बँक एफ.डी. व डेब्ट फंड योजना एक तुलना
बँक एफ.डी. | डेब्ट फंड योजना |
सध्या एक वर्षाचे एफ.डी. साठी ७.५% व्याजदर आहे. | डेब्ट फंडाचे योजनेत सध्या सरासरी ८.८६% एवढा परतावा मिळत आहे, जर रेपो रेट अजून कमी झाला तर मिळणार हाच परतावा शॉर्ट टर्म डेट फंड योजनेत ९.५% पर्यंत जाऊ शकेल. |
१०% दराने टी.डी.एस. ची कपात केली जाते. | टी.डी.एस. लागू नाही म्हणून कपात केली जात नाही. |
मिळणाऱ्या व्याजावर ३०% पर्यंत कर आकारणी होऊ शकते. | किमान ३ वर्षे अधिक १ दिवस एवढ्या काळासाठी गुंतवणूक केल्यास मिळणाऱ्या लाभावर इंडेक्सेशनचा फायदा मिळतो ज्यामुळे फारच कमी कर आकारणी होते. |
समजा तुम्ही रु.१० लाखाची एफ.डी. केली आहे,काही महिन्यांनी तुम्हाला अजून रु.२ लाख गुंतावावयाचे असतील तर तुम्हाला नवीन एफ.डी.करावी लागेल. | त्याच डेब्ट फंडाचे योजनेत तुम्ही कितीही वेळा जास्तीची गुंतवणूक करू शकता. |
समजा तुम्ही रु.१० लाखाची एफ.डी. केली आहे,काही महिन्यांनी तुम्हाला रु.२ लाख काही कारणासाठी लागणार असतील तर पूर्ण एफ.डी.मोडावी लागेल, व उरलेल्या रु.८ लाखाची परत एफ.डी. करावी लागेल. | समजा तुम्ही रु.१० लाखाची एफ.डी. केली आहे, काही महिन्यांनी तुम्हाला रु.२ लाखकाही कारणासाठी लागणार असतील तर,तेवढेच पैसे काढून गुंतवणूक पुढे चालू ठेवता येते. |
मुदत संपल्यावर मुदत वाढवावयाची असल्यासनुतनीकरण करावे लागते. | कितीही काळ गुंतवणूक केली तरी कधीचनुतनीकरण करावे लागत नाही. |
एफ.डी. मोडली तर मिळणाऱ्या व्याजात कपात केली जाते. | कोणतीही कपात केली जात नाही संपूर्ण रक्कम मिळते (अटी लागू) |