सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):
हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते) गुंतवणूक करत रहातो ज्यामुळे सरासरीचा लाभ मिळतो.
गेल्या २० ते २२ वर्षात या प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर अत्यंत आकर्षक परतावा मिळालेला आहे जो कि वार्षिक २२% चक्रवाढ दराने मिळालेला आहे, मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक १५% दराने परतावा मिळेल असे समजून दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी. बाजारात ठरविक अंतराने मोठी तेजी व पाठोपाठ मोठी मंदी येत असते व हे चक्र अव्याहत चालूच असते. या प्रकारे गुंतवणुक दीर्घ काळ करत राहिले असता बाजारातील जोखीम जवळपास नष्ट होऊन जाते. म्युचुअल फंडाचे जवळपास सर्वच योजनेत एस.आय.पी. करता येते, मात्र आपल्या जोखीम स्वीकारण्याचे तयारीनुसार व किती काळ आपण गुंतवणूक करणार आहोत यानुसार योजना निवडावी. तरुण व्यक्तीने शक्यतो मल्टी कॅप योजनेत व मिड कॅप योजनेत गुंतवणूक करावी, मध्यम वयाचे व्यक्तीने लार्ज कॅप योजनेत, बॅलन्सड योजनेत गुंतवणूक करावी, कर बचतीसाठी ELSS योजनेत एस.आय.पी. करावी.