१४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या
बाजारात अनेकवेळा काही चांगले शेअर्स अगदी कमी किंमतीमध्ये उपलब्ध असतात, जे सध्या अनेकांचे नावडते झालेले असतात. असे स्टॉक शोधण्याची एक चांगली पद्धत असते.
१) प्रथम असे शेअर्स शोधा कि काही तात्कालिक कारणामुळे ज्यांच्या किंमती कमी झालेल्या असतात व जे स्टॉक विकत घेण्यास बहुतांशी अल्पकालीन गुंतवणूकदार इच्छुक नसतात.
२) वरीलप्रमाणेच तर्क लढवून असे पहा कि एखाद्या कोणत्या क्षेत्रातील बहुतांशी स्टॉक या प्रकारात मोडत आहेत ते पहा. म्हणजेच किंमत कमी झाली आहे व दुर्लक्षित आहेत.
३) आता यातील काही शेअर्स तुम्ही तुमच्या “अवलोकनाच्या यादीत” समाविष्ट करा. हे असे करण्यासाठी खालील घटक विचारात घ्या:
पी/इ रेशो (Price to Earnjng Ratio): यासाठी कमीत कमी १० व जास्तीत जास्त ३० शेअर्स निवडा, ज्यांचा सध्याचा पी/ई ३० च्या जवळपास असला पाहिजे. बरेच वेळा कमी पी/इ असणारा शेअर हा अल्पकालीन गुंतवणूकदार खरेदी करण्यासाठी इच्छुक नसतात, म्हणून दुर्लक्षित असतो. आता अशा शेअर्स बाबत आघाडीचे विश्लेषक काय म्हणतात ते तपासून पहा. यासाठी तुम्ही एखादया चांगल्या मोठ्या ब्रोकरच्या संकेतस्थळावर हि माहिती पाहू शकता. उदा. ICICIDIRECT चे संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊन हे पाहू शकता.
किंमत-विक्री गुणोत्तर (Price to Sales Ratio): याला PSR असेही संबोधले जाते. ह्याचा वापर स्टॉकचे सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी केला जातो. बरेच गुंतवणूकदार ज्या शेअरचा PSR १ पेक्षा कमी असतो तो गुंतवणुकीसाठी चांगला शेअर मानत असतात. यासाठी मी जास्तीत जास्त 0.5 चा PSR आणि कमीत कमी कोरी जागा सोडून शेअर्स शोधतो. मात्र हे करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे कारण अनेकवेळा कमी PSR असणारे बरेच शेअर्स असू शकतात. याचा वापर करून आपण असे शेअर्स शोधू शकतो कि ज्यांची पूर्वी बरीच जास्त किंमत होती मात्र सध्या काही तात्कालिक कारणामुळे त्या शेअर्सची किंमत कमी झालेली असते.
कमाई मधील वाढीचा दर (Earnings Growth): अशी कंपनी पहा कि जिच्या वार्षिक कमाईचा दर हा २०% पेक्षा जास्त आहे. जर एखादया कंपनीचा Earnings Growth दर हा २०% पेक्षा जास्त व सोबत पी/ई १०% किंवा कमी असेल तर ती गुंतवणुकीची उत्तम संधी असू शकते. याला PEG किंवा PE to Growth रेशो असे म्हटले जाते. हुशार गुंतवणूकदार १ पेक्षा कमी PEG असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. समजा वरील उदाहरणा प्रमाणे P/E १० / EG २० आहे तर PSR ०.५ होतो.
भांडवलावरील परतावा (Return on Equity): अशा कंपनीचे शेअर्स शोधा कि जे भांडवलावर वार्षिक २०% पेक्षा जास्त परतावा देत असतात. यामुळे तुम्हाला समजू शकते कि तुमच्या गुंतवणुकीवर किती दराने परतावा मिळू शकतो. जेवढा जास्त परतावा तेवढा तो शेअर खरेदी करण्यासाठी चांगला हे समजून जा.
वरीलप्रमाणे सर्व रेशोंचे एकत्रित विश्लेषण करून तुम्ही शेअर्स खरेदीचा योग्य निर्णय करू शकता. हे विश्लेषण करून झाल्यावर निरनिराळ्या आर्थिक संकेतस्थळावर जाऊन संबंधित कंपनीबाबतची माहिती गोळा करा आणि त्यानंतर योग्य किंमतीत शेअर्स खरेदी करा आणि शांत बसा. पैसा आपोआप तुमच्यासाठी काम करू लागेल.