Pre-market open view Opening Bell (मार्केट सुरु होण्यापूर्वी): रोज सकाळी बाजार उघडण्यापूर्वी तुम्ही भारतीय तसेच अमेरिकन बाजाराचे विश्लेषण, महत्वाच्या घडामोडींचा मागोवा, महत्वाचे इंडेक्स व मोठ्या कंपन्यांचे शेअर्स बाबत टेक्नीकल दृष्टिकोन या गोष्टी पाहून समजून घेऊ शकता. याचा वापर तुम्ही तुमच्या गुंतवणूक निर्णयासाठी करून घेऊ शकता.
Daily Technical: अल्प कालीन गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण व सांखिकी विश्लेषणावर आधारित ३ शेअर्स सुचवले जातात.
Daily Derivative: येथे फ्युचर्स व ऑप्शन ट्रेडिंग साठी ताज्या घडामोडी, बाजाराची दिशा, टेक्नीकल व अन्य घटकांचा बाजारावर होणारा परिणाम विचारात घेऊन ट्रेडिंग डावपेच दिले जातात.
Advanced Derivative Strategies: वायदेबाजारासाठी सोपी करून दिलेले ट्रेडिंग डावपेच, जसे कि स्प्रेड व कव्हर्ड कॉल्स. Short – Medium term recommendations (अल्प काळासाठी शिफारस)
Stock Picks: कंपनीबाबत तपशीलवार रिपोर्ट: कंपनीचा व्यवसाय, भविष्यातील संधी आणि शेअर्सचे किंमतीचा अंदाज समजण्यासाठी पायाभूत अहवाल दिला जातो.
Intra-day Technical recommendations
Derivative Calls: टेक्नीकल विश्लेषण व शेअर्स संबंधित बातमी किंवा अपेक्षित बातमीचा विचार करून वायदेबाजारात ट्रेडिंगसाठी शिफारस दिली जाते.
Weekly Technical: एक आठवड्याचासाठीच गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण व सांखिकी विश्लेषणावर बाजाराचा कल व टेक्नीकल इंडिकेटर वर आधारित शेअर्स सुचवले जातात.
Weekly Derivatives: एक आठवड्याचासाठीच गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण, पायाभूत विश्लेषण, व सांखिकी विश्लेषणावर बाजाराचा कल, चढ उतार, ओपन इंटरेस्ट व टेक्नीकल इंडिकेटर वर आधारित एक आठवड्यासाठी वायदेबाजारात ट्रेडिंगसाठी शेअर्स सुचवले जातात.
Pick Of The Week: प्रयेक आठवड्यात टेक्नीकल विश्लेषण आणि/किंवा पायाभूत विश्लेषण यावर आधारित असा एक शेअर सुचवला जातो कि जो साधारणपणे पुढील तीन महिन्यात १०% नफा मिळवून देऊ शकेल.
Stocks On Move: सौदा करणाऱ्यांची विचार करण्याची भावना समजून पुढील १५ दिवसात ज्या शेअरच्या किंमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असेल असा शेअर या विभागात सुचविला जातो.
Monthly Technicals: येथे तुम्हाला एक महिन्याचा कालावधी विचारात घेऊन टेक्निकल कल, टेक्नीकल इंडिकेटर्स व सांखिकी माहितीवर आधारित शेअर एक महिन्यासाठी सुचवला जातो.
Equity Model Portfolio: येथे तुम्हाला तुमची जोखीम स्वीकारण्याची– कमी जोखीम, मध्यम जोखीम किंवा जास्त जोखीम जशी तयारी असेल त्यानुसार तयार केलेला आदर्श पोर्टफोलिओ गुंतवणुकीसाठी सुचवला जातो.
High Dividend Yield Stocks: जर तुम्हाला नियमितपणे चांगला लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावयाची असेल तर त्याबाबत माहिती येथे दिली जाते.
मला तुमच्या मार्फत 3-in1 Account उघडावयाचा आहे तर काय केले पाहिजे? उत्तर: तुम्ही जगाचे पाठीवर जरी कोठेही रहात असलात तरी आमचे मार्फत तुम्ही सहजपणे 3-in1 Account चालू करू शकता. प्रथम तुम्ही मला sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करून तुमची आमचे मार्फत 3-in1 Account चालू करण्याची इच्छा व्यक्त करा, यामध्ये तुमची जास्तीत जास्त माहिती द्या, मोबाईल नंबर कळवा मी तुम्हाला फोन किंवा व्हिडीओ कॉल करून आपण एकमेकांशी संवाद साधू, आमचे मार्फत अकाऊंट उघडण्याचे फायदे मी तुम्हाला समजावून सांगेन यानंतर जर तुम्हाला अकाऊंट उघडावयाचा असेल तर आम्ही तुम्हाला पोस्ट किंवा कुरिअरने फॉर्म पाठवू सोबत तपशीलवार सूचना असणारे पत्रही असेल त्याप्रमाणे सह्या करून सोबत पत्रात लिहिल्याप्रमाणे कागदपत्रे व फॉर्म आम्हाला पोस्ट किंवा कुरिअरने रवाना करा, साधारण १५ ते २० दिवसात तुमचा अकाऊंट उघडला जाईल व तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग सुरु करू शकाल.