मल्टी कँप कामगिरी

Past Performance of few selected Top Performing schemes in Multi Cap Category Schemes

18.38 8.90 17.04 12.99
Name of the Scheme Category Date of Launch NAV as on 22/02/2018Rs. Value of Rs.1 Lakh invested on launch Total SIP invested @ Rs.1000 PM Value of SIP investment 1 Year Returns % 3 Year Returns % 5 Year Returns % 10 Year Returns % Returns since launch
HDFC Equity Fund Multi Cap 02 Jan 1995

 621.82

 62,18,200 27,8000 67,44,120 18.38 8.90 17.04 12.99 19.52
BSL Equity Fund Multi Cap 30 Aug 1998 699 69,900 2,34,000 25,63,060 14.54 12.14 21.32 11.12 24.33
ICICI Pru value discovery fund Multi Cap 19 Aug 2004 142.46 14,24,600 1,63,000 6,55,266 11.44 7.17 20.71 17.06 21.70
Franklin India Prima Plus Multi Cap 13 Dec 1994  573.35  57,33,500 2,79,000 5,82,134 13.49 8.90 18.39 12.48 18.88
Reliance Growth Fund Multi Cap 08 Dec 1995 1113.97 1,11,39,700 2,65,000 67,43,980 19.77 10.79 18.93 11.48 23.43
Kotak Opportunities Regular Plan Multi Cap 10 Sept 2004  112.85  11,28,500 1,62,000 5,03,526 15.05 10.41 18.52 9.90 19.72
Tata Ethical Fund Multi Cap 21 Aug 1996 156.91 15,69,100 2,57,000 26,94,590 18.46 6.07 16.50 9.58 16.87
Invesco India Contra Fund Multi Cap 12 Apr 2007 45.78 4,57,800 1,31,000 3,66,133 27.13 12.89 22.39 14.58 15.01
L &T Equity Fund Multi Cap 16 May 2005 81.125 81,12,500 1,54,000 4,21,543 17.18 8.27 17.22 11.70 15.01
Motilal Oswal MOSt Focused Multicap 35 Fund Multi Cap 28 Apr 2014  26.15  2,61,500 46000 68295.50 20.34 16.10 NA NA 28.59

Source:  Valueresearchonline.com

टिप:  SBI, UTI, TATA ह्या म्युचुअल फंड कंपन्या सन २००४ पर्यंत गुंतवणूकदारांना प्रतिवर्षी लाभांश देत असत, त्यामुळे यांचे काही योजनांचे एक रकमी गुंतवणुकीचे मूल्य इतर योजनांचे तुलनेत कमी दिसत आहे.  जर लाभांश पुन्हा त्याच योजनेत गुंतवला  गेला असता तर हेच मूल्य बरेच जास्त दिसले असते.

जर का आपण वरील टेबल पाहिलेत तर खालील गोष्टी आपणास समजून येतील:

 • या टेबल मध्ये आम्ही काही ठराविक योजनांचीच, ज्यांची मागील कामगिरी अतिशय उत्तम राहिलेली आहे व ज्या योजनेला किमान ५ वर्षे पूर्ण झालेले आहेत अशा चांगल्या योजनांचा समावेश हि माहिती देताना केलेला आहे. या टेबलमध्ये आम्ही नियमितपणे माहिती भारत राहू तसेच जास्त योजनांचा समावेशही यथावकाश केला जाईल.
 • या टेबल मध्ये तुम्ही एक रकमी गुंतवणुकीतून दीर्घ काळात किती जास्त नफा झाला आहे हे पाहू शकता.
 • या टेबल मध्ये तुम्ही एस.आय.पी. व्दारे नियमित थोडी थोडी रक्कम गुंतवत राहून दीर्घ काळात कशी संपती निर्माण करू शकता हे समजून घेऊ शकता.
 • जर का आपण एक रकमी गुंतवणूक दीर्घ काळासाठी (किमान १० वर्षे ते २५ वर्षे मुदतीसाठी) केली तर गुंतवणुकीच्या अन्य कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त उत्पन्न आपणास मिळू शकते. जर तुम्ही १० वर्षासाठी गुंतवणूक करणार असाल तर साधारणपणे ७ ते ८ वर्षानंतर जेव्हा कधीही वार्षिक चक्रवाढ परतावा २०% पेक्षा जास्त असेल तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर झालेला नफा एक तर काढून घ्यावा किंवा तो त्याच म्युचुअल फंड कंपनीचे लिक्विड फंड योजनेत वर्ग करावा आणि शेअर बाजार परत खाली आला कि तचे पैसे परत मूळ योजनेत वर्ग करावेत. किंवा २० ते २५ वर्षे काहीच न करता त्यानंतर जेव्हा आपल्या गुंतवणुकीचे मूल्य चांगले वाढलेले असेल तेव्हा पैसे काढून ते अन्यत्र गुंतवावेत. असे केल्याने चांगली संपत्ती निर्माण करता येईल. एकरकमी गुंतवणूक केल्यावर जेव्हा जेव्हा सेन्सेक्स किंवा निफ्टी १% पेक्षा जास्त प्रमाणात खाली येईल तेव्हा अधिक गुंतवणूक त्याच योजनेत करत राहा असे जर तुम्ही दीर्घ कर करत राहिलात तर एक चांगली संपत्ती निर्माण होईल.
 • एस.आय.पी. माध्यमातून नियमितपणे गुंतवणूक दीर्घ काळासाठी (किमान १० वर्षे ते २५ वर्षे मुदतीसाठी) करत राहणे हे उत्तम आणि हे करत असताना दर वर्षी आपले उत्पन्न वाढतच असते म्हणून एस.आय.पी. मध्ये सुद्धा दरवर्षी वाढ करत न्यावी. एस.आय.पी. सुरु केल्यावर जेव्हा जेव्हा सेन्सेक्स किंवा निफ्टी १% पेक्षा जास्त प्रमाणात खाली येईल तेव्हा अधिक गुंतवणूक त्याच योजनेत करत राहा असे जर तुम्ही दीर्घ कर करत राहिलात तर एक चांगली संपत्ती निर्माण होईल.
 • योजना निवडताना आमचे मार्गदर्शन घ्या मोफत मिळेल.
 • तुमच्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेचा विचार करा.
 • वय कमी असेल तर मिड कॅप, स्मॉल कॅप व मल्टी कॅप योजना निवडण्यास हरकत नाही.
 • वय ४५ पेक्षा जास्त असेल तर लार्ज कॅप व समतोल योजना निवडा.
 • वय ५५ पेक्षा जास्त असेल तर समतोल योजनेत गुंतवणूक कारणे श्रेयस्कर राहील.
 • नियमित गुंतवणूक, दीर्घकालीन दृष्टीकोन फार महत्वाचा आहे. बाजारात चढ उतार हे तर होणारच, जर तुमचा उद्देश दीर्घकालीन असेल तर अश्या चढ उतराने विचलित होऊ नका. गुंतवणूक करत रहा. चक्रवाढीचा फायदा हा दीर्घ काळातच अनुभवता येतो. नियमितपणे थोडी थोडी गुंतवणूक करत रहा. असे जर तुम्ही आजच सुरु केलेत तर भविष्यातील तुमच्या अनेक गरजा पूर्ण होतील, जसे कि मुलांचे शिक्षण, विवाह, घर घेणे, निवृत्तीनंतर समृद्ध आयुष्य हे सारे उद्देश यातून पूर्ण होतील.

