• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा
Mutual Fund Distributor having experience of more than 15 years. Share Market experience of more than 25 years. Author of "Mutual Fund - Swapnapurticha Rajmarg" Marathi book.
Page 4 of 11
« Previous 1 2 3 4 5 6 … 11 Next »

2. वायदे बाजाराची उपयुक्तता

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

२. वायदे बाजाराची उपयुक्तता

डेरिव्हेटीव्ह चा मराठी अर्थ आहे व्युत्पन्न किंवा कृदन्त. मात्र प्रचलित अर्थ वायदेबाजार असा आहे. वायदेबाजारात व्यवहार करण्यापूर्वी एक करार केला जातो. एखादी वस्तू, शेअर, सिक्युरिटी थोडक्यात अशी गोष्ट जिच्यामध्ये खरेदी विक्री करता येऊ शकते आणि त्या वस्तूला भविष्यातसुद्धा काही कमी किंवा जास्त मूल्य असते ते आज माहित नसते मात्र आजच्या भावाने जर खरेदी किंवा विक्री केली तर ती जर फायदेशीर असेल तर होणारा फायदा भविष्यात किंमत कमी झाल्यास फायदा कमी होऊ नये म्हणून ज्याला मान्य असेल अश्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर भविष्यातील दाराचे जो करार केला जातो त्याला वायदा म्हणतात आणि त्यात आर्थिक व्यवहार आले कि तो वाजदेबाजार होतो.

वायदे बाजार कशासाठी?

आर्थिक व्यवहारात वायदेबाजाराचे अनन्यसाधारण महत्व असते. आर्थिकविश्वात वायदेबाजार हे एक जोखीम व्यवस्थापनाचे महत्वाचे माध्यम आहे, कारण वायदेबाजारामुळेच जोखीम वेगळी करता येते आणि तिचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुद्धा करता येतात. थोडक्यात वायदेबाजाराचा उपयोग हा विम्यासारखा केला जाऊ शकतो. वायदेबाजारातील जोखीमीचे हस्तांतरण करताना ज्या दोन व्यक्तीमध्ये हा करार केला जातो तेव्हा त्यातील जोखीमीची सर्व प्रकारची शक्यता पडताळून पाहणे, करार मान्य करण्यापूर्वी समजून घेणे हे दोघांसाठीही आवश्यक असते. यात एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे वायदेबाजारात संबंधित वस्तू, सेवा किंवा सिक्युरिटी हि फार महत्वाची गोष्ट असते. यामुळे संबंधित वास्तूच्या दरामध्ये होणारा बदल हीच या वायदेबाजारतील महत्वाची जोखीम असते.

उदा. समजा इन्फोसिसच्या शेअर्सच्या किंमतीबाबत वायदेबाजारात करार करावयाचा आहे, कारण इन्फोसिसच्या शेअरची किंमत हि रोजच कमी जास्त होत असते त्यामुळे वायदेबाजारात केलेल्या कराराची किंमतही रोजच कमी जास्त होणार हे सत्य मान्य केले पाहिजे. यासाठी आपली वायदेबाजारातील ओपन पोझिशन सतत मॉनिटर केली पाहिजे.

आता आपण पुढील प्रकरणातून वयदेबाजाराची जास्तीत जास्त माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू. वायदे बाजारात फ्युच्युअर्स आणि ऑप्शन्स असे दोन विभाग असतात यातील फ्युच्युर्सचा आपण प्रथम अभ्यास करू आणि नंतर ऑप्शन्स समजून घेऊ.

Forward Contract read in Marathistock/share market in Marathi. mutualfundmarathi.comफॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट Read about stock market in Marathi. read about share market in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about mutual funds
Read more
  • Published in Futures
No Comments

1. वायदा बाजाराची तोंडओळख

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

१. वायदा बाजाराची तोंड ओळख

वायदेबाजाराबाबत थोडक्यात सांगावयाचे झाले तर कोणत्याही उत्पदनाची जी बाजारात किंमत असते ती एक तर कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकते. जर ती वस्तू किंवा उत्पादन तुमच्याकडे असेल तर त्याचा परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर/नफा क्षमतेवर होऊ शकतो. समजा तुमच्याकडे एबीसी कंपनीचे शेअर्स आहेत किंवा ५०० ग्राम सोने आहे आणि जर तुमच्याकडे असणाऱ्या वास्तूचे भाव वाढले तर तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही कारण हे तुमच्या फायद्याचे आहे मात्र जर कर किंमत कमी झाली तर तुमचे नुकसान होणार असते म्हणून वायदेबाजाराचा उपयोग करून तुम्ही तुमचे होणारे नुकसान टाळू शकता.

उदाहरणार्थ: एका शेतकऱ्याने तुरडाळीची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि आज बाजारात दर प्रति किलो रु. १०० एवढा आहे, त्याला भरपूर उत्पादन होणार अशी खात्री आहे आणि सध्याच्या दराने माल भविष्यात विकला तर त्याला चांगला फायदा होणार आहे असे दिसत आहे  मात्र माल तयार होण्यासाठी अजून ३ महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे त्याला भीती वाटत असते की अजून ३ महिन्यांनी जेव्हा तूरडाळ तयार होईल तेव्हा जर बाजारात मोठ्या प्रमाणात माल आला तर आपल्याला कमी भावात माल विकावा लागू शकेल. व त्यामुळे आपल्याला नुकसानही होऊ शकेल अशी त्या शेतकऱ्याला भीती वाटत असते. त्या शेतकऱ्याचा अंदाज आहे की  त्याच्या शेतातून सुमारे २०० क्विंटल म्हणजेच २०००० किलो तूरडाळ तयार होऊ शकेल. मग तो काय करू शकतो की वायदेबाजरात तो आत्ताच जो दर असेल उदा. रु. १०५ प्रति किलो या भावाने २०००० किलो तूरडाळ वायदेबाजारात (कमोडिटी एक्सचेंजवर) आजपासून ३ महिन्यांनी संपणाऱ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शॉर्ट करेल, जर तीन महिन्यांनी जेव्हा त्याची तूरडाळ तयार होईल आणि ती जर अपेक्षेप्रमाणे २०० क्विंटल एवढी उत्पादित झाली आणि तेव्हा जर तुरडाळीचा भाव प्रति किलो ७५ रु झाला तर वायदेबाजारातुन त्याला प्रति किलो ३० रुपये या दराने फायदा मिळेल म्हणून तेथे तो २०००० किलो तूरडाळ खरेदी करून फायदा मिळवून घेईल आणि त्याच्याकडील तूरडाळ बाजारभावाप्रमाणे ७५ रुपये प्रति किलो या दराने विकूनही त्याला जेवढा होणार होता तेव्हढाच नफा मिळेल. आणि जर बाजारात तुरडाळीचा भाव वाढला तर त्याला रोखीच्या बाजारात फायदा होईल त्यातून तो वायदेबाजारात झालेले नुकसान भरून काढेल आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला प्रति किलो १०० रुपये या दराने तुरडाळीचा भाव मिळून तो समाधानी राहील.

