म्युचुअल फंड मराठी

लवकरच हे संकेतस्थळ आम्ही नवीन आकर्षक आणि गतिशील (Dynamic) स्वरुपात घेऊन येत आहोत. 

यामध्ये आपण ऑनलाईन खाते उघडू शकाल तसेच एकरकमी गुंतवणूक करणे, नवीन एसआयपी सुरु करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, एसडब्ल्यूपी सुरु करणे, एसटीपी सुरु करणे हे सारे व्यवहार ऑनलाइन करू शकाल. तुमच्या मोबाईल मध्ये आमचे App डाउनलोड करून मोबाईल मधूनही सारे व्यवहार करू शकाल.  

म्युचुअल फंड व शेअर बाजाराची माहिती, तुमच्या व कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी संपत्ती निर्माण करा, जिवनाचा आनंद घेत जगा.

आता म्युचुअल फंडाचा अकाउंट तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून सुलभपणे ऑनलाईन उघडू शकता व ७ दिवसात तुम्ही गुंतवणूक करू शकता. २४/७ तुमच्या सवडीनुसार केव्हाही आणि कोणत्याही शहरातून किंवा अगदी कोणत्याही खेड्यातूनही. कोणतेही बंधन नाही.

म्युचुअल फंडाची माहिती थोडक्यात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहिती हवी असेल तर संपर्क करा 9518752605 or 9422430302

Email: sadanand.thakur@mutualfundmarathi.com

आपणास माहित असेलच कि शेअर बाजारात नेहमीच चढ-उतार हे होतच असतात. म्हणूनच म्युचुअल फंडाच्या ज्या शेअर बाजाराशी निगडीत योजना असतात त्यामध्येसुद्धा जवळपास रोजच तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य बदलत असते, ज्या दिवशी शेअर बाजार वर जातो तेव्हा तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढते व ज्या दिवशी शेअर बाजार खाली येतो तेव्हा गुंतवणूक मूल्य कमी होते. हा बदल नित्याचाच भाग आहे, म्हणून याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. शेअर बाजारात चढ-उतार आहेत म्हणून जोखीम आहे आणि जोखीम आहे म्हणूनच जास्त परतावा मिळण्याची संधी सुद्धा आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर संयम आवश्यक असतो. श्रद्धा आणि सबुरी ठेवलीत तर तुम्हाला निश्चितच म्युचुअल फंडात गुंतवणूक करून पैसे मिळतील. म्युचुअल फंडात कोणतेही गॅरंटेड रिटर्न्स नसतात मात्र दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकत म्युचुअल फंड योजनेत असते. गुंतवणूक करताना बँकेच्या व्याजापेक्षा जास्त परतावे मिळतील म्हणून गुंतवणूक करू नका तर पुढील ५ ते ७ वर्षांनी तुमची एखादी गरज पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करा. मुलांचे शिक्षण, विवाह, तुमच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी तरतूद करणे, घर घेणे, गाडी घेणे इ. एखाद्या उद्देशाने म्युचुअल फंडात गुंतवणूक करा, गुंतवणूक नियमित SIP च्या माध्यमातून करा. एकदा गुंतवणूक सुरु केलीत कि मध्येच बंद करू नका. रोजच्या रोज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तपासू नका. चांगल्या सल्ल्यासाठी अनुभवी व चांगल्या माहितगार गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. ज्याला स्वत:ला म्युचुअल फंडाची माहिती नाही अश्या व्यक्तीच्या सांगण्याने गुंतवणूक करू नका. डॉक्टर चांगला असेल तरच गुण येतो हे लक्षात ठेवा.

