गुंतवणूक करा

तुम्हाला म्युचुअल फंडात गुंतवणूक करावयाची आहे काय? जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा. KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या. यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचारा. CAN (Common Account No.) Registration Form PayEezz Mandate Form KYC Form वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या: ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस २७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी. पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल. म्युचुअल फंड योजनेत तुम्ही एकाचे नावाने, दोन व्यक्तींचे अथवा तीन व्यक्तींचे नावाने गुंतवणूक करू शकता, फॉर्म वर सर्व गुंतवणूकदारांच्या सह्या आवश्यक असतात. एका पेक्षा जास्त व्यक्तींचे नावाने गुंतवणूक करताना प्रत्येकाची वेगवेगळी KYC करणे आवश्यक असते. PayEezz Mandate फॉर्म वर बँकेत ज्यांचे नावाने खाते असेल त्यांनीच सह्या करावयाच्या असतात. भविष्याचा विचार करता म्युचुअल फंड योजनेत शक्यतो २ किंवा ३ व्यक्तींचे नावाने गुंतवणूक करणे जास्त सोइचे असते यामुळे जर कोणाचा मृत्यु झाला तर युनिट्स उर्वरित गुंतवणूकदाराचे नावाने ट्रान्स्फर करणे सुलभ जाते. अशा वेळी Joint ऐवजी शक्यतो Any one or Survival हा पर्याय वापरावा ज्यामुळे कोणाही एकाचे सहीने जास्तची गुंतवणूक करता येते, पैसे एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करता येतात किंवा पैसे काढता येतात. अशा प्रकारे गुंतवणूक करताना बँक खातेही शक्यतो दोन किंवा तीन नावाने असेल तर जास्त सोईचे होते. गुंतवणूक आपण आपल्या अज्ञान मुलाचे नावाने सुद्धा करू शकता मात्र अशा वेळी मुलाचे पालकाचे नाव लिहावे लागते व PAN व आधार कार्ड हि पालकाचेच लागते, KYC सुद्धा पालकाचीच लागते. पैसे पालकाचे बँक खायातून भरता येतात. लहान मुलाचे बँक खाते काढून त्यातूनही व्यवहार करता येतात, मात्र हा पर्याय जर वापरावयाचा असेल तर मूळ १८ वर्षाचे होईपर्यंत पैसे काढू नयेत. सही वगैरे पालकाचीच लागते. आपण कोणासही वारस (जास्तीत जास्त ३ व्यक्ती) नेमू शकता. वारसाचे नावासमोरील शेवटचे कॉलम मध्ये वर्षाचे सहीसाठी जागा असते तेथे वारसाची सही घेणे अनिवार्य नसले तरी करून घेणे इष्ट होते. आपण वारस न नेमण्याचा पर्याय सुद्धा वापरू शकता (मात्र वारस नेमणे हे केव्हाही चांगले). म्युचुअल फंडात आमचे मार्फत एम.एफ. युटीलिटी मार्फत केली तर गुंतवणूक करणारे व्यक्ती ला अनेक फायदे होतात, एकच फॉर्म CAN (Common Account No.) Registration Form भरून देऊन कोणत्याही म्युचुअल फंड कंपनीत कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता येते. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते क्रमांक मिळतो. आपण एकाच वेळी अनेक योजनेत एस.आय.पी. करू शकता. एकदाच फॉर्म भरावा लागतो प्रत्येकवेळी फॉर्म भरण्याची जरुरी नसते. तुमच्या बँक खात्यात पैसे असताना केव्हाही तुम्ही मला फक्त फोन करून गुंतवणूक करू शकता, खात्री करून घेण्यासाठी तुम्हाला फोन येईल तुम्ही होकार दिल्यावर पैसे तुमच्या बँक खात्यातून वळते करून घेतले जातील व गुंतवणूक केली जाईल. पैसे काढतानाही वरीलप्रमाणेच केले जाऊ शकते. ऑनलाइन सारे व्यवहार करता येतील, यासाठी आम्ही तुम्हाला लॉगीन तपशील कळवू. सर्वच गुंतवणुकीचा तपशील एकाच ठिकाणी पाहता येतो. इमेल, टेलिफोन, पत्ता इ. काही बदल करावयाचे असल्यास सोईचे होते, प्रत्येक म्युचुअल फंडात वेगवेगळे कळवावे लागत नाही. आमचे मार्फत गुंतवणूक करण्याचे फायदे: २४/७ तपशील पाहण्याची सुविधा. मोबाईल App दिले जाते. ऑनलाइन सारे व्यवहार करण्याची सुविधा. गुंतवणुकीसाठी योग्य तेच मार्गदर्शन केले जाते. योजने ची सर्व माहिती दिली जाते, ज्यामुळे सारे फायदे तोटे, जोखीम आदीची माहिती दिली जाते. तुमचे वय, व्यवसाय/नोकरी, उत्पन्न, कर्ज, जबाबदाऱ्या, जोखीम घेण्याची क्षमता आदी बाबी विचारात घेऊनच आम्ही आपणास योजना निवडण्यासाठी मदत करतो.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838