जर तुम्हाला या संकेतस्थळावरील माहिती उपयुक्त वाटली तर कृपया तुमच्या परिचित व्यक्तींना या संकेतस्थळाची माहिती द्या मुख्यत्वेकरून जे लोकं ग्रामीण भागात राहतात त्यांना अवश्य कळवा जेणेकरून त्यानाही म्युचुअल फंडाची माहिती होईल.

मोठ्या, मध्यम व लहान भांडवली कंपन्यामधील गुंतवणूक (Multi Cap Schemes)

या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नांवाप्रमाणेच मोठ्यामध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. मोठ्या कंपन्याची वार्षीक सरासरी वाढ हि स्थीर असतेतसेच या कंपन्या बुडण्याची वा नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी म्हणजे जवळपास नसतेच. या कंपन्याच्या शेअर्स मधील गुंतवणूकीवर मिळणारा परतावाही स्थीर असतो. या कंपन्यांमधील गुंतवणूक तुलनेने कमी जोखीमीची असते. मध्यम आकाराच्या कंपन्यामधील गुंतवणूक हि तुलनेने जास्त जोखीमीची असते व लहान कंपन्यांमधील गुंतवणूकीत सर्वात जास्त जोखीम असते. मात्र सध्या लहान असणा-या कंपन्याच भवीष्यात मध्यम व मोठ्या होत असतात हे तुम्ही जाणताच. हाय रिस्क – हाय रिटर्न या प्रकारात हि गुंतवणूक समजली जाते. गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर दिर्घ मुदतीत उत्तम परतावा मिळाल्याचे दिसते. शेअर बाजारात तेजी असताना अशा योजनेतून फार चांगला परतावा मिळतो व मंदी असताना नुकसानही जास्त होते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमीत दरमहा (एसआयपीव्दारे) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी मंदीवर मात करुन भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणूकीसाठी तुमचे उदिष्ठ किमान १० वर्षे व शक्यतो १५ वर्षे असावे म्हणून शक्यतो आपल्या निवृत्तीपर्यंतची मुदत निवडावीपैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुवीधा अशा योजनेत असते. तसेच दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवत नेणे जास्त फायदेशीर होते. गुंतवणूकीला जितक्या लवकर सुरुवात केली जाते तेवढा चक्रवाढीचा व रुपी कॉस्ट सरासरीचा अधीक फायदा मिळतो. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एसआयपी गुंतवणूक सुरु करावी. या योजनेत गुंतवणूक करुन भविष्यातील अनेक गरजा (लग्नघर घेणेगाडी घेणेमुलांचे शिक्षणनिवृत्तीनंतरची तरतुद इ. अनेक गरजा) वेळच्या वेळी पुर्ण करणे सहज सुलभ होते.  अशा प्रकारच्या योजनेत शक्यतो तरुण व्यक्ती ज्या दिर्घ काळासाठी गुंतवणूक करु शकत असतात त्यानी अवश्य गुंतवणूक करावी. तसेच ज्या व्यक्तींची जास्त जोखीम स्विकारुन जास्तीचा फायदा मिळविण्याची मानसीक तयारी असेल अशा व्यक्ती याप्रकारच्या योजनेत गुंतवणूक करु शकतात. म्युचुअल फंड आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना नेहमीच काही दशकांचा विचार करावा, एकदा एस.आय.पी. सुरु केल्यावर ती मध्येच बंद करू नये.

 

 

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
पुढील भेटीची तारीख: 22nd April 2018 (3rd Sunday of April, 2018)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 28th April, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०