facebook Twitter

प्रातिनिधिक योजना पहा

फ्रॅंकलिन इंडिया प्रायमा फंड

फ्रॅंकलिन इंडिया प्रायमा फंड १९९३ मध्ये सुरू झालेला आणि सातत्याने उत्तम कामगिरी करीत राहिलेला हा फंड त्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पोचला आहे. या फंडाची एनएव्ही आता एक हजार रुपये प्रति युनिटच्या जवळ पोचली आहे. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत या फंडाने जवळजवळ २१ टक्के भरघोस वार्षिक परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यावर या फंडाच्या मालमत्तेचे बाजारमूल्य आता ६३०० कोटी रुपयांच्या पुढे पोचले आहे. शेअर बाजारातील तेजी-मंदीच्या चढ-उतारात या फंडाने योग्य गुंतवणुकीच्या आधारावर दीर्घकाळात उत्तम कामगिरी ठेवली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या फंडात सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल, त्यांना त्याचा उत्तम परतावा नक्की मिळाला असेल. ज्यांनी या योजनेत सुरुवातील रु.एक लाख गुंतवले होते त्याचे सध्याचे बाजारमूल्य रु.९३ लाख रुपयांपेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.५००० ची गुंतवणूक एस.आय.पी. माध्यमातून केली आहे व जी अजून चालू ठेवली असेल तर आजपर्यंत एकूण गुंतवणूक झाली रु.१४.७५ लाख व सध्याचे मुल्य आहे सुमारे रु.३ कोटी ९० लाख रुपये.

एचडीएफसी इक्विटी फंड

१९९५ मध्ये सुरू झालेला हा फंड गेली २३ वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करीत आहे. गुंतवणूकदारांच्या भांडवलाची वृद्धी करून देण्याची क्षमता असणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करतो. मार्च २०१८ मध्ये या फंडांच्या मालमत्तेचे बाजारमूल्य २० हजार कोटी रुपये झाले होते. यावरून याच्या प्रचंड विस्ताराची कल्पना येऊ शकते. गेल्या २३ वर्षांत या फंडाने सरासरी १९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. या फंडाची एनएव्ही जवळजवळ ६०० रुपये प्रतियुनिटपर्यंत पोचल्याचे पाहून प्रथमदर्शनी हा फंड महाग वाटू शकतो. मात्र, म्युच्युअल फंडाची एनएव्ही आणि त्यातील गुंतवणुकीतून मिळणारा फायदा याचा संबंध नसतो, तर तो फंड ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो, त्या शेअरच्या बाजारभावावर गुंतवणूकदारांचा फायदा अवलंबून असतो, हे सूत्र गुंतवणूकदारांनी कायम लक्षात ठेवावे. ज्यांनी या योजनेत सुरुवातील रु.एक लाख गुंतवले होते त्याचे सध्याचे बाजारमूल्य रु.६० लाख रुपयांपेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.५००० ची गुंतवणूक एस.आय.पी. माध्यमातून केली आहे व जी अजून चालू ठेवली असेल तर आजपर्यंत एकूण गुंतवणूक झाली रु.१४.१० लाख व सध्याचे मुल्य आहे सुमारे रु.३ कोटी २० लाख रुपये.

रिलायन्स ग्रोथ फंड

१९९५ मध्ये सुरू झालेलाहा आणखी एक उत्तम फंड! दीर्घ मुदतीची गुंतवणूक केली, तर परताव्याचा दर कमालीचा वाढू शकतो, हे या फंडाच्या कामगिरीतून दिसून येते. १९९५ मध्ये १० रुपयांपासून सुरू झालेली एनएव्ही आता जवळजवळ ११०० रुपये प्रतियुनिटपर्यंत पोचली आहे. प्रतियुनिट एक हजार रुपये एनएव्हीचा टप्पा प्रथम गाठण्याचा मान या फंडाने मिळविलेला आहे. याचाच अर्थ, ज्या गुंतवणूकदाराने या फंडात सुरवातील एक लाख रुपये गुंतविले होते, त्याच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य आज अंदाजे एक कोटी रुपयांच्या आसपास झाले आहे. या फंडाच्या मालमत्तेचे सध्याचे बाजारमूल्य जवळजवळ ६६०० कोटी रुपये आहे. अर्थात, या फंडालासुद्धा निव्वळ मालमत्ता मूल्यातील मोठ्या चढ-उतारांचा सामना करावा लागला. ज्या गुंतवणूकदारांनी या चढ-उतारात त्यांची गुंतवणूक सुरू ठेवली, त्यांना त्याचा उत्तम परतावा मिळाला आहे. ज्यांनी या योजनेत सुरुवातील रु.एक लाख गुंतवले होते त्याचे सध्याचे बाजारमूल्य रु.१ कोटी ६१ लाख रुपयांपेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.५००० ची गुंतवणूक एस.आय.पी. माध्यमातून केली आहे व जी अजून चालू ठेवली असेल तर आजपर्यंत एकूण गुंतवणूक झाली रु.१३.५ लाख व सध्याचे मुल्य आहे सुमारे रु.३ कोटी २० लाख रुपये.