इतिहासात आर्थिक जगतात आणि आर्थिक वर्तमान पत्रामध्ये वायदा बाजारामुळे अनेक व्यक्तींना प्रचंड नुकसान झाले किंवा अनेक आर्थिक संस्था वायदा बाजारात व्यवहार करून नामशेष झाल्या अशा प्रकारच्या बातम्यांनी भरून गेलेली असत. मात्र गेल्या अनेक वर्षात मोठ्या संस्थात्मक आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांनी वायदा बाजाराचा यशस्वी वापर करून हा समज खोटा ठरविला आहे. आणि आता तर जगात दररोज वायदे बाजारात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होत असते.

मात्र आजही पुरेसा अभ्यास नसल्यामुळे आणि झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने अनेक छोटे गुंतवणूकदार वायदे बाजारातून मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसत असतात याचे प्रमाण जवळपास ९५% एवढे प्रचंड आहे. यासाठीच शक्यतोवर छोट्या गुंतवणूकदाराने वायदे बाजारात व्यवहार जेवढे टाळता येतील तेवढे टाळणे हेच इष्ट होईल.

जर तुम्हाला वायदेबाजारात व्यवहार करावयाचे असतील तर तुम्ही त्याचे पुरेसे ज्ञान अगोदर मिळवले पाहिजे आणि काही काळ म्हणजे किमान ६ महिने ते एक वर्ष फक्त वायदे बाजाराचा अभ्यास केला पाहिजे, आपले ट्रेंड पेपरवर लिहून ठेवा आणि त्यातून किती प्रमाणात नफा नुकसान होते ते तपासा. यासाठी NSE तुम्हाला व्हर्च्युअल ट्रेडिंगची सुविधा देते ज्यात कोणतीही गुंतवणूक करून तुम्ही तुमचे वायदे बाजाराचे ज्ञान अजमावू शकता. असे करून जेव्हा तुम्हाला खात्री होईल कि आपण वायदेबाजारात यशस्वीपणे ट्रेडिंग करू शकतो तेव्हाच ते तसे सुरु करा म्हणजे नुकसान होण्याचे प्रमाण कमी करता येईल.  

खरे पाहता वायदेबाजाराचा उपयोग आपले नुकसान कमी करण्यासाठी इन्शुरन्स सारखा करता येतो. उदा. तुम्ही शेअरबाजारात काही शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक केलेली असून बाजार वर गेल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य चांगले वाढलेले आहे आणि बाजारात काही प्रतिकूल वातावरणामुळे मंदीची चाहूल तुम्हाला लागलेली असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओतील ज्या शेअर्समध्ये फ्युच्युअर्स मधील एक लॉट च्या प्रमाणात शेअर्स असतील तर तो शेअर फ्युच्युअर्समध्ये विकून शांत बसा (अर्थात यासाठी आवश्यक ते मार्जिन तुम्हाला भरावे लागेल) आणि जर तो शेअर खरोखर खाली आला तर तुम्हाला फ्युच्युअर्स मधे केलेल्या व्यवहारांतून मोठा फायदा होईल आणि रोखीत घेतलेले असलेल्या शेअर्समध्ये नुकसान होईल पण झालेल्या फायदायतुन जर तुम्ही तेच शेअर्स परत विकत घेतलेत तर तुम्हाला कोणतेच नुकसान न होता तुमच्याकडे जास्त शेअर्स तयार होतील आणि भविष्यात जेव्हा बाजारात परत तेजी येईल तेव्हा तुम्हाला होणारा फायदा हा अनेक पटीने वाढल्याचे तुम्हाला दिसेल. मात्र जर तुमच्या अंदाजानुसार बाजार खाली आला नाही तर तुम्हाला फ्युचर्समधील पोसिशन लवकर सोडून द्यावी लागेल जेणेकरून नुकसान कमी करता येईल आणि त्याच वेळी तुमच्या रोखतील शेअर्सचे मूल्य वाढलेले असल्याने त्यात तुम्हाला फायदा झालेला असल्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही किंवा कमी असेल. जर मोठ्या प्रमाणात आणि अनेक क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जर तुमची मोठी गुंतवणूक असेल तर तुम्ही या केसमध्ये निफ्टी शॉर्ट करून तुमचा पोर्टफोलिओ इन्शुअर करू शकता. असा वापर तुम्ही वायदे बाजाराचा करू शकता.

वायदेबाजारात अनेक प्रकारची गणितीय सूत्रे, प्रमेय आणि चार्ट यांचा वापर ट्रेडिंगसाठी केला जातो हे जरा क्लिष्टच असते. मात्र अनेक मोठ्या संस्था, सरकार, कॉर्पोरेट, बँका, परदेशी अर्थसंस्था, मोठे गुंतवणूकदार, हे वायदेबाजाराचा प्रभावीपणे वापर करत असताता.

आज बाजारात अनेक व्यक्ती तुम्हाला असे सांगणाऱ्या भेटतील की ते वायदेबाजाराचे तज्ञ असून जर तुम्ही त्यांच्याकडे अमुक एक रक्कम गुंतवनली तर ते तुम्हाला दर महिना अगदी २% ते ५% कदाचित जास्तसुद्धा दराने पैसे तुमच्या गुंतवणुकीवर देण्याचे सांगतील. कृपया करून अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे अजिबात पैसे गुंतवू नका. त्यांच्या वतीने असे सांगणारे कदाचित तुमचे मित्र किंवा जवळचे नातेवाईकसुद्धा असू शकतात. पण तुम्ही त्यांना स्पष्टपणे नाही असे पहिल्याच भेटीत सांगितले पाहिजे. एक विचार करा जो तुमच्याकडून एक ठरविक रक्कम घेऊन जर त्यावर महिना ५% दराने पैसे देणार तर त्याला दर महिना किमान १०% ते १५% मिळवावे लागतील की नाही? आणि जर तो एवढा हुशार असेल तर तो त्याची छोटी रक्कम गुंतवूनही काही काळातच एक श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो मग स्वतःसाठी ट्रेडिंग करण्याचे सोडून तो तुमच्यासाठी हे का करेल? कारण या जगात कोणताही व्यवसाय करणारा माणूस हा प्रथम स्वतःसाठी पैसे मिळवण्यासाठी तो व्यवसाय करत असतो. त्यामुळे अशा व्यवहारात गुंतवणूकदाराची १००% फसवणूक होत असते हे लक्षात ठेवा. आजपर्यंत अनेक व्यक्ती अशाप्रकारे फसलेल्या तुमच्या आजूबाजूला असतील. एक लक्षात ठेवा की शेअरबाजारातून/कमोडिटी बाजारातून कोणीही कायमस्वरूपी ठराविक दराने पैसे देऊ शकत नाही, कारण यात जोखीम असते आणि प्रत्येकालाच यात नुकसान होण्याची शक्यता असते कारण कोणाचेच अंदाज तो कितीही हुशार असला तरी सदा सर्वदा बरोबर येऊ शकत नाहीत. आणि जर असे ५% महिना म्हणजे वार्षिक ६०% दराने पैसे मिळाले असते तर ७% वार्षिक दराने व्याज देणाऱ्या बँक बंद नसत्या का पडल्या हा विचार करा.

