बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स
या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि सामान्यतः किमान ३०% ते ८५% शेअर बाजारात व उर्वरित रक्कम हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांत आणि आर्बिट्राज मध्ये केली जाते. मात्र जर शेअर बाजारात तेजी असेल तर हेच प्रमाण निधी व्यवस्थापक ८५% पर्यंत वाढवू शकतो. ज्यामुळे गुंतवणूकदाराला शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळून जास्त परतावा मिळू शकतो, जे शेअर बाजारात मंदीचा कल असेल, तर शेअर बाजारातील गुंतवणूक तो ३०% पर्यंत कमी करू शकतो ज्यामुळे निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातून जास्त परतावा मिळेल व शेअर बाजारातून होणारे नुकसान थोडे भरून निघू शकेल. म्हणूनच या योजनेला मल्टी असेट संतुलित योजना म्हंटले जाते. या प्रकारच्या योजना या तुलनेने कमी जोखमीच्या मानल्या जातात. त्यामुळे या योजनेतून मिळणारा परतावा हा बँक ठेवींपेक्षा जास्त मिळेल तो सरासरी १० ते १२% वार्षिक दराने मिळू शकतो. ज्यांना ३ ते ५ वर्षांसाठी गुंतवणूक करावयाची असेल त्यांचेसाठी हि चांगली योजना आहे.
संतुलित योजनांचे व्यवस्थापन हे मल्टी कॅप प्रकारातील योजने प्रमाणेच केले जात असल्यामुळे या डायव्हर्सिफाइड योजना म्हणून हि ओळखल्या जातात कारण या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि मोठ्या, मध्यम व कमी भांडवली आकाराच्या अनेक विविध प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये केली जाते. कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या मूल्यानुसार ज्या कंपन्या पहिल्या १०० मध्ये येतात त्यांना लार्ज कॅप कंपन्या असे मानले जाते, ज्या कंपन्या भांडवली आकारानुसार १०१ ते २५० मध्ये मोडतात त्यांना मध्यम किंवा मिड कॅप कंपन्या म्हणून ओळखले जाते व ज्या कंपन्या २५१ पासून पुढील आहेत त्यांना लहान किंवा स्मॉल कॅप कंपन्या असे ओळखले जाते. तुलनात्मक दृष्ट्या पाहिल्यास लार्ज कम्पन्या या कमी जोखमीच्या व मिड व स्मॉल कॅप कंपन्या या जास्त जोखमीच्या मानल्या जातात. नवीन गुंतवणूकदाराने तो जेव्हा प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो तेव्हा त्याने बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स प्रकारातील योजनेत गुंतवणूक करावी. गेल्या १० वर्षात संतुलित प्रकारातील योजनेतून गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक ११% दराने परतावा मिळालेला आहे.
मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा सर्वच प्रकारातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी जास्त प्रमाणात खाली येतात. बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स प्रकारातील योजनेत मंदीच्या काळात २० ते २५% नुकसानही होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. मात्र तुलनेने या योजनेत कमी जोखीम असते. या प्रकारातील योजनेचे व्यवस्थापन हे नियमितपणे केले जाते व बाजारातील काळानुसार गुंतवणुकीचे संतुलन केले जाते.
जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Hybrid या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील तुम्हाला हव्या त्या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर संतुलित प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).