वरील तीन फंडांची माहिती ही केवळ उदाहरणादाखल दिली आहे. याचा अर्थ फक्त या तीन योजनाच सर्वोत्तम आहेत, असे नाही. याप्रमाणे इतरही अनेक चांगल्या योजना आहेत. दीर्घकाळात म्युच्युअल फंडातून धनवृद्धी कशी होऊ शकते, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आपण जर योग्य योजनांमध्ये दीर्घकाळासाठी नियमितपणे गुंतवणूक केली तर त्याचा उत्तम परतावा हमखास मिळतो, हे या उदाहरणांतून स्पष्ट होते. शेअर बाजारात चढ- उतार हे होतच राहणार, त्यानुसार योजनांची कामगिरी कमी- जास्त दिसणार. पणफॉर्म इज टेम्पररी, क्‍लास इज परमनंटहे सूत्र लक्षात ठेवून संयमाने आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याने संपत्तीनिर्मिती होऊ शकते, हे लक्षात ठेवावे.

facebook Twitter

आता म्युचुअल फंडात पेपरलेस खाते सुरु करणे सुलभ झाले आहे.

आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत ऑनलाईन म्युचुअल फंडाचे खाते उघडण्याची सुविधा. पूर्णपणे पेपरलेस. एकदा का आपण आपले म्युचुअल फंडाचे खाते उघडले कि आपण ऑनलाईन पेपरलेस One Time Bank Mandate रजिस्टर करू शकतो याचे रजिस्ट्रेशन होण्यासाठी फक्त दिवस लागतात. एकदा का .टी.एम. रजिस्टर झाला कि आपण म्युक्युअल फंडात एकरकमी किंवा एस.आय.पी. च्या माध्यमातून ऑनलाईन गुंतवणूक करू शकतो. याचप्रमाणे एकदा का म्युचुअल फंडाचे खाते उघडले कि आपण नेट बँकिंग, RTGS, NEFT याव्दारेसुद्धा गुंतवणूक करू शकतो.

facebook Twitter

ऑनलाईन खाते कसे उघडाल?

अगदी सोपे आहे. यासाठी तुमच्याकडे एक स्मार्ट फोन हवा तुमच्या संगणकात PAN कार्ड, आधार कार्ड यांचा फोटो, तुमचा फोटो, बँक चेकचा फोटो आणि तुमच्या सहीचा फोटो सेव्ह केलेला असला पाहिजे.