Introduction of derivatives read in Marathistock/share market in Marathi. mutualfundmarathi.comवायदा बाजाराची तोंडओळख Read about stock market in Marathi. read about share market in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about mutual funds
Read more
  • Published in Futures
No Comments

उपलब्ध रिसर्च

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

Pre-market open view Opening Bell (मार्केट सुरु होण्यापूर्वी): रोज सकाळी बाजार उघडण्यापूर्वी तुम्ही भारतीय तसेच अमेरिकन बाजाराचे विश्लेषण, महत्वाच्या घडामोडींचा मागोवा, महत्वाचे इंडेक्स व मोठ्या कंपन्यांचे शेअर्स बाबत टेक्नीकल दृष्टिकोन या गोष्टी पाहून समजून घेऊ शकता. याचा वापर तुम्ही तुमच्या गुंतवणूक निर्णयासाठी करून घेऊ शकता.

Daily Technical: अल्प कालीन गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण व सांखिकी विश्लेषणावर आधारित ३ शेअर्स सुचवले जातात.

Daily Derivative: येथे फ्युचर्स व ऑप्शन ट्रेडिंग साठी ताज्या घडामोडी, बाजाराची दिशा, टेक्नीकल व अन्य घटकांचा बाजारावर होणारा परिणाम विचारात घेऊन ट्रेडिंग डावपेच दिले जातात.

Advanced Derivative Strategies: वायदेबाजारासाठी सोपी करून दिलेले ट्रेडिंग डावपेच, जसे कि स्प्रेड व कव्हर्ड कॉल्स. Short – Medium term recommendations (अल्प काळासाठी शिफारस)

Stock Picks: कंपनीबाबत तपशीलवार रिपोर्ट: कंपनीचा व्यवसाय, भविष्यातील संधी आणि शेअर्सचे किंमतीचा अंदाज समजण्यासाठी पायाभूत अहवाल दिला जातो.

Intra-day Technical recommendations

Derivative Calls: टेक्नीकल विश्लेषण व शेअर्स संबंधित बातमी किंवा अपेक्षित बातमीचा विचार करून वायदेबाजारात ट्रेडिंगसाठी शिफारस दिली जाते.

Weekly Technical: एक आठवड्याचासाठीच गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण व सांखिकी विश्लेषणावर बाजाराचा कल व टेक्नीकल इंडिकेटर वर आधारित शेअर्स सुचवले जातात.

Weekly Derivatives: एक आठवड्याचासाठीच गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण, पायाभूत विश्लेषण, व सांखिकी विश्लेषणावर बाजाराचा कल, चढ उतार, ओपन इंटरेस्ट व टेक्नीकल इंडिकेटर वर आधारित एक आठवड्यासाठी वायदेबाजारात ट्रेडिंगसाठी शेअर्स सुचवले जातात.

Pick Of The Week: प्रयेक आठवड्यात टेक्नीकल विश्लेषण आणि/किंवा पायाभूत विश्लेषण यावर आधारित असा एक शेअर सुचवला जातो कि जो साधारणपणे पुढील तीन महिन्यात १०% नफा मिळवून देऊ शकेल.

Stocks On Move: सौदा करणाऱ्यांची विचार करण्याची भावना समजून पुढील १५ दिवसात ज्या शेअरच्या किंमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असेल असा शेअर या विभागात सुचविला जातो.

Monthly Technicals: येथे तुम्हाला एक महिन्याचा कालावधी विचारात घेऊन टेक्निकल कल, टेक्नीकल इंडिकेटर्स व सांखिकी माहितीवर आधारित शेअर एक महिन्यासाठी सुचवला जातो.

Equity Model Portfolio: येथे तुम्हाला तुमची जोखीम स्वीकारण्याची– कमी जोखीम, मध्यम जोखीम किंवा जास्त जोखीम जशी तयारी असेल त्यानुसार तयार केलेला आदर्श पोर्टफोलिओ गुंतवणुकीसाठी सुचवला जातो.

High Dividend Yield Stocks: जर तुम्हाला नियमितपणे चांगला लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावयाची असेल तर त्याबाबत माहिती येथे दिली जाते.

मला तुमच्या मार्फत 3-in1 Account उघडावयाचा आहे तर काय केले पाहिजे? उत्तर: तुम्ही जगाचे पाठीवर जरी कोठेही रहात असलात तरी आमचे मार्फत तुम्ही सहजपणे 3-in1 Account चालू करू शकता. प्रथम तुम्ही मला sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करून तुमची आमचे मार्फत 3-in1 Account चालू करण्याची इच्छा व्यक्त करा, यामध्ये तुमची जास्तीत जास्त माहिती द्या, मोबाईल नंबर कळवा मी तुम्हाला फोन किंवा व्हिडीओ कॉल करून आपण एकमेकांशी संवाद साधू, आमचे मार्फत अकाऊंट उघडण्याचे फायदे मी तुम्हाला समजावून सांगेन यानंतर जर तुम्हाला अकाऊंट उघडावयाचा असेल तर आम्ही तुम्हाला पोस्ट किंवा कुरिअरने फॉर्म पाठवू सोबत तपशीलवार सूचना असणारे पत्रही असेल त्याप्रमाणे सह्या करून सोबत पत्रात लिहिल्याप्रमाणे कागदपत्रे व फॉर्म आम्हाला पोस्ट किंवा कुरिअरने रवाना करा, साधारण १५ ते २० दिवसात तुमचा अकाऊंट उघडला जाईल व तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग सुरु करू शकाल.

Stock/share market analysis read in Marathistock/share market in Marathi. mutualfundmarathi.comशेअरबाजार उपलब्ध रिसर्चRead about stock market in Marathi. read about share market in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about mutual funds
Read more
  • Published in Demat
No Comments

मिळणाऱ्या सेवा

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

On- The – Move तुम्ही icicidirect.com च्या वेबसाईटचा वापर करून अति जलद ट्रेड करू शकता. यासाठी तुम्ही संगणक किंवा मोबाइलचा हि वापर करू शकता. डेटा कार्ड किंवा GPRS चा वापर करूनही ट्रेड करू शकता.

Call-n-Trade जर यदा कदाचित तुम्हाला लॉग इन करणे शक्य नसेल तर Call N Trade service व्दारे टेलिफोन वरूनही तुम्ही ट्रेडिंगची ऑर्डर देऊ शकता.

ICICISecurities Equity Advisory Services जर आपण जास्त रकमेची गुंतवणूक किंवा ट्रेडिंग साठी वापर करणार असाल तर तुम्हाला विशेष सेवा देण्यासाठी एक सल्लागार नेमून दिला जातो तो तुम्हाला तुमचे गुंतवणूक किंवा ट्रेडिंगचे व्यवहार करण्यासाठी मदत करतो अधिक माहितीसाठी equityadvisory@icicidirect.com येथे संपर्क करा

ICICIdirect Institute ICICIdirect Knowledge Programs या सुविधेचा लाभ तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला शेअर्स, वायदेबाजार, म्युचुअल फंड, आय.पी.ओ., स्मॉल सेव्हिंग्ज, विमा, रोखे या गुंतवणूक साधनांची विस्तृत माहिती घेता येऊ शकेल. यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय समजून उमजून घेऊ शकाल तसेच तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन सहजपणे करू शकाल.

