२. वायदे बाजाराची उपयुक्तता
डेरिव्हेटीव्ह चा मराठी अर्थ आहे व्युत्पन्न किंवा कृदन्त. मात्र प्रचलित अर्थ वायदेबाजार असा आहे. वायदेबाजारात व्यवहार करण्यापूर्वी एक करार केला जातो. एखादी वस्तू, शेअर, सिक्युरिटी थोडक्यात अशी गोष्ट जिच्यामध्ये खरेदी विक्री करता येऊ शकते आणि त्या वस्तूला भविष्यातसुद्धा काही कमी किंवा जास्त मूल्य असते ते आज माहित नसते मात्र आजच्या भावाने जर खरेदी किंवा विक्री केली तर ती जर फायदेशीर असेल तर होणारा फायदा भविष्यात किंमत कमी झाल्यास फायदा कमी होऊ नये म्हणून ज्याला मान्य असेल अश्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर भविष्यातील दाराचे जो करार केला जातो त्याला वायदा म्हणतात आणि त्यात आर्थिक व्यवहार आले कि तो वाजदेबाजार होतो.
वायदे बाजार कशासाठी?
आर्थिक व्यवहारात वायदेबाजाराचे अनन्यसाधारण महत्व असते. आर्थिकविश्वात वायदेबाजार हे एक जोखीम व्यवस्थापनाचे महत्वाचे माध्यम आहे, कारण वायदेबाजारामुळेच जोखीम वेगळी करता येते आणि तिचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा करता येतात. थोडक्यात वायदेबाजाराचा उपयोग हा विम्यासारखा केला जाऊ शकतो. वायदेबाजारातील जोखीमीचे हस्तांतरण करताना ज्या दोन व्यक्तीमध्ये हा करार केला जातो तेव्हा त्यातील जोखीमीची सर्व प्रकारची शक्यता पडताळून पाहणे, करार मान्य करण्यापूर्वी समजून घेणे हे दोघांसाठीही आवश्यक असते. यात एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे वायदेबाजारात संबंधित वस्तू, सेवा किंवा सिक्युरिटी हि फार महत्वाची गोष्ट असते. यामुळे संबंधित वास्तूच्या दरामध्ये होणारा बदल हीच या वायदेबाजारतील महत्वाची जोखीम असते.
उदा. समजा इन्फोसिसच्या शेअर्सच्या किंमतीबाबत वायदेबाजारात करार करावयाचा आहे, कारण इन्फोसिसच्या शेअरची किंमत हि रोजच कमी जास्त होत असते त्यामुळे वायदेबाजारात केलेल्या कराराची किंमतही रोजच कमी जास्त होणार हे सत्य मान्य केले पाहिजे. यासाठी आपली वायदेबाजारातील ओपन पोझिशन सतत मॉनिटर केली पाहिजे.
आता आपण पुढील प्रकरणातून वयदेबाजाराची जास्तीत जास्त माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू. वायदे बाजारात फ्युच्युअर्स आणि ऑप्शन्स असे दोन विभाग असतात यातील फ्युच्युर्सचा आपण प्रथम अभ्यास करू आणि नंतर ऑप्शन्स समजून घेऊ.