  • आता पुढील लिंकवर क्लिक करा Click Here हि लिंक दुसर्या विंडोमध्ये उघडेल.
  • Start Now वर क्लिक करा
  • माहिती भरण्यास सुरुवात करा.
  • तुमच्या PAN कार्डचा फोटो अपलोड करा. (मोबाईल मध्ये तुम्ही फॉर्म भरतानाच फोटो काढून अपलोड करू शकता, यासाठी आपण एका कोऱ्या कागदावर सही करा, त्या सहीच्या वरच्या बाजूला PAN कार्ड ठेवा व फोटो काढा व हा फोटो अपलोड करा).
  • तुमच्या आधार कार्डचा फोटो अपलोड करा. (मोबाईल मध्ये तुम्ही फॉर्म भरतानाच फोटो काढून अपलोड करू शकता, यासाठी आपण एका कोऱ्या कागदावर सही करा, त्या सहीच्या वरच्या बाजूला आधार कार्ड ठेवा व फोटो काढा व हा फोटो अपलोड करा).
  • तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करा.
  • तुमच्या बँकेच्या चेकचा फोटो अपलोड करा. (मोबाईल मध्ये तुम्ही फॉर्म भरतानाच काढून अपलोड करू शकता).
  • तुमच्या सहीचा फोटो काढून अपलोड करा. (मोबाईल मध्ये तुम्ही फॉर्म भरतानाच एका कोऱ्या कागदावर सही करून फोटो काढून अपलोड करू शकता).

तुम्ही सही करून अपलोड केलेली कागदपत्रे फक्त म्युच्युअल फंडाचे खाते उघडण्यासाठीच वापरले जातील याची आम्ही खात्री देतो.

 

तुम्ही एकट्याच्या नावाने किंवा दोन किंवा व्यक्तींचे नावाने सुद्धा खाते उघडू शकता. एकापेक्षा जास्त नावाने खाते उघडावयाचे असेल तर वरीलप्रमाणे सर्वांच्या कागदपत्रांचे फोटो अपलोड करावे लागतील.

सर्व माहिती भरून झाली कि सबमिट बटनावर क्लिक करा.

तुमचे काम झाले.

जर तुम्हाला सही अपलोड करावयाची नसेल तर काय?

जर तुम्हाला तुमच्या सुरक्षेच्या कारणास्तव सहीचा फोटो अपलोड करावयाचा नसेल तर तुम्ही तसे करू शकता. यासाठी फक्त माहिती भरा, तुमचा फोटो, पॅन कार्डचा फोटो, आधार कार्डचा फोटो आणि बँकेच्या चेकचा फोटो फक्त अपलोड करा व माहिती भरा. आवश्यक त्या सर्व फॉर्ममध्ये माहिती भरली जाईल व ते फॉर्म आम्ही आपणास आपल्या इमेल वर जोडून पाठवू. ते तुम्ही डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढा, भरलेली माहिती तपासून पहा, टिक केलेल्या ठिकाणी सही / सह्या करा सोबत स्वसाक्षांकित पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत जोडा आणि ते आम्हाला कुरिअर किंवा पोस्टाने खालील पत्यावर पाठवून द्या.

Thakur Financial Services,

275, Manisha, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun-415605, Dist: Ratnagiri, Maharashtra.

Tel: +912355251089 Mobile: 9422430302,

Email: sadanand.thakur@mutualfundmarathi.com

आमच्या ऑफीसमध्ये तुम्ही भरलेली माहिती तपासून खाते उघण्यासाठी मंजुरी दिली जाईल जर काही माहिती कमी असेल तर तुम्हाला फोन करून विचारली जाईल त्याप्रमाणे सुधारणा केली जाईल. तुमचे भरलेले फॉर्म तुम्हाला ईमेलने तुमच्या माहितीसाठी पाठवले जातील काही चूक असल्यास आपण आम्हाला कळवून सुधारणा करून घेऊ शकता.

