शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक पाहा़णी
सर्वसामान्य जनतेने म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम म्हणून स्वीकारले आहे व त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे कारण म्हणजे सुलभता व पारदर्शकता. त्याचप्रमाणे, एखाद्याकडे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते, तर कोणाकडे भरपूर भांडवल आहे परंतु पुरेसा वेळ नाही अथवा पुरेसा अभ्यास व चिकित्सक दृष्टी यांचा अभाव असतो. अशा सर्वांसाठीच म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे आकर्षक माध्यम बनले आहे. बरं यात गुंतवणूक करण्यासाठी फार मोठे भांडवलही लागत नाही. एकवेळ गुंतवणूक रुपये ५००० पासूनही करता येते अथवा दरमहा रुपये ५०० भरूनही गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे बँकांचे व्याजदर हेही आकर्षक राहिलेले नाहीत कारण ते ३.५% ते ८% एवढेच आहेत. शिवाय बँकेचे व्याजावर इन्कम टॅक्सही लागू असतो. तसेच महागाईही दरवर्षी साधारणपणे ४% तरी वाढतच असते. हे जगन्मान्य सत्य आहे की शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली असता त्यातून संपत्ती निर्माण होण्याची ताकद असते. फक्त तिचे व्यवस्थापन तज्ज्ञ व्यक्तींद्वारे होणे गरजेचे असते. बँक असो अथवा पोष्ट असो, त्यातील गुंतवणूक ही निश्चितच सुरक्षित असते. मात्र त्या गुंतवणुकीत,दरवर्षी वाढणार्या महागाईचा विचार करता, दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद मात्र नसते. प्रत्येकजण अपरिमित कष्ट करून पैसे मिळवत असतो पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की पैसा हासुद्धा पैसे निर्माण करू शकतो. पाहिजे असते ते थोडेसे नियोजन. There is no reward without risk.
अर्थात भरपूर पैसे मिळवावयाचे तर थोडा धोका हा स्वीकारावाच लागतो, पण तो धोका म्हणजे जुगार असू नये.
अमेरिकेत सन २००३मध्ये एक पाहा़णी करण्यात आली. जर एक डॉलर सन १८०२ साली चार वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवला असता तर दरवर्षी वाढणारी महागाई विचारात घेतल्यानंतर सन २००३मध्ये त्या १ डॉलर गुंतवणुकीची खरी किंमत काय झाली असती ह्या प्रश्नावर केलेल्या सदर पाहणीत मिळालेले उत्तर खालीलप्रमाणे होते.
गुंतवणुकीचा पर्याय | २०१ वर्षांनंतरगुंतवणुकीचे खरे मुल्य |
सोने | १.३९ डॉलर |
ट्रेझरी बिल | ३०१ डॉलर |
ट्रेझरी बाँड | १,०७२ डॉलर्स |
शेअर बाजार | ५,९७,४८५ डॉलर्स |
- Source: Jeremy Siegle, The Future for Investorsशेअर बाजारासंबधी गुंतवणुकितून दिर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद असते हे ऐतिहासीक सत्य आहे.
- शेअर बाजारासंबंधीत गुंतवणूकीतून मिळालेला परतावा हा निश्चित उत्पन्न देणारे गुंतवणूक सादनातून मिळालेल्या उत्पन्नाचे 550 पटीने जास्त मिळालेला आहे. (Treasury Bonds).