म्युचुअल फंड म्हणजे काय?

Mutual fund 

 

 

म्युचुअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. शेअर बाजारात स्वत: गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल अॅनेलेसीस व फंडामेंटल अॅनेलेसीस करता येणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. याव्यतिरिक्त आपण शेअरबाजारात व्यवहार करताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.  

आपल्या देशात प्रथमतः भारत सरकारचे सहभागाने युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली. आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी. १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापन करण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळाली. सध्या आपल्या देशात ४३ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक करता तेव्हा एकटे नसता. जेव्हा तुम्ही म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासारखी अनेकजण त्या योजनेत गुंतवणूक करत असतात यामुळे एक मोठी रक्कम (शेकडो करोडो रुपये) त्या योजनेत जमा होत असतात. यामुळे फंड मॅनेजरला अनेक विविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात. यामुळेच दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडातून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.

तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारख ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV =तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स। डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. त्याला कॉर्पस किंवा असेटस अंडर मॅनेजमेंट या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मुल्य (NAV) जाहीर केले जाते. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.

Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग (शेअर), गुंतवणूकदार हा या युनिट्सचा मालक असतो.

NAV = Net Asset Value म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.

Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV

शेअरबाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा वाढते, याउलट जर शेअर बाजार खाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा कमी होते. हि अशी मूल्यवृद्धी किंवा मूल्य घट शेअरबाजाराच्या काळाप्रमाणे नियमितपणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो. म्हणून रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पाहत बसू नये तर वर्ष सहामाहीन्यातून कधीतरी एकदाच ते पहावे. म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर संयमाची आवश्यकता असते. म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदीच गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवावी. म्युचुअल फंडात नियमित दर महिना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

तेजी मंदी हा शेअरबाजाराचा अविभाज्य भागच आहे मात्र दीर्घ मुदतीत तो वरच जात असतो. एक लक्षात ठेवा कि सेन्सेक १९७९ साली १०० अंकांनी सुरु झाला तो दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ रोजी ३१८१४ झाला होता. गेल्या ३८ वर्षात सेन्सेक्स ने वार्षिक १५% चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे.

आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी मदत करतो. आमच्यामार्फत गुंतवणूक करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी 9422430302 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा किंवा sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करा.

गुंतवणूक करा

जर तुम्हाला म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर खाली जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.

डाउनलोड करण्यासाठी फॉर्म:

CKYC-Individual_Form.pdf

CRF-Individual.pdf

CTF-SIP.pdf

PayEezz-Mandate.pdf

CTF-Purchase.pdf

Instructions.pdf

आमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:

  1. तुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.
  2. गुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.
  3. आपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.
  4. नवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.
  5. आपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.

 

Comments

Submitted by Sadanand on 23/Mar/2017 - 12:50 PM

Permalink

तुम्ही येथे तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. योग्य प्रतिक्रिया येथे प्रसिद्ध केल्या जातील. 

प्रतिक्रिया नोंदवताना कृपया सभ्यतेचे पालन करा. असभ्य भाषेतील असू नये किंवा  तुमच्या उत्पादनाची जाहिरात करू नये, ती तशी असल्यास डिलीट केली जाईल.

प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगीन कारणे अत्यावश्यक आहे.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838