Question asked at date 2017-01-24-20-00-43

बँकेच्या मुदत ठेवींसाठी काही पर्यायी योजना म्युच्युअल फंडाच्या असतात का? व अशा योजनांचा काय फायदा असतो?

चर्चा

Submitted by Sadanand on 24/Jan/2017 - 20:02 PM

 बँक ठेवींवर मिळणारे व्याज हे करपात्र उत्पन्नात मोडते व बँक टिडिएस कापूनच व्याजाची रक्कम तुमच्या हाती देत असते. म्युच्युअल फंडामध्ये Fixed Maturity Plans (ठरावीक काळाच्या मुदतबंद योजना) असतात, अशा योजनेत ३० दिवसांपासून ३ वर्षाचे मुदतीसाठी गुंतवणूक करण्याची सुवीधा असते. सर्वसाधारणपणे या योजनांतून मिळणारे उत्पन्न हे बँक व्याजापेक्षा थोडे अधिक असते. महत्वाचा फायदा म्हणजे (१) टिडिएस कापला जात नाही (२) मिळणारे उत्पन्नांवर इंडेक्ससेशनव्दारे कर आकारणी करण्याची सुवीधा आहे ज्यामुळे कर बचत होते.

Submitted by नरेश पुजारी on 24/Jan/2017 - 20:11 PM

मला म्युचुअल फन्डात गुन्तवणुक करायची आहे. आपण मला एखादा चान्गला म्युचुअल फन्ड सुचवु शकाल का? त्यासाठी मला काय करावे लागेल?

Submitted by Sadanand on 27/Feb/2017 - 19:19 PM

यासाठी आपण मला खालीलप्रमाणे माहिती द्या:

१) आपले वय काय?

२) मासिक उत्पन्न किती?

३) किती वर्षासाठी गुंतवणूक करावयाची आहे?

४) नियमित दर महा करणार, तर किती रुपये दर महा गुंतवणूक करू शकता?

५) एकरकमी गुंतवणूक करणार काय? किती?

६) शेअर बाजाराच्या जोखीमीची माहिती आहे का?

यानंतर पुढील चर्चा करू.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Prathamesh 7276043165 
Sadanand 9518752605
पुढील भेटीची तारीख: 6th and 7th Jan 2018 (1st Saturday & Sunday of January, 2018)

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 27th & 28th January, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

भेट ठरविण्यासाठी:
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव 
फोन क्र. ९४०५६७२११०