आम्ही NSE & MF Utility या Online Transaction Platform बरोबर बहुतांशी सर्वच म्युचुअल फंडात ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी सलग्न झालेलो आहोत. आम्ही हे फॉर्म NSE & MF Utility या दोघांकडे रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी पाठवू. सोबतच तुमच्या वतीने ऑनलाईन One Time Bank E-Mandate रजिस्टर करू, तुम्हाला त्यांचेकडून एक मेसेज येईल त्यातील लिंकवर क्लिक करून तुमची समंती (Approval) द्यावी लागेल. यानंतर तुमच्या आधारबरोबर लिंक असणार्या मोबाईलवर एक OTP येईल तो भरल्यावर तुमचा One Time Bank E-Mandate संबधित बँकेकडे पाठवला जाईल वर्किंग दिवसात तो रजिस्टर होईल. यानंतर आम्ही तुम्हाला फोन करून तुमची गुंतवणुकीची गरज, तुमची जोखीम स्वीकारण्याची तयारी, आपण किती काळासाठी कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करू इच्छिता हे समजून घेऊन तुम्हाला म्युचुअल फंडाची माहिती देऊन नंतर तुमच्या समंतीने योग्य त्या योजनेत ऑनलाईन गुंतवणूक सुरु करू शकतो. आम्ही तुमच्यावतीने ऑर्डर टाकल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल त्यातील लिंकवर क्लिक करून तुमची समंती (Approval) द्यावी लागेल. मग तुमच्या बँक खात्यातील पैसे कट होऊन गुंतवणूक होईल. तुम्ही एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करू शकता. जर का आपण रजिस्टर केलेल्या One Time Bank Mandate च्या मर्यादेपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करू इच्छित असाल तर आपण ती गुंतवणूक Net Banking, RTGS/NEFT च्या माध्यमातूनहि करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू.

Waste neither time nor opportunity. Invest in Mutual Funds today.

Mutual Fund Investments are subject to market risk. Read all documents related scheme carefully before making investment.

फॉर्म नको, सही नको, चेक नको. सारे काही ऑनलाईन पेपरलेस.

Call: Sadanand Thakur - 9422430302 or 9518752605

facebook Twitter

म्युचुअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे.

म्युचुअल फंडाबाबत जर तुम्हाला थोडक्यात माहिती हवी असेल तर आपण मला sadanand.thakur@gmail.com या मेल वर मेल करा, मी तुम्हाला थोडक्यात माहिती पाठवून देईन.

For HNI's

जर आपणास आमच्यामार्फत म्युचुअल फंडमध्ये रु.२,००,००,०००/- (रुपये दोन कोटी) किंवा जास्त रकमेची गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर मी, सदानंद ठाकूर, आपणास महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात प्रत्यक्ष भेटून गुंतवणूकीसाठी मार्गदर्शन सेवा देण्यास तयार आहे. भेटीची वेळ ठरवण्यासाठी मोबाईल 9422430302 or 9518752605 वर संपर्क साधा.

म्युचुअल फंड हा एक संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग आहे, समजून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

आमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा:

  1. तुमच्या गुंतवणुकीचा तपशील २४/७ केव्हाही पाहण्याची सुविधा दिली जाते.
  2. गुंतवणुकीचा थोडक्यात तपशील २४/७ पाहण्यासाठी मोफत मोबाईल अॅप दिले जाईल.
  3. आपण यापूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक असेल तर त्याचाही तपशील पाहण्याची सुविधा.
  4. नवीन गुंतणूक कारणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे, नवीन एस.आय.पी. सुरु करणे, एस.टी.पी. किंवा एस.डब्ल्यू.पी. करणे हे सारे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी स्वतंत्र लॉगीन दिले जाईल याचा वापर डेस्कटॉप किंवा मोबाईल अॅप वापरून आपण करू शकाल.
  5. आपल्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी आमचे मार्गदर्शन मिळेल.
  6. लवकरच इ-कॉमर्स वेबसाईट सुरु करत आहोत ज्याव्दारे आपण सारे व्यवहार ऑनलाईन करू शकाल. हि सुविधा आमच्या मोबाईल अॅप मध्ये सुद्धा दिली जाणार आहे.
  7. इ-केवायसी व पूर्णपणे पेपरलेस गुंतवणूक सुविधा नवीन व यापूर्वी गुंतवणूक केलेल्या सर्वांसाठी

Mutual Fund Investments are subject to market risk. Read all documents related scheme carefully before making investment.

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 17th & 18th November, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 1st & 2nd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838