकितून नियमितपणे उत्पन्न मिळावे म्हणून १०%ते ३५% रक्कम कर्जरोखे, कमर्शिअल पेपर्स इ. नियमित व निश्चित उत्पन्न (व्याज) देणाऱ्या साधनात केली जाते. तसेच २५% ते ७५% या प्रमाणात योजनेतील पैशांची गुंतवणूक हि आर्बीट्राजच्या संधीमध्ये केली जाते. जेव्हा एकाच शेअर्सची किंमत दोन वेगवेगळ्या एक्सचेंज वर वेगवेगळी असते किंवा जेव्हा वायदेबाजारातील किंमत हि रोखीच्या बाजारापेक्षा जास्त असते तेव्हा आर्बीट्राजच्या संधी निर्माण होते व यातून निश्चितपणे फायदाच होत असतो.  जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा हि गुंतवणूक कमी करून ती शेअर बाजारात वाढवली जाते व जेव्हा शेअर बाजारात मंदी किंवा जास्त चढ उतार असतात तेव्हा नियमित उत्पन्न देणाऱ्या साधनातील  गुंतवणूक वाढवली जाते.

३) कमीत कमी चढ उतार: आर्बीट्राजच्या संधी व निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातील गुंतवणुकीचा प्रभावीपणे वापर करून गुंतवणूक केली जात असल्यामुळे गुंतवणुकीच्या मूल्यात मोठ्या प्रमाणावर चढ उतार होत नाहीत. यामुळे शेअर बाजाराची जोखीम कमी केली जाते.

४) करमुक्त परतावे: ह्या प्रकारतील योजना या इक्विटी प्रकारात मोडत असल्यामुळे या योजनेतून मिळणारा परतावा हा एक वर्षानंतर पैसे काढल्यास करमुक्त असतो.

५) डायव्हर्सिफीकेशन: गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारच्या साधनात केली जात असल्यामुळे डायव्हर्सिफीकेशनचा फायदा मिळतो. या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूकीचे व्यवस्थापन शेअर बाजारातील परिस्थितीनुसार नियमितपणे केले जाते.

या प्रकारच्या योजनेतील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करताना खालीप्रमाणे काळजी घेतली जाते:

इक्विटी गुंतवणूक व्यवस्थापन:

  • अनेक वेगवेगळ्या कंपन्याचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.
  • जेथे संधी असेल त्याप्रमाणे मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या (Large Cap),  मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या (Mid Cap) किंवा लहान आकाराच्या कंपन्यांच्या (Small Cap) शेअर्समध्ये परिस्थितीनुसार गुंतवणूक केली जाते.

निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन:

  • कंपन्यांचे कर्जरोखे, सरकारी बँकांचे कर्जरोखे व भारत सरकारचे कर्जरोखे या निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवणूक केली जाते.
  • अशा कर्जरोख्यांची मुदत हि व्याज दराच्या परिस्थितीनुसार ठरवली जाते. सर्वसाधारणपणे अशा कर्जरोख्यांची सरासरी मुदत हि २ ते ३ वर्षे राहील अशी काळजी घेतली जाते, ज्यामुळे व्याज दरातील फरकाचा कमीतकमी परिणाम होऊ शकतो.

इक्विटी आर्बीट्राजचे व्यवस्थापन:

  • वायदा बाजारातील दर व रोखीच्या बाजारातील शेअर्सच्या दरातील फरकाचा फायदा मिळवणे हा उद्देश असतो.

इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स मध्ये किती काळासाठी गुंतवणूक केली पाहिजे?

इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स या प्रकारातील योजना या ओपन एन्डेड प्रकारात मोडत असल्यामुळे या योज्नेते केव्हाही गुंतवणूक करता येते व पैसे सुद्धा केव्हाही काढता येतात, मात्र गुंतवलेले पैसे एक वर्षाच्या आत काढल्यास १% निर्गमन आकार पडतो तसेच होणाऱ्या फायद्यावर अल्पकालीन फायद्यावरील कर आकारणीच्या दराने आयकर भरावा लागतो म्हणून या योजनेत गुंतवणूक करताना टी किमान ३६५ दिवसांच्यापेक्षा जास्त काळासाठी करावी, शक्यतो २ ते ३ वर्षांसाठी करणे जास्त चांगले.

इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स या प्रकारातील योजनेत कोणी गुंतवणूक करावी?

ज्या व्यक्तींना बँक ठेवींपेक्षा जास्त व्याज, तेही करमुक्त मिळावे असे वाटते व त्यासाठी अत्यल्प जोखीम स्वीकारण्याची ज्यांची तयारी असेल अश्या कोणत्याही व्यक्तीने या योजनेत गुंतवणूक करावी.

आपल्या गुंतवणुकीवर अंदाजे किती परतावा मिळू शकतो?

इक्विटी सेव्हीग्स स्कीम्स मध्ये गुंतवणूक करताना वार्षिक सरासरी ९% ते १०% करमुक्त परतावा मिळण्याच्या अपेक्षेने आपण गुंतवणूक करावी. अशा प्रकारच्या योजनेतून मिळालेला मागील परतावा खालील टेबलमध्ये आपण पाहू शकता.

Name of the Scheme Category Date of Launch

NAV 21/06/2018 Rs.

Value of Rs.1Lakh invested on launch Total SIP Invested @ 1000 PM Value of SIP Investment 1 Year Returns % 3 Year Returns % 5 Year Returns % 10 Year Returns % Returns since launch %
HDFC Equity Savings Fund Hybrid 17 Sep 2004 34.82 3,48,200 1,65,000

3,34,145

04.48 10.10 10.67 9.95 09.49
DSPBR Equity Savings Fund Hybrid 30 March 2016 12.27 1,22,700 27,000 29,096.20 06.28 - - - 09.63
KOTAK Equity Savings Fund Hybrid 12 Oct 2014 13.53 1,35,300 45,000 52,593 08.12 08.19 - - 08.55
RELIANCE Equity Savings Fund Hybrid 30 May 2015 12.56 1,25,600 37,000 41,891.10 05.69 07.57 - - 7.74
BIRL Equity Savings Fund Hybrid 28 Nov 2014  13.05  1,30,500 43,000 49,105.50 2.68 7.84 - - 7.75
SBI Equity Savings Fund Hybrid 25 May 2015 12.52 1,25,200 37,000 41,356.30 04.84 7.62 - - 7.58
L&T Equity Savings Fund Hybrid 25 Oct 2011 17.24  1,72,400 80,000 1,06,134 5.57 6.54 9.18 - 8.50

 

 

 

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 29th & 30th June, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 23rd & 24th June, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838