High Quality Research ICICI Securities Ltd. तुम्हाला उत्तम दर्जेदार रिसर्च सुविधा प्रदान करते याचा वापर करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता. हे रिसर्च तुमच्या गरजेनुसार अल्पकाळासाठी, मध्यम कालावधीसाठी व दीर्घ कालावधीसाठी ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त आहे.

ICICI Securities ATS हि सुविधा ज्यांना पूर्ण रिसर्च करून गुंतवणूक करावयाची इच्छा असेल त्यांचेसाठी आहे अधिक माहितीसाठी मेल करा atshelpdesk@icicisecurities.in

Read about stock market in Marathi. read about share market in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about mutual fundsServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in Marathi. mutualfundmarathi.comआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा
Read more
  • Published in Demat
No Comments

३-इन-वन अकाउंट उघडण्याचे फायदे काय?

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

मार्गदर्शनासाठी तुम्ही आयसीआयसीआय च्या रिसर्चचाही वापर करू शकता. येथे तुम्हाला अल्प काळासाठी तसेच दीर्घ काळासाठी कोणते शेअर्स खरेदी करावेत, टार्गेट व कालावधी इ. माहिती दिलेली असते.

आमचे बाबत:

आम्ही ICICI Securities सोबत अधिकृत प्रतिनिधी {Authorised Person(AP)} म्हणून ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस या ट्रेड नावाने संलग्न आहोत. आमचे ऑफिस चिपळून, रत्नागिरी येथे आहे. आम्हाला गेल्या दोन दशकांचा शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचा अनुभव आहे त्याचप्रमाणे म्युचुअल फंड वितरण व योग्य योजना विकण्याचा तेवढाच अनुभव आहे. संपूर्ण देशात, मोठ्या संख्येने आमचे ग्राहक आहेत, महाराष्ट्रात तर जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आमचे ग्राहक असून ते सर्वच आमचे कडून मिळणारे सेवेमुळे समाधानी आहेत.

ICICI Securities बाबत: ICICI Securities Ltd हि देशातील एक अग्रेसर सर्व प्रकारच्या सेवा देणारी गुंतवणूक बँक असून, कॉर्पोरेट फायनान्स, निश्चित उत्पन्न देणारी साधने आणि समभाग या सर्वच प्रकारातील साधनात गुंतवणूक व ट्रेडिंग करण्याची सुविधा देणारी एक नावाजलेली संस्था म्हणूनच ओळखली जाते. ICICI बँकेची हि एक उप कंपनी आहे. या संस्थेव्दारे विविध प्रकारच्या, गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापन आणि कर्ज इ. आर्थिक सेवा दिल्या जातात. ICICI Securities हि National Stock Exchange (NSE) आणि the Bombay Stock Exchange (BSE) या दोन्ही आघाडीच्या एक्स्चेंजच्या रोखीतील व वायदेबाजारात व्यवहार करण्यासाठी नोंदणीकृत सभासद आहे.

ICICI Securities मार्फत उपलब्ध उत्पादने: आमचे मार्फत खाते उघडल्यावर आपण NSE व BSE वर नोंदणीकृत असणाऱ्या शेअर्स तसेच म्युचुअल फंड्स, रोखे, IPOs/FPOs, NCDs, या अन्य आर्थिक उत्पादनात गुंतवणूक करू शकता त्याचप्रमाणे गृह कर्ज, सिक्युरिटी तारण कर्ज या सेवेचाही लाभ घेऊ शकता. ICICI Securities मार्फत खाते उघडल्यावर तुम्हाला खालील प्रकारचे लाभ मिळतात:

Seamless Trading सेटलमेंट सायकल पाहणे, चेक लिहणे, तुमच्या सूचना देणे इत्यादी पासून मुक्ती मिळून तुम्ही अत्यंत सुलभपणे शेअर्सची खरेदी विक्री करू शकता. Security आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यात शिल्लक असणारे रकमेतूनच तुम्ही शेअर्सची खरेदी करू शकता. तसेच जेव्हा तुम्ही शेअर्सची विक्री करता तेव्हा पैसे आपोआप तुमच्या बचत खात्यात जमा होतात. म्हणून तुमच्या बँकेतून ब्रोकरचे खात्यात पैसे ट्रान्सफर करणे किंवा चेक देणे, पे आउट साठी सूचना देणे अन्य त्रासांपासून तुम्हाला पूर्ण मुक्ती मिळते. Wide range of products NSE and BSE, वर शेअर ट्रेडिंग कण्यासाठी – Margin,

MarginPlus, BTST, SPOT. Derivatives trading, इ. सुविधा वापरून उपलब्ध कोणत्याही साधनात व्यवहार करू शकता. तसेच म्युचुअल फंड, विमा इ. चा गुंतवणुकीसाठी वापर करू शकता.

Award Winning Research ICICI Securities Ltd. जाणून आहे किं गुंतवणुकीच्या कोणत्याही निर्णयासाठी चांगल्या संशोधनाची (रिसर्च) गरज असते म्हणूनच या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते.

CNBC Awaaz Consumer Awards, 2007 या पुरस्कारासाठी लोकांचे मतानुसार सर्वात जास्त पसंतीचा आर्थिक सल्ला देणारी आस्थापना म्हणून ICICI Securities Ltd. निवड केली गेली होती……

Control तुम्ही दिलेली खरेदी किंवा विक्रीची ऑर्डर जशीच्या तशी कोणताही बदल न करता एकस्झीक्यूट केली जाईल याची खात्री बाळगा. यामुळे तुमचे मर्जीनुसार तुम्हाला व्यवहार करता येतो.

Tracking and Review गुंतवणूक करण्याएवढेच किंबहुना यापेक्षाही जास्त महत्वाचे असते ते म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा मागोवा ठेवणे आणि यासाठीच ICICI Securities तुम्हाला देते तुमचा पोर्टफोलिओ एकत्रितपणे केव्हाही व कोठूनही पाहण्याची सुविधा. त्याचप्रमाणे वॉचलिस्टचा वापर करू शकता यामुळे तुम्ही SMS अलर्ट सुद्धा प्राप्त करू शकता याचा उपयोग तुम्ही गुंतवणुकीचे निर्णयासाठी करू शकता.

३-इन-वन अकाउंट उघडण्याचे फायदे काय?icici bank savings account + icici demat + icici securities trading accounticici directRead about ICICI 3-in-one accountRead about stock market in Marathi. read about share market in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about mutual fundsstock/share market in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Demat
No Comments

शेअर्स खरेदी विक्री कशी करता येईल?

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

एकदा का तुमचे खाते उघडून झाले कि तुम्हाला शेअर्स, म्युचुअल फंड, रोखे, आय.पी.ओ. इ. बाबतची माहिती देण्यात येईल. शेअर ट्रेडिंग/गुतंवणूक कशी करावी, शेअर बाजारातून नियमितपणे फायदाच कसा मिळवावा याचे मार्गदर्शन केले जाईल.

४) शेअर्स खरेदी विक्री करताना तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असल्यास आपण फोन करून केव्हाही माहिती घेऊ शकता.

५) एकदा का व्यवहार (ट्रेड) केला कि तुम्हाला ICICI Securities मार्फत एस.एम.एस./इमेल पाठवला जाईल त्यात तुम्ही केलेल्या ट्रेडचा सारा तपशील दिला जाईल.

६) तुम्ही २४/७ केव्हाही लॉग इन करून तुमच्या खात्याचा सर्व तपशील पाहू शकता किंवा हवे ते रिपोर्टसुद्धा पाहू शकता.

७) तुम्ही जर बाजाराचे वेळेत (सकाळी ९.१५ ते सायंकाळी ३.३० पर्यंत) वेळेअभावी ट्रेडिंग करू शकत नसाल तरी काळजी करण्याचे कारण नाही कारण तुम्ही दिवसाचे कोणत्याही वेळी तुमच्या सवडीनुसार VTC (Valid Till Cancellation) या सुविधेचा वापर करून शेअर्स अथवा अन्य उपलब्ध साधनात खरेदी विक्री ची ऑर्डर देवू शकता, उदा. आज सायंकाळी तुम्ही विविध कंपन्याचे शेअर्सचे भाव टी.व्ही. वर पाहिलेत, मारुतीचा शेअर तुम्हाला खरेदीसाठी आकर्षक वाटला व तुम्ही एका ठराविक दराने मारुती मोटर्स चा शेअर खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही तशी ऑर्डर रात्री झोपण्यापूर्वी केव्हाही लावू शकता अशी दिलेली ऑर्डर १ ते ३ महिने शाबूत राहू शकते व जर या काळात तुम्ही दिलेल्या दाराला जर मारुती मोटर्सच्या शेअरचा भाव कधीही आला तर तो तुमच्या ट्रेडिंग खात्यात घेतला जाईल. समजा तुम्ही आज असणारे दाराचे १०% कमी दराने तो शेअर खरेदी करण्याची ऑर्डर लावली व तो तसा आला कि लगेच तुमच्या खात्यात जमा होईल २ दिवसांनी तो शेअर तुमचे डिमॅट खात्यात जमा होईल यानंतर परत तो १०% वरच्या किमतीने तुम्ही परत विक्रीसाठी VTC ऑर्डर लावली व दर जर १०% शेअरची किंमत वर गेली तर तो शेअर आपोआप विकला जाईल व तुम्हाला फायदा मिळेल. ८) आपण संगणक किंवा मोबाईलचा वापर करून ट्रेडिंग करू शकता.

About how to buy and sale shares read in Marathiabout how to trade in shares/stocksRead about stock market in Marathi. read about share market in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about mutual fundsstock/share/equity market in Marathi. mutualfundmarathi.comशेअर्स खरेदी विक्री कशी करता येईल?
Read more
  • Published in Demat
No Comments

3-In-1 Account

Thursday, 27 December 2018 by Sadanand Thakur

आमचे मार्फत ICICI Securities चा unique 3-in-1 Account उघडा!

३-इन-वन अकाउंट म्हणजे काय?

यामध्ये तुम्हाला मिळते आयसीआयसीआय चे बचत खाते + आयसीआयसीआय चा डिमॅट खाते + ऑनलाईन शेअर ट्रेडिंग खाते याचा वापर करून आपण सुलभपणे शेअर ट्रेडिंग करू शकता. या सुविधेचा वापर करून तुम्ही बँकेचे व्यवहार, शेअर ट्रेडिंग, कंपनीचे शेअर्स मध्ये अथवा म्युचुअल फंडात सुलभपणे गुंतवणूक करू शकता, तसेच वेगवेगळ्या विमा योजना, सरकारी रोखे, आय.पी.ओ. आदी साधनातहि गुंतवणूक करू शकता, तसेच आपण केलेल्या गुंतवणुकीचे मुल्यांकन एकाच ठिकाणी पाहू शकता, वेगवेगळे रिपोर्टहि पाहू शकता.

एकच फॉर्म भरून आपणास हि सुविधा प्राप्त होते. ३-इन-वन अकाउंट कसे उघडावे?

१) आम्हाला संपर्क करा.

२) आमचा प्रतिनिधी आपणास संपर्क करून आपले 3-in-1 account खाते उघडण्यास मदत करेल.

३-इन-वन अकाउंट म्हणजे काय?icici bank savings account + icici demat + icici securities trading accounticici directRead about ICICI 3-in-one accountRead about stock market in Marathi. read about share market in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about mutual fundsstock/share market in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Demat
No Comments

म्युचुअल फंड म्हणजे काय?

Wednesday, 26 December 2018 by Sadanand Thakur

“श्रद्धा और सबुरी – सबुरीका फल हमेशा मिठाहि होता है”.

म्युचुअलफंडाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचे कडे पैसे हि असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेश्या प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. शेअर बाजारात स्वतः गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल्स अॅनेलिसीस व  फंडामेंटल अॅनेलिसीस करता येणे गरजेचे असते, त्याच प्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दिर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. या व्यतिरिक्त आपण शेअर बाजारात व्यवहार करत असताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.

आपल्या देशात प्रथमत: भारत सरकारचे सहभागाने युनिटट्रस्ट ऑफ इंडियाचा असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मध्ये करण्यात आली. आपल्या पैकी बरेच जणांनी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हीच भारतातील पहिली म्युचुअल फंड कंपनी. १९८६ मध्ये सार्वजनिक बँकांना म्युचुअल फंड स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली.१९९३ पासून खाजगी म्युचुअल फंडांना परवानगी मिळाली. सध्या आपल्या देशात ४३ म्युचुअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा एकटे नसता.जेव्हा तुम्ही म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्या सारखी अनेकजण त्या योजनेत गुंतवणूक करत असतात यामुळे एक मोठी रक्कम (शेकडो करोड रुपये) त्यायोजनेत जमा होत असतात.यामुळे फंडमॅनेजरला अनेकविविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात. यामुळेच दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडातून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.

तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक केली कि तुमच्या सारख्या ध्येय असणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैशा सोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात तुम्हाला युनिट्स अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मूल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिट्स) मग हे पैसे म्युचुअल फंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स, डिबेंचर्स ते मनीमार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवतात. त्याला कॅार्पस किंवा असेटस अंडर मॅनेजमेंट या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणुकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मूल्य (NAV) जाहीर केले जाते. म्युचुअल फंडाची संपूर्ण माहिती AMFI च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग  (शेअर ), गुंतवणुकदार या युनिट्सचा मालक असतो.

NAV = Net Asset value  म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.

Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV

शेअर बाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकन सुद्धा वाढते, या उलट जर शेअर बाजाराखाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मूल्यांकन सुद्धा कमी होते. हि अशी मूल्य वृद्धी किंवा मूल्य घट शेअर बाजाराच्या काळाप्रमाणे नियमित पणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो. म्हणून रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पाहत बसू नये तर वर्ष सहामहिन्यातून कधी तरी एकदाच पहावे. म्युचुअलफंडात गुंतवणूक केल्यावर संयमाची आवश्यकता असते. यासाठी श्री साईबाबांचे एक वचन श्रद्धा और सबुरी हे कायम लक्षात ठेवावे. जर का तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी केली तर प्रत्येकालाच येथे पैसे मिळतात, नशीब वैगरे काही लागत नाही. म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदी गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवावी. म्युचुअल फंडात नियमित दर महिना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.तेजी मंदी हा शेअर बाजारचा अविभाज्य भागच आहे मात्र दीर्घ मुदतीत तोवरच जात असतो. एक लक्ष्यात ठेवा कि सेन्सेक्स १९७९ साली १०० अंकांनी सुरु झाला तो दिनांक 20 जुलै २०१८ रोजी ३६४९६ च्या पेक्ष्या जास्त झाला होता. गेल्या ३८ वर्ष्यात सेन्सेक्सने वार्षिक १७% चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे कि जरी सेन्सेक्सचा प्रवास १०० ते ३७५०० असा झालेला असला तरी तो सतत वर गेलेला नाही.या कालखंडात बाजाराने अनेक मोठे चढ उतार पाहिलेले आहेत.तसे पहिले तर बाजार रोजच वर खाली होतच असतो त्यामुळे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे मुल्यसुद्धा रोजच कमी जास्त होत असते. सेन्सेक्सच्या प्रवासातील महत्वाचे काही टप्पे:

१)     सेन्सेक्सची सुरुवात वर्ष १९७९-१०० अंक

२)     वर्ष १९९२ मसली सेन्सेक्सने ४५०० अंकांचा टप्पा पार केला, येथे हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीला आला व अल्पावधीतच तो १५०० अंकांपर्यंत खाली आला पण त्याच वर्षी तो परत २५०० पर्यंत वाढत गेला. बाजारातील हि मोठी तेजी व मंदी.

३)     वर्ष २००० सेन्सेक्सने ६३०० अंकांचा टप्पा पार केला, येथे जागतिक स्तरावर आयटी बबल फुटला व अल्पावधीतच तो २१०० अंकांपर्यंत खाली आला. बाजारातील हि दुसरी मोठी तेजी व मंदी.

४)     वर्ष २००० ते जानेवारी २००८ पर्यंत सेन्सेक्सने २१०० ते २१००० अंक हा टप्पा पार करत गुंतवणूकदारांना फक्त ७/८ वर्षातच १० पट परतावा दिला. याला अर्थात मोठे कारण होते ते म्हणजे FII (परकीय संस्थात्मिक गुंतवणुकदार) ची भारतीय शेअर बाजारातील मोठा सहभाग. २००८ साली अमेरिकेतील सब-प्राइम घोटाळाबाहेर पडला, यामध्ये लेहमन ब्रदर्स सारखी १५० वर्षे जुनी अर्थसंस्थासुद्धा दिवाळखोरीत निघाली,अनेक बँका अडचणीत आल्या, याचा परिणाम जगातील सर्वच शेअर बाजारावर झाला व आपल्याकडील FII (परकीय संस्थात्मिक गुंतवणुकदार) यांनी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली याचा परिणाम स्वरूप मार्च २००९ मध्ये सेन्सेक्सची ७६०० अनाकांपर्यंत घसरण झाली. बाजारातील हि तिसरी मोठी तेजी व मंदी.

५)     वर्ष २००९ मध्ये एप्रिल महिन्यात अमेरिकन सरकारने बँकांना मोठ्या प्रमाणावर बेलआउट  पॅकेज दिले तसेच भारतात श्री. मनमोहनसिंग यांचे नेतृत्वाखालील स्थिर सरकार आले याचा सकारात्मक परिणाम होऊन वर्ष २००९ अखेरपर्यंत बाजाराने १८००० अंकांचा टप्पा परत एकदा पार केला.

६)     यानंतर वर्ष २०१० ते २०१३ या कालखंडात संपूर्ण जगातच एकूण मंदीचे वातावरण होते याला जोड मिळाली ती आपल्या देशातील राजकीय परिस्थितीची, यामुळे या काळात सेन्सेक्स १५००० ते २१००० या दरम्याने वर खाली होत होता.

७)     वर्ष २०१३-१४ मध्ये राजकीय परिस्थिती बदलली व बाजारात परत तेजीचा माहोल सुरु झाला व २०१६ मध्ये सेन्सेक्सने २९००० पेक्षा जास्तची उच्चतम पटली सर केली. याचवेळी जागतिक बाजारात कामोडीटीच्या किमतीनी नीचांक गाठला, क्रुडऑइलच्या किंमती तर २५ डॅालर प्रती बॅरल पर्यंत खाली उतरल्या,याला भर म्हणून चीनमध्ये मंदी आली, चीनची अर्थव्यवस्था प्रम्य्ख्याने एक्सपोर्टवर अवलंबून आहे व जागतिक बाजारात चीनी उत्पादनाना मागणी कमी झाली, एक्सपोर्टला आधार मिळावा म्हणून चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केले,जागतिक बाजाराने हे निगेटिव्ह घेतले परिणाम स्वरूप सेन्सेक्स २०००० पर्यंत खाली आला.

८)     वर्ष २०१७ च्या अखेरीला बाजारात परत एकदा तेजी सुरु झाली व जानेवारी २०१८ अखेरीला सेन्सेक्सने ३६५०० ची उच्चतम पातळी पार केली याच वेळी भारत सरकारने बजेट २०१८ मध्ये LTCG कर सुरु केला आणि अमेरिकेतही बॉड यील्ड वाढले या दोन गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून तो ३२५०० पर्यंत खाली आला व आज तो ३६५०० च्या आसपास आहे.

तर हा असा राहिला सेन्सेक्सचा प्रवास, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच कि दीर्घ मुदतीत सेन्सेक्सचा आलेख चढतच राहिलेला असून, तेजी-मंदीच्या एका आवर्तनांनंतर आलेल्या पुढील तेजीत प्रत्येक वेळीच सेन्सेक्सने मागील उच्चांक मोडून एक नवीन उच्चांक सर केलेला आहे. आणि म्हणूनच प्रत्येकानेच शेअर बाजारात म्युचुअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्यासाठी व गुंतवणुकीच्या इतर साधनांपेक्षा जास्त परतावा मिळावा म्हणून दीर्घ मुदतीत गुंतवणूक केलीच पाहिजे.

Read about Mutual Fund in Marathi. read about Mutual Fund in Marathi. understand what is a mutual funds in Marathi. Learn about mutual fundsServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in Marathi. mutualfundmarathi.comआमच्याकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा
Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

शेअर बाजाराची तोंड ओळख

Wednesday, 26 December 2018 by Sadanand Thakur

तेजी व मंदी – शेअर बाजाराचा अविभाज्य घटक :


एक महत्वाची  गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि बाजारात नियमितपणे चढ उतार होतच असतात, तसेच ८/१० वर्षात एक मोठी तेजी येत असते व तेजी  पाठोपाठ एक मोठी मंदीही येत असते. तेजीच्या कालखंडात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणावर वाढते व मोठ्या मंदीच्या काळात ते परत कमी होत असते. मात्र शेअर बाजाराचा अभ्यास करताना असे दिसून आले आहे कि शेअर बाजारात तीन प्रकारचे कल प्रामुख्याने असतात – तेजीचा कालखंड, मंदीचा कालखंड व साइड-वे (बाजार एका ठराविक मर्यादेत वर खाली होतो ) कालखंड, या तिन्हीमध्ये मंदीचा कालखंड हा सर्वात कमी असतो. जो गेल्या पन्नास वर्षात सरासरी ९ महिने एवढाच आहे. या कालखंडात आपण आपले गुंतवलेले पैसे काढू तर नयेतच उलट शक्य असल्यास जास्त रकमेची गुंतवणूक करावी कारण मंदी नंतर तेजी येतेच व तेजीच्या काळात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य जास्त प्रमाणात वाढते.


तेजीचा कालखंड: हा कालावधी सर्वात जास्त काळाचा असतो जो किमान ३ वर्षे व जास्तीत जास्त ५ वर्षाचा असतो. या कालखंडात गुंतवणुकीचे मूल्य जवळपास सतत वाढत असते , हा कालखंड आनंद देणारा असतो. या कालखंडात सर्वात जास्त लोक शेअर बाजारात सतत गुंतवणूक करत असतात म्हणजेच कंपन्यांचे शेअर्सला पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते म्हणून शेअर्सचे भाव सतत वाढत असतात कोणत्याही वस्तूचे बाबतही हेच घडत असते, जेव्हा बाजारात त्या वस्तूचा तुटवडा असतो तेव्हा दर वाढतात व जेव्हा बाजारात मालाचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो तेव्हा दर कोसळतात म्हणूनच कधी आपण कांदा ५ रूपये किलोने विकत घेतो तर तो कधी १०० रुपये किलोने विकत घ्यावा लागतो. तेच तूर डाळीचे बाबत गेल्या वर्षी तुरडाळ २०० रुपये किलोने विकली जात होती यंदा ती ६० -७० रुपये किलोने मिळत आहे . हीच गोष्ट शेअर बाजारालाही लागू पडते हे समजून घेतलेत म्हणजे शेअर बाजाराची भीती दूर होईल व तुमचा संपती निर्माण कारण्याचा राजमार्ग तुम्हाला खुला होईल.


मंदीचा कालखंड: ज्या प्रमाणे तेजीत शेअर्सचे भाव वाढतात कारण सारेच जण शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात तसेच जेव्हा सर्वच गुंतवणूकदार काही कारणामुळे त्यांचेकडील शेअर्स विकण्याचा मानसिकतेमध्ये असतात तेव्हा खरेदीसाठी मात्र थोडेच उत्सुक असतात मग हळूहळू शेअर्सचे भाव कोसळू लागतातव बाजारात मंदी येते. पण हा मंदीचा काळ गेल्या ५० वर्षात सरासरी ९ महिने एवढाच आहे. याच काळात गुंतवणूक दाराला कमी भावात युनिट्स मिळत असल्याने जास्त युनिट्स मिळतात व याचा फायदा पुढील तेजीमध्ये होतो. या काळात जास्तीत जास्त रकमेची गुंतवणूक करावी कारण मंदी ही गुंतवणुकदारासाठी एक सुवर्णसंधीच असते.
साइड–वे  चा कालखंड: या कालखंडामध्ये शेअर्स बाजार एका ठराविक मर्यादेत वर खाली होत असतो, ज्याप्रमाणे २०११ ते २०१३ या तीन वर्षात सेन्सेक्स १५००० ते  २१००० या मर्यादेत वर खाली होत होता.

about how to trade in shares/Read about shares market in Marathi. read about share market in Marathi. understand mutual funds and share market in Marathi. Learn about mutual fundsIntroduction of shares market read in Marathistock/share/equity market in Marathi. mutualfundmarathi.comशेअर्स बाबत माहिती मिळवा.
Read more
  • Published in About Mutual Fund
No Comments

७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?

Monday, 24 December 2018 by Sadanand Thakur

प्रकरण ७ वे

७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?

कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीच्या संबधीत विवीध रेशो पहाणे गरजेचे असते. विवीध रेशोंचे विश्लेषण करताना त्या कंपनीची एकंदर कामगिरीचे मोजमाप करता येते व सर्वच रेशो जर गणितीदृष्ट्या योग्य असतील तर गुंतवणूक करताना आपली खात्री होते कि आपला गुंतवणूकीचा निर्णय योग्य असून आपण त्या शेअरच्या किंमतीत होणा-या चढ उतारामुळे आपले मन विचलीत होत नाही व चुकीच्या वेळी शेअर खरेदी अथवा विक्रीचा निर्णय आपण घेत नाही. उलट अशा शेअरची किंमत जर कमी झाली तर ती एक चांगली संधी समजून आपण त्या शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करतो व तेजीच्या काळात जास्त फायदा मिळवतो. दुसरा फायदा म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक हि दिर्घ मुदतीसाठीच जास्तकरुन फायदेशीर होते हे आपणास कळते व तसे आपण निर्णय घेतो.

पीएसआर (प्राइज टू सेल्स रेशो):

हा रेशो ३ पेक्षा कमी असलाच पाहिजे, खरं म्हणजे तो १ पेक्षाही कमी असेल तर चांगले. याच्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत व प्रती शेअर विक्री यांची तुलना करता येते. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे कि जर का पीएसआर ३ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान होण्याचीच शक्यता (खात्रीच म्हणाना) जास्त असते व जर हा रेशो १ पेक्षा कमी असेल तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते.

पीएसआर = शेअरची किंमत / प्रती शेअर मिळणारे मागील १२ महिन्याचे विक्रीचे उत्पन्न

उदा.: क्ष लि. ची गेल्या १२ महिन्यातील एकूण विक्री = रु.१०० कोटी

कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या १ कोटी

म्हणून प्रती शेअर विक्रीचे उत्पन्न रु.१००

कंपनीच्या शेअरचे बाजार मुल्य रु.७५ प्रती शेअर

पीएसआर = ७५/१००

= ०.७५

रिटर्न ऑन इक्वीटी:

याचा अर्थ तुमच्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो, वॉरेन बफेट म्हणतो जर का तुम्हाला २०% च्या दरम्याने मिळत असेल तर तो चांगला समजावा.

Return on Equity = Net Income/Shareholder’s Equity

डेब्ट – इक्वीटी रेशो:

हा रेशो कंपनीच्या स्वत:च्या भांडवलाशी कर्जाचे प्रमाण दाखवतो. कंपनीचे एकूण कर्ज / कंपनीचे एकूण शेअर भांडवल या सुत्राने हा काढला जातो. हा किमान ०.५ पेक्षा तरी कमी असणे उत्तम, परंतु १ असला तरी चालू शकते. मात्र जर का तो २ पेक्षा जास्त असेल तर धोक्याची घंटा समजावी. याचा अर्थ कंपनीला जास्त प्रमाणात कर्जावर व्याज द्यावे लागेल व त्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफा मिळवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल. म्हणून सगळेच कर्ज वाइट असते असे नव्हे जर का कर्जावरील व्याजाची फेड करुनही जर का कंपनीचा फायदा चांगल्या प्रमाणात होत असेल तर कंपनी कर्जाचा उपयोग विस्तारीकरणावर किंवा उलाढाल वाढीसाठी प्रभावीपणे करत आहे असे समजले जाते. मात्र पायाभूत सुवीधा पुरवणा-या कंपन्यांचे बाबत हा रेशो वापरणे योग्य नसते कारण त्यांची उभारणीच मुळी उच्च डेब्ट इक्वीटी रेशोवर केलेली असते कारण त्याना लागणारे भांडवलाचे प्रमाणच जास्त असते.

बेटा:

इंडेक्सच्या तुलनेत शेअरची किंमत किती अस्थीर आहे हे बेटा फँक्टरमुळे कळू शकते. जेवढा बेटा जास्त तेवढे शेअरच्या किंमतीत जास्त चढ-उतार संभवतात. तर जर बेटा उणे असेल तर समजावे कि तो बाजाराच्या कलाविरुध्द वाढ घट दाखवेल म्हणजेच जेव्हा बाजारात तेजी असेल तेव्हा अशा शेअरची किंमत मात्र कमी होते व बाजार खाली जात असताना याची किंमत वाढते. ह्याची गणना करणे हे फारच किचकट असल्यामुळे मी याचे सुत्र येथे देत नाही मात्र तो बीएसईच्या साईटवर रोजच्या रोज उपलब्ध असतो,

https://www.bseindia.com/indices/betavalues.aspx या संकेतस्थळावर तुम्हाला कंपनीचा बेटा पाहाता येईल.

प्रतीशेअर उत्पन्न(Earning per share – EPS)

याच्यामुळे कंपनी प्रतीशेअर किती उत्पन्न मिळवते हे समजून येते आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मिळणारे प्रती शेअर उत्पन्न हेच जास्त महत्वाचे असते. इपीएस = कंपनीचा निव्वळ नफा / कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या या सुत्राने इपीएस काढला जातो. उदा. क्ष लि. चे २ कोटी शेअर्स आहेत व नफा जर रु.६ कोटी असेल तर इपीएस होईल रु.३ प्रती शेअर. याच्यामुळे कंपनी अल्पकाळात व दिर्घ काळात कशी ग्रोथ (वृध्दी) त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत करते हे समजून येते. म्हणून गुंतवणूक करण्यापुर्वी त्या सेक्टरमधील सर्व कंपन्याचा इपीएसची तुलना करणे अत्यावश्यक आहे.

पी / इ रेशो

कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना फक्त इपीएस पाहून चालत नाही तर त्याच बरोबर त्याची तुलना शेअरच्या बाजारभावाशी करणेसुध्दा अत्यावश्यक असते. यासाठी पी ई रेशो पहाणे महत्वाचे असते. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना पी / ई रेशो हा महत्वाचा घटक असल्यामुळे आपण याची येथे जरा विस्ताराने व उदाहरणासह चर्चा करुया. पी / ई रेशो = शेअरचे बाजार मुल्य (किंमत) / गेल्या ४ तिमाहितील इपीएस उदा. क्ष लि. च्या शेअरचे बाजारमुल्य आहे रु.१०० आणि त्याचा इपीएस आहे रु.२० प्रती शेअर तर त्या शेअरचा पी ई होतो ५. कंपनीच्या इपीएस मध्ये नियमीतपणे जर मोठ्या प्रमाणावर वाढ होत असेल त्या शेअरची किंमतही वाढण्याचे ते एक महत्वाचे कारण होते. जर का त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत एखाद्या कंपनीच्या शेअरचा पी ई रेशो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो स्टॉक महाग असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. तेच जर पी ई कमी असेल तर तो शेअर गुंतवणूकीसाठी योग्य आहे असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. मात्र मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर ज्या शेअरचा पी ई रेशो जास्त आहे अशा शेअरची कामगिरी जास्त चांगली झालेली दिसून आलेली आहे. क्ष ह्या कंपनीचे सध्याचे प्रती शेअर उत्पन्न रु.१ असून त्या कंपनीची अपेक्षा आहे कि हे उत्पन्न भविष्यात वार्षीक २०% दराने वाढेल हे गृहित धरल्यास ५ वर्षानंतर कंपनीचे प्रती शेअर उत्पन्न असेल रु.२.५०. आता असे धरुया कि या क्षेत्रानुसार कंपनीचा पी / ई रेशो १५ हा गुंतवणूकदाराचे दृष्टीने योन्य आहे. म्हणून हा शेअर अपेक्षीत २.५० च्या इपीएस नुसार १५ पटीने विकला जाईल (२.५० गुणीले १५) म्हणजेच रु.३७.५० या किंमतीला विकला जाईल तो होतो चालू वर्षाच्या इपीएसच्या ३७.५० पट. येथे कंपनी २०% वार्षीक दराने उत्पन्नात वाढ अपेक्षीत असल्यामुळे (व या कंपनीची मागिल कामगिरीही सतत चांगली राहिलेली असल्यामुळे) गुंतवणूकदार हा शेअर भविष्यात मिळणा-या उत्पन्नावर अवलंबून जास्त किंमतीला तो शेअर खरेदी करण्यास तयार असतो. अशा वेळी तो शेअर उच्च पी / ई (या वर्षीच्या तुलनेत) असूनही खरेदी केला जातो. याचाच दुसरा अर्थ चांगल्या व्यवस्थानाखालील, चांगल्या कामगिरीचा इतिहास असलेल्या व भविष्यात आकर्षक उत्पन्न देऊ शकणा-या म्हणजेच थोडक्यात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चांगल्या (वेलनोन) कंपनीच्या शेअरला तो जास्त किंमत मोजण्यास तयार असतो.

रेशोंचे विश्लेषण आजकाल इंटरनेटवर अनेक साईटसवर उपलब्ध असते, प्रामुख्याने काही चांगल्या ब्रोकरच्या साईटवर, बीएसई व एनएसीच्या साईटवरही हे उपलब्ध असते या सुवीधेचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.

मात्र जर तुमच्याकडे अजिबात वेळच नसेल व हे काम तुमच्यावतीने तज्ञ व्यक्तीने करुन तुम्हाला दिर्घ मुदतीत शेअर बाजारापासून मिळणार फायदा मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या वेग वेगळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाणा-या म्हणजेच डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत नियमीत दर महा एसआयपीच्या माध्यमातून दिर्घ मुदतीसाठी (साधारण ५ वर्षापेक्षा जास्त व उत्तम परताव्यासाठी १५ ते २० वर्षे) करणे हे अतिशय फायदेशीर होते. अशाप्रकारच्या चांगल्या योजनानी सरासरी वार्षीक २५% चक्रवाढ दराने १५ पेक्षा अधीक वर्षाचे काळात उत्पन्न दिलेले आहे. आणि अजून किमान ३० ते ४० वर्षे ते याच दराने मिळण्याची शक्यता आहे.

रेशोंप्रमाणेचे कंपनीच्या फंडामेंटलचे विश्लेषण करणेही तेवढेच किंबहुना अधीक महत्वाचे आहे त्याबाबत आपण पुढील प्रकरणात चर्चा करुया.

Read about how to analayse different ratios in Marathi. read about different in ration analyse in Marathi. understand how to analyse different ratios in Marathi. Learn about ratio anyalyseServices offered by Thakur Financial Servicesstock/share market in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments
Page 4 of 11
« Previous 1 2 3 4 5 6 … 11 Next »
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×