म्युचुअल फंड्स – संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग

म्युचुअल फंड्स – संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग

Mutual Fund Investment

कमी झालेल्या बँक ठेवींवरील व्याजदराना म्युचुअल फंडाच्या कर्ज रोखे आधारित योजना (Debt Fund Schemes) या उत्तम व विश्वसनीय पर्याय आहेत.

लेखक: सदानंद ठाकूर

ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस

म्युचुअल फंड सल्लागार व वितरक

२७५, मनिषा, आय.सी.आय.सी.आय. बँके जवळ,

कावीळतळी,

चिपळूण-४१५६०५

मोबाईल: 9422430302

इमेल: sadanand.thakur@gmail.com

वेबसाईट: www.mutualfundmarathi.com

 

स्वागत मूल्य रु.५०/- 

 

शेअर बाजार तोंड ओळख

तेजी व मंदी शेअर बाजाराचा अविभाज्य घटक

एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवलीच पाहीजे की बाजारात नियमितपणे चढ उतार होतच असतात, तसेच ८/१० वर्षात एक मोठी तेजी येतच असते व तेजी पाठोपाठ एक मोठी मंदीही येतच असते.  तेजीच्या कालखंडात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणावर वाढते व मोठ्या मंदीच्या काळात ते परत कमी होत असते.  मात्र शेअर बाजाराचा अभ्यास करताना असे दिसुन आले आहे की शेअर बाजारात तीन प्रकारचे कल प्रामुख्याने असतात – तेजीचा कालखंड, मंदीचा कालखंड व साइड-वे चा कालखंड, या तिन्हीमध्ये मंदीचा कालखंड हा सर्वात कमी असतो, जो गेल्या पन्नास वर्षात सरासरी ९ महीने एवढाच आहे, या कालखंडात आपण आपले गुंतवलेले पैसे काढू तर नायेतच उलट शक्य असल्यास जास्त रकमेची गुंतवणूक करावी कारण मंदी नंतर तेजी येतेच व तेजीच्या काळात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य जास्त प्रमाणात वाढते.

तेजीचा कालखंड: हा कालावधी सर्वात जास्त काळाचा असतो जो किमान ३ वर्षे व जास्तीत जास्त ५ वर्षांचा असतो. या कालखंडात गुंतवणुकीचे मूल्य जवळपास सतत वाढत असते, हा कालखंड आनंद देणारा असतो. या कालखंडात सर्वात जास्त लोकं शेअर बाजारात सतत गुंतवणूक करत असतात म्हणजेच कंपन्यांचे शेअर्सला पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते म्हणून शेअर्सचे भाव सतत वाढत असतात. कोणत्याही वस्तूचे बाबतही हेच घडत असते, जेव्हा बाजारात त्या वस्तूचा तुटवडा असतो तेव्हा दर वाढतात व जेव्हा बाजारात मालाचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो तेव्हा दर कोसळतात. म्हणूनच कधी आपण कांदा ५ रुपये कीलोने विकत घेतो तर तो कधी १०० रुपये कीलोने विकत घ्यावा लागतो. तेच तूर डाळीचे बाबत गेल्या वर्षी तुरडाळ २०० रु. कीलोने विकली जात होती यंदा टी ६० – ७० रुपये कीलोने मिळत आहे. हीच गोष्ट शेअर बाजारालाही लागू पडते हे समजून घेतलेत म्हणजे शेअर बाजाराची भीती दूर होईल व तुमचा संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग तुम्हाला खुला होईल.

मंदीचा कालखंड: ज्या प्रमाणे तेजीत शेअर्सचे भाव वाढतात कारण सारेच जण शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात तसेच जेव्हा सर्वच गुंतवणूकदार काही कारणामुळे त्यांचेकडील शेअर्स विकण्याचा मानसिकतेमध्ये असातात तेव्हा खरेदीसाठी मात्र थोडेच उत्सुक असतात मग हळूहळू शेअर्सचे भाव कोसळू लागतात व बाजारात मंदी येते.  पण हा मंदीचा काळ गेल्या ५० वर्षात सरासरी  नऊ महीने एवढाच आहे. याच काळात गुंतवणूकदाराला कमी भावात युनिट्स मिळत असल्याने जास्त युनिट्स मिळतात व याचा फायदा पुढील तेजीमध्ये होतो. या काळात जास्तीत जास्त रकमेची गुंतवणूक करावी कारण मंदी ही गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधीच असते.

साइड-वे चा कालखंड: या कालखंडामध्ये  शेअर बाजार एका ठराविक मर्यादेत वर खाली होत असतो, ज्याप्रमाणे २०११ ते २०१३ या तीन वर्षात सेन्सेक्स १५००० ते २१००० या मर्यादेत वर खाली होत होता.

शेअर बाजार संबंधी योजनेत गुंतवणूक का करावी?

शेअर बाजारात जोखीम निश्चितच असते  पण तिचा प्रभाव आपल्या मूळ गुंतवणुकीवर काही काळासाठीच पडत असतो, दीर्घ काळात मात्र गुंतवणुकीतून भरपूर फायदाच होत असतो कारण दीर्घ मुदतीत बाजारात तेजी येतच असते. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती काही काळानंतर खाली येतेच आणि खाली आलेली किंमत परत वर जातेच.

म्युकुअल फंडाची माहिती एकाच ठिकाणी देणारे अनियतकालिक आम्ही लवकरच प्रकाशित करीत आहोत, आपणास जर याची प्रत हवी असेल तर मला संपर्क करा.

 

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस

 २७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण - ४१५६०५
टेली. ०२३५५ - २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com

पूणे संपर्क

पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302  
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018 

रत्नागिरी संपर्क

रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार 
Mobile: 9422430302 & 9518752605

रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018

ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी 

वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

 

जळगाव संपर्क

श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०

उस्मानाबाद 

अच्युत: 9970963838