उपलब्ध रिसर्च
Pre-market open view Opening Bell (मार्केट सुरु होण्यापूर्वी): रोज सकाळी बाजार उघडण्यापूर्वी तुम्ही भारतीय तसेच अमेरिकन बाजाराचे विश्लेषण, महत्वाच्या घडामोडींचा मागोवा, महत्वाचे इंडेक्स व मोठ्या कंपन्यांचे शेअर्स बाबत टेक्नीकल दृष्टिकोन या गोष्टी पाहून समजून घेऊ शकता. याचा वापर तुम्ही तुमच्या गुंतवणूक निर्णयासाठी करून घेऊ शकता.
Daily Technical: अल्प कालीन गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण व सांखिकी विश्लेषणावर आधारित ३ शेअर्स सुचवले जातात.
Daily Derivative: येथे फ्युचर्स व ऑप्शन ट्रेडिंग साठी ताज्या घडामोडी, बाजाराची दिशा, टेक्नीकल व अन्य घटकांचा बाजारावर होणारा परिणाम विचारात घेऊन ट्रेडिंग डावपेच दिले जातात.
Advanced Derivative Strategies: वायदेबाजारासाठी सोपी करून दिलेले ट्रेडिंग डावपेच, जसे कि स्प्रेड व कव्हर्ड कॉल्स. Short – Medium term recommendations (अल्प काळासाठी शिफारस)
Stock Picks: कंपनीबाबत तपशीलवार रिपोर्ट: कंपनीचा व्यवसाय, भविष्यातील संधी आणि शेअर्सचे किंमतीचा अंदाज समजण्यासाठी पायाभूत अहवाल दिला जातो.
Intra-day Technical recommendations
Derivative Calls: टेक्नीकल विश्लेषण व शेअर्स संबंधित बातमी किंवा अपेक्षित बातमीचा विचार करून वायदेबाजारात ट्रेडिंगसाठी शिफारस दिली जाते.
Weekly Technical: एक आठवड्याचासाठीच गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण व सांखिकी विश्लेषणावर बाजाराचा कल व टेक्नीकल इंडिकेटर वर आधारित शेअर्स सुचवले जातात.
Weekly Derivatives: एक आठवड्याचासाठीच गुंतवणुकीचा विचार करून टेक्नीकल विश्लेषण, पायाभूत विश्लेषण, व सांखिकी विश्लेषणावर बाजाराचा कल, चढ उतार, ओपन इंटरेस्ट व टेक्नीकल इंडिकेटर वर आधारित एक आठवड्यासाठी वायदेबाजारात ट्रेडिंगसाठी शेअर्स सुचवले जातात.
Pick Of The Week: प्रयेक आठवड्यात टेक्नीकल विश्लेषण आणि/किंवा पायाभूत विश्लेषण यावर आधारित असा एक शेअर सुचवला जातो कि जो साधारणपणे पुढील तीन महिन्यात १०% नफा मिळवून देऊ शकेल.
Stocks On Move: सौदा करणाऱ्यांची विचार करण्याची भावना समजून पुढील १५ दिवसात ज्या शेअरच्या किंमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असेल असा शेअर या विभागात सुचविला जातो.
Monthly Technicals: येथे तुम्हाला एक महिन्याचा कालावधी विचारात घेऊन टेक्निकल कल, टेक्नीकल इंडिकेटर्स व सांखिकी माहितीवर आधारित शेअर एक महिन्यासाठी सुचवला जातो.
Equity Model Portfolio: येथे तुम्हाला तुमची जोखीम स्वीकारण्याची– कमी जोखीम, मध्यम जोखीम किंवा जास्त जोखीम जशी तयारी असेल त्यानुसार तयार केलेला आदर्श पोर्टफोलिओ गुंतवणुकीसाठी सुचवला जातो.
High Dividend Yield Stocks: जर तुम्हाला नियमितपणे चांगला लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावयाची असेल तर त्याबाबत माहिती येथे दिली जाते.
मला तुमच्या मार्फत 3-in1 Account उघडावयाचा आहे तर काय केले पाहिजे? उत्तर: तुम्ही जगाचे पाठीवर जरी कोठेही रहात असलात तरी आमचे मार्फत तुम्ही सहजपणे 3-in1 Account चालू करू शकता. प्रथम तुम्ही मला sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करून तुमची आमचे मार्फत 3-in1 Account चालू करण्याची इच्छा व्यक्त करा, यामध्ये तुमची जास्तीत जास्त माहिती द्या, मोबाईल नंबर कळवा मी तुम्हाला फोन किंवा व्हिडीओ कॉल करून आपण एकमेकांशी संवाद साधू, आमचे मार्फत अकाऊंट उघडण्याचे फायदे मी तुम्हाला समजावून सांगेन यानंतर जर तुम्हाला अकाऊंट उघडावयाचा असेल तर आम्ही तुम्हाला पोस्ट किंवा कुरिअरने फॉर्म पाठवू सोबत तपशीलवार सूचना असणारे पत्रही असेल त्याप्रमाणे सह्या करून सोबत पत्रात लिहिल्याप्रमाणे कागदपत्रे व फॉर्म आम्हाला पोस्ट किंवा कुरिअरने रवाना करा, साधारण १५ ते २० दिवसात तुमचा अकाऊंट उघडला जाईल व तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग सुरु करू शकाल.
- Published in Demat
मिळणाऱ्या सेवा
On- The – Move तुम्ही icicidirect.com च्या वेबसाईटचा वापर करून अति जलद ट्रेड करू शकता. यासाठी तुम्ही संगणक किंवा मोबाइलचा हि वापर करू शकता. डेटा कार्ड किंवा GPRS चा वापर करूनही ट्रेड करू शकता.
Call-n-Trade जर यदा कदाचित तुम्हाला लॉग इन करणे शक्य नसेल तर Call N Trade service व्दारे टेलिफोन वरूनही तुम्ही ट्रेडिंगची ऑर्डर देऊ शकता.
ICICISecurities Equity Advisory Services जर आपण जास्त रकमेची गुंतवणूक किंवा ट्रेडिंग साठी वापर करणार असाल तर तुम्हाला विशेष सेवा देण्यासाठी एक सल्लागार नेमून दिला जातो तो तुम्हाला तुमचे गुंतवणूक किंवा ट्रेडिंगचे व्यवहार करण्यासाठी मदत करतो अधिक माहितीसाठी equityadvisory@icicidirect.com येथे संपर्क करा
ICICIdirect Institute ICICIdirect Knowledge Programs या सुविधेचा लाभ तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला शेअर्स, वायदेबाजार, म्युचुअल फंड, आय.पी.ओ., स्मॉल सेव्हिंग्ज, विमा, रोखे या गुंतवणूक साधनांची विस्तृत माहिती घेता येऊ शकेल. यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय समजून उमजून घेऊ शकाल तसेच तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन सहजपणे करू शकाल.
High Quality Research ICICI Securities Ltd. तुम्हाला उत्तम दर्जेदार रिसर्च सुविधा प्रदान करते याचा वापर करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता. हे रिसर्च तुमच्या गरजेनुसार अल्पकाळासाठी, मध्यम कालावधीसाठी व दीर्घ कालावधीसाठी ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त आहे.
ICICI Securities ATS हि सुविधा ज्यांना पूर्ण रिसर्च करून गुंतवणूक करावयाची इच्छा असेल त्यांचेसाठी आहे अधिक माहितीसाठी मेल करा atshelpdesk@icicisecurities.in
- Published in Demat
३-इन-वन अकाउंट उघडण्याचे फायदे काय?
मार्गदर्शनासाठी तुम्ही आयसीआयसीआय च्या रिसर्चचाही वापर करू शकता. येथे तुम्हाला अल्प काळासाठी तसेच दीर्घ काळासाठी कोणते शेअर्स खरेदी करावेत, टार्गेट व कालावधी इ. माहिती दिलेली असते.
आमचे बाबत:
आम्ही ICICI Securities सोबत अधिकृत प्रतिनिधी {Authorised Person(AP)} म्हणून ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस या ट्रेड नावाने संलग्न आहोत. आमचे ऑफिस चिपळून, रत्नागिरी येथे आहे. आम्हाला गेल्या दोन दशकांचा शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचा अनुभव आहे त्याचप्रमाणे म्युचुअल फंड वितरण व योग्य योजना विकण्याचा तेवढाच अनुभव आहे. संपूर्ण देशात, मोठ्या संख्येने आमचे ग्राहक आहेत, महाराष्ट्रात तर जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आमचे ग्राहक असून ते सर्वच आमचे कडून मिळणारे सेवेमुळे समाधानी आहेत.
ICICI Securities बाबत: ICICI Securities Ltd हि देशातील एक अग्रेसर सर्व प्रकारच्या सेवा देणारी गुंतवणूक बँक असून, कॉर्पोरेट फायनान्स, निश्चित उत्पन्न देणारी साधने आणि समभाग या सर्वच प्रकारातील साधनात गुंतवणूक व ट्रेडिंग करण्याची सुविधा देणारी एक नावाजलेली संस्था म्हणूनच ओळखली जाते. ICICI बँकेची हि एक उप कंपनी आहे. या संस्थेव्दारे विविध प्रकारच्या, गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापन आणि कर्ज इ. आर्थिक सेवा दिल्या जातात. ICICI Securities हि National Stock Exchange (NSE) आणि the Bombay Stock Exchange (BSE) या दोन्ही आघाडीच्या एक्स्चेंजच्या रोखीतील व वायदेबाजारात व्यवहार करण्यासाठी नोंदणीकृत सभासद आहे.
ICICI Securities मार्फत उपलब्ध उत्पादने: आमचे मार्फत खाते उघडल्यावर आपण NSE व BSE वर नोंदणीकृत असणाऱ्या शेअर्स तसेच म्युचुअल फंड्स, रोखे, IPOs/FPOs, NCDs, या अन्य आर्थिक उत्पादनात गुंतवणूक करू शकता त्याचप्रमाणे गृह कर्ज, सिक्युरिटी तारण कर्ज या सेवेचाही लाभ घेऊ शकता. ICICI Securities मार्फत खाते उघडल्यावर तुम्हाला खालील प्रकारचे लाभ मिळतात:
Seamless Trading सेटलमेंट सायकल पाहणे, चेक लिहणे, तुमच्या सूचना देणे इत्यादी पासून मुक्ती मिळून तुम्ही अत्यंत सुलभपणे शेअर्सची खरेदी विक्री करू शकता. Security आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यात शिल्लक असणारे रकमेतूनच तुम्ही शेअर्सची खरेदी करू शकता. तसेच जेव्हा तुम्ही शेअर्सची विक्री करता तेव्हा पैसे आपोआप तुमच्या बचत खात्यात जमा होतात. म्हणून तुमच्या बँकेतून ब्रोकरचे खात्यात पैसे ट्रान्सफर करणे किंवा चेक देणे, पे आउट साठी सूचना देणे अन्य त्रासांपासून तुम्हाला पूर्ण मुक्ती मिळते. Wide range of products NSE and BSE, वर शेअर ट्रेडिंग कण्यासाठी – Margin,
MarginPlus, BTST, SPOT. Derivatives trading, इ. सुविधा वापरून उपलब्ध कोणत्याही साधनात व्यवहार करू शकता. तसेच म्युचुअल फंड, विमा इ. चा गुंतवणुकीसाठी वापर करू शकता.
Award Winning Research ICICI Securities Ltd. जाणून आहे किं गुंतवणुकीच्या कोणत्याही निर्णयासाठी चांगल्या संशोधनाची (रिसर्च) गरज असते म्हणूनच या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते.
CNBC Awaaz Consumer Awards, 2007 या पुरस्कारासाठी लोकांचे मतानुसार सर्वात जास्त पसंतीचा आर्थिक सल्ला देणारी आस्थापना म्हणून ICICI Securities Ltd. निवड केली गