म्युच्युअल फंडाचे खाते उघडा
तुमचे ऑनलाइन खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा
काही मदत हवी असेल तर संपर्क करा: सदानंद ठाकूर 9518752605
संपर्क करा
- मुद्दल सुरक्षित जोखीम फक्त मिळणाऱ्या परताव्याची. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9518752605
तुमचे ऑनलाइन खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा
काही मदत हवी असेल तर संपर्क करा: सदानंद ठाकूर 9518752605
समभाग आधारित योजनेत शेअरबाजाराची जोखीम अतर्भूत तर असतेच. पण हुशार गुंतवणूकदारांना हे माहित असते कि ज्याप्रमाणे ताजमहाल सारखे शिल्प एका दिवसात निर्माण करता येत नाही त्याचप्रमाणे इक्विटी योजनेतून चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळाचाच विचार केला पाहिजे, तसेच त्यासाठी संयमहि ठेवावा लागेल.
कर्जरोखे आधारित योजनेत (Debt Schemes) तुलनेने कमी क्रेडीट जोखीम असते.
या प्रकारातील योजनेत व्याज दरातील चढ उताराचा परिणाम होतो. जर आर.बी.आय. ने व्याज दारात वाढ केली तर
या योजनेतील परतावा कमी होतो व जर व्याजदर कमी केले तर परतावा वाढतो. तसेच या योजनेत अन्य काही
जोखिमी असतात. मात्र या योजनेत शेअरबाजाराची जोखीम नसते. बँक ठेवींवर ठरलेल्या दराने निश्चित व्याज मिळते
मात्र बदलणाऱ्या व्याजदरामुळे संधी जाऊ शकते ह ए लक्षात ठेवले पाहिजे.
डेब्ट फंड्स हे तरल असतात म्हणून गरज लागल्यास केव्हाही पैसे काढता येतात.
प्रचलित कर रचनेनुसार डेब्ट योजनेत गुंतवलेले पैसे ३ वर्षानंतर काढले तरच लॉंग टर्म कॅपिटल गेन वर कर मिळणारा
इंडेस्कसेशनचा लाभ मिळतो, यासाठी या योजनेतील गुंतवणूक किमान ३ वर्षे करावी लागते. मात्र जर आत्यंतिक गरज
भासली तर योजनेला लागू असणारा निर्गमन आकार भरून पैसे केव्हाही काढण्याची सुविधा उपलब्ध असते. या मुळे
या योजनेत तरलता आहे.
डेब्ट फंड्स मधून बँक ठेवी पेक्षा जास्त परतावा मिळतो.
या प्रकारातील योजनेत व्याज दरातील चढ उताराचा परिणाम होतो. जर आर.बी.आय. ने व्याज दारात वाढ केली तर
या योजनेतील परतावा कमी होतो व जर व्याजदर कमी केले तर परतावा वाढतो. तसेच या योजनेत अन्य काही
जोखिमी असतात. मात्र या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही यातील जोखीम समजून गुंतवणूक केली
पाहिजे. तसेच तुमच्यासाठी योग्य योजना निवडणे हि सुद्धा एक अत्यावश्यक बाब असते. त्यासाठी आम्ही तुम्हाला
मदत करतो.
बँक ठेवींवरील व्याज हे तुमच्या उत्पन्नात वाढवले जाते व त्यावर प्रचलित दराने आयकर
भरावा लागतो. ज्या व्यक्ती ३०% दराने आयकर भारतात त्यांना हा कर त्याच दराने भरावा लागतो. जर डेब्ट फंडातील पैसे ३
वर्षे पूर्ण होण्यापूर्वी काढले तर त्यावर मिळणारा लाभही बँक ठेवींवरील व्याजाप्रमाणेच करपात्र असतो, मात्र जर गुंतवणूक ३
वर्षे किंवा अधिक काळासाठी केली तर लॉंग टर्म कॅपिटल गेन वर इंडेस्कसेशनचा लाभ मिळतो व त्यानंतर होणाऱ्या फायद्यावर
२०% दरानेच कर भरावा लागत असल्याने भरपूर जास्त फायदा मिळतो. बाजूचे टेबल पहा.
जर का भविष्यात आपली नोकरी गेली किंवा आपल्या व्यवसायात काही अडचणी आल्या तर त्यावेळी आपल्याला कोणतीही आर्थिक चणचण भासू नये, आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून पैसे काढावे लागू नयेत तसेच SIP बंद करावी लागू नये यासाठी बहुतांशी तज्ञ आर्थिक सल्लागारांचे असे मत आहे कि प्रत्येक व्यक्तीने भविष्यात येऊ शकणाऱ्या अडचणींचा विचार करून किमान ६ ते ८ महिन्यांसाठी लागणाऱ्या मासिक खर्चाची सोय इमर्जन्सी फंड स्वरुपात केली पाहिजे.
इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी आपल्या बँक बचत खात्यात पैसे बचत करून ठेवण्यापेक्षा ते जर का तरल योजनेत (Liquid Schemes) गुंतवणूक केली तर जास्त चांगले होते कारण या योजनेत जवळपास जोखीम नसते व रोजच गुंतवणुकीचे मूल्य वाढत असते. या योजनेतून सर्वसाधारणपणे वार्षिक सरासरी ६ ते ६.५% परतावा मिळत असतो. या योजनेतील गुंतवणूक हि ९० दिवसांच्या मनी-मार्केट पेपर्समध्ये केली जात असल्याने व्याजदर फरकाची किंवा क्रेडीट रिस्कची जोखीम जवळपास रहात नाही. त्याचप्रमाणे या योजनेत कितीही दिवसांसाठी गुंतवणूक करता येते कारण या योजनेत निर्गमन आकार नसतो.
प्रत्येक म्युचुअल फंडाचा किमान एक तरी लिक्विड फंड असतोच. सर्वांचेच रिटर्न्स जवळपास सारखे असतात, थोडाफार फरक असतो. काही योजनेत डेबिट कार्डही दिले जाते ज्याचा वापर करून तुम्ही कोणतीही बिलेसुद्धा भरू शकता. बँकेच्या ATM मधून पैसेही काढता येतात. योजना निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.
Systematic Investment Plan (SIP). म्हणजेच एसआयपी हा म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग मानला जातो. एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करणे हे जवळपास बँकेत किंवा पोस्टात आर.डी. सुरु करण्यासारखेच असते. फरक इतकाच असतो कि आर.डी. मध्ये तुम्हाला निश्चित दराने व्याज दिले जाते जे तुम्हाला तुमची आर.डी. सुरु करतानाच सांगितले जाते. मात्र एसआयपी सुरु करताना तुम्हाला असे कोणतेही खात्रीशीर परतावे सांगितले जात नाहीत. मात्र दीर्घ मुदतीत एसआयपीच्या गुंतवणुकीतून निश्चितच चांगले परतावे मिळू शकतात. एसआयपी तुम्ही साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक तत्वावर सुरु करू शकता. सर्वसाधारणपणे दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम एसआयपी माध्यमातून गुंतवणे हे चांगले मानले जाते.
सर्वसामान्य माणसाकडे शेअरबाजाराचे पुरेसे ज्ञान नसते तसेच त्यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो अशा व्यक्तींनी एसआयपी माध्यमातून नियमितपणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून चांगला लाभ मिळवणे जास्त श्रेयस्कर मानले जाते. कारण योजनेचा व्यवस्थापक तुमच्या गुंतवणुकीची काळजी घेत असतो. एसआयपीचे काही फायदे खालीप्रमाणे:
समभाग व समभाग आधारित म्युचुअल फंड योजना:
वर्ष २०१८-१९ पासून म्युचुअल फंड गुंतवणुकीवर १०% इतक्या कमी दराने लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सुरु झालेला आहे मात्र एक लाखांपर्यंतचा लॉंग टर्म कॅपिटल गेन हा करमुक्त आहे. हा कर पैसे काढल्यावरच भरावा लागतो.
कर्जरोखे आधारित योजना:
अशा योजनेत केलेली गुंतवणूक जर ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी काढली तर होणारा फायदा हा उत्पन्नामध्ये वाढवला जातो व त्यावर तुमच्या आयकर आकारणीनुसार कर भरावा लागतो.
मात्र जर पैसे ३ वर्षे पूर्ण झाल्यावर काढले तर इंडेक्ससेशनचा फायदा मिळतो व उरलेल्या रकमेवर २०% दराने कर भरावा लागतो जो अत्यल्प असतो. म्हणून हा पर्याय बँक एफडीला उत्तम मनाला जातो.
म्युचुअल फंडातून दिल्या जाणाऱ्या लाभांशाच्या रकमेतून मुळातच डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स कापून सरकारकडे भरावी लागत असल्यामुळे गुंतवणूकदाराच्या हातात मिळणारा लाभांश हा त्याला करमुक्त असतो. इक्विटी योजनेला हा दर १०% आहे तर डेब्ट योजनेला कारचा दर हा २८% एवढा आहे.
म्युचुअल फंडाच्या संतुलित प्रकारातील योजनेत बहुतांशी दर महिना किंवा त्रैमासिक तत्वावर लाभांश दिला जातो. उत्पन्न हवेमिळणाऱ्या करमुक्त लाभांशाची सरासरी वार्षिक ९% ते १२% एवढी असते. मात्र असा हा लाभांश नियमितपणे दिला जाईलच अशी कोणतीही खात्री योजनेत दिलेली नसते.
जर तुम्ही निवृत्त व्यक्ती असाल व जर तुम्हाला पेन्शन प्रमाणे नियमित करमुक्त उत्पन्न हवे असेल तर योग्य योजना निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.
Equity Linked Savings Schemes (ELSS) म्युचुअल फंडाच्या या प्रकारातील योजनेत व्यक्ती किंवा HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) गुंतवणूक करून आयकर कायदा १९६१ कलम ८०-सी अनुसार करपात्र उत्पन्नातून रु.१.५० लाखांपर्यंत वजावट घेऊ शकतो. या योजनेत सर्वात कमी म्हणजे फक्त ३ वर्षांचा लॉक इन पिरिअड असतो.