म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ
तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शन मिळतं
प्रत्येक म्युच्युअल फंड हाउस त्यांचे फंड व्यवस्थापनेसाठी अनेक फंड मॅनेजर्स व फंड मॅनेजरला साहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम व व्यावसायिक तज्ञ यांची नेमणूक करत असतात जे तुमच्यासाठी सतत आर्थिक बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. ते विविध क्षेत्रातील आणि कंपन्यांमधील मार्केट ट्रेड्स व भावी संभाव्यता यांच संशोधन नियमितपणे करत असतात. आपले रिसर्च रिपोर्ट संबंधित स्कीमचे फंड मॅनेजरला सादर करत असतात त्यानंतर संबंधित फंड मॅनेजर तुलनात्मक अभ्यास करून गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेत असत या तज्ञांमुळे गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेता येत असतो. तसं तुम्हाला एकट्याने करणे कठिण होतं आणि म्हणूनच ९०% पेक्षा जास्त गुंतवणूकदार शेअर मार्केट मध्ये नुकसान सोसत असताना म्युच्युअल फंडाचे नियमित गुंतवणूकदार मात्र दीर्घ मुदतीत मोठा लाभ मिळवीत असतात.
कमी जोखीम
म्युच्युअल फंडाची खासियत म्हणजे त्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी मिळतात. सामान्यपणे एकाच सिक्युरिटीतील गुंतवणूक ती कंपनी किती चांगला किंवा वाईट व्यवसाय करते यावर अवलंबून असते. पण म्युच्युअल फंडात तुम्ही रुपये ५००० गुंतवा अथवा रुपये पाच लाख गुंतवा त्यांतील थोडी थोडी रक्कम वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मध्ये गुंतविली जात असते जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीची जोखीम कमी होते.
तुम्हाला आवश्यक तेव्हा पैसे काढून घेण्याची सुविधा असते
ओपन एंडेड म्युच्युअल फंड योजना या बॅंकेतिल बचत खात्याप्रमाणे चालविता येत असतात म्हणजेच यात केव्हाही पैसे भरता येतात व केव्हाही काढता येतात. क्लोज एंडेड (बंद योजना) योजनेमध्ये केलेली गुंतवणूक काढण्यावर मात्र काही निर्बंध असतात आणि म्हणूनच बरेच तज्ञांशी सहमत होताना आम्हीसुद्धा ओपन एंडेड म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत असतो.
कमीत कमी खर्च
तुम्ही इतर अनेक गुंतवणूकदारांसोबत गुंतवणूक करत असल्यामुळे तुम्हाला तुलनात्मकदृष्ट्या गुंतवणुकीचा खर्च कमी करावा लागतो. जर तुम्ही एकट्याने गुंतवणूक केली असती तर हा खर्च वाढला असता म्हणूनच भांडवली बाजारात थेट गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला कमी खर्च येतो.
पारदर्शकता
जमीनजुमल्यातील गुंतवणुकीत जे शक्य होत नाही ते यात शक्य होतं. यात गुंतवणुकीचे मूल्य रोजच्या रोज जाणून घेता येते शिवाय ठराविक काळानंतर बहुधा प्रत्येक महिन्याचे अखेरीला सर्वच फंड हाउसेस त्यांची फॅक्ट शिट प्रकाशित करत असतात जीचे आधारे तुम्ही म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक कोणकोणत्या कंपन्यांचे समभागामध्ये गुंतविली आहे. विविध प्रकारच्या अन्य कोणत्या ठिकाणी गुंतवणूका केलेल्या आहेत तसेच फंड मॅनेजरचे धोरणही तुम्ही ठरावीक कालावधीनंतर जाणून घेऊ शकता.
इन्कम टॅक्स मुक्त परतावे
इक्विटी म्युच्युअल फंडावरील मिळणारे लाभांश हे पूर्णता करमुक्त असतात. शिवाय इक्विटी म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक एक वर्षानंतर काढली असता पूर्णतः करमुक्त असते.
सेबी व अँफीचे नियंत्रण
सर्व म्युच्युअल फंड हे Security & Exchange Board of India (सेबी) आणि Association of Mutual Funds of India (AMFI) कडे नोंदणीकृत असतात आणि गुंतवणूकदारांचे हित सांभाळणा-या तरतुदी व नियमांनुसार काम करत असतात. सेबीकडून स्टॉक एक्सचेंज आणि त्यांच्या सहचालकांवर नियंत्रण तर ठेवले जातेच शिवाय चुकीच्या सहचालनावर दंड ठोठावून सिक्युरिटी मार्केट व सिक्युरिटी व्यवहारातील भ्रष्टाचाराला पायबंद घालते.
- Add child page
- ♦
- Printer-friendly version
- ♦
- 29017 views
Add new comment
Subject Comment Lists Format Source
Book traversal links for म्यु.फंडाचे फायदे
‹ अनिवासी भारतीयUpम्यु.फंडाचे भविष्य ›
एस आय पी
Demat A/c
आयसीआयसी चा थ्री इन वन अकौंटची माहिती वाचा
पूणे संपर्क
पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018
रत्नागिरी संपर्क
रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302 & 9518752605
रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018
ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
Menu
माझ्या सोबत भेटीची वेळ ठरवा
चिपळूण, रत्नागिरी व पुणे येथे मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करा
☏:9422430302
Welcome admin
Site Managment
Who’s online
There are currently 2 users online.
Who’s new
ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस
२७५, मनीषा, ICICI Bank जवळ, कावीळतळी, चिपळूण – ४१५६०५
टेली. ०२३५५ – २५१०८९ मो. ९४२२४३०३०२
Email: tfscontactus@gmail.com
पूणे संपर्क
पुणे येथे भेट ठरवण्यासाठी
Sadanand 9518752605 or 9422430302
Sujay 9503718779
पुढील भेटीची तारीख: 15th & 16th December, 2018
रत्नागिरी संपर्क
रत्नागिरी भेट दर महिन्याच्या चौथा शनिवार आणि रविवार
Mobile: 9422430302 & 9518752605
रत्नागिरी येथे माझ्या पुढील भेटीची तारीख: 22nd & 23rd December, 2018
ठिकाण: हॉटेल विहर डिलक्स, माळनाका, रत्नागिरी
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
जळगाव संपर्क
श्री. हृदयेश रमेश पाटील, जळगाव फोन क्र. ९४०५६७२११०
उस्मानाबाद
अच्युत: 9970963838
Disclaimer
म्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.
RISK AND DISCLAIMER
Mutual fund investments are subject to market risks. Please read the scheme information and other related documents carefully before investing. Past performance is not indicative of future returns. Please consider your specific investment requirements before choosing a fund, or designing a portfolio that suits your needs.
copyright © 2009 Thakur Financial Services
भेटीचे पूर्व नियोजन
आपण मला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पूणे येथे भेटू शकता. भेट ठरविण्यासाठी किमान 2 दिवस अगोदर फोन करणे आवश्यक.
आपण मला रत्नागिरीत दर महिन्याच्या चौथ्या शनिवार आणि रविवार भेटू शकता.
Chat With Us
Use this contact form or call me on mobile 9422430302 to fix scheduled meeting for Live Chat support to get answers of all your queries and get customize solution as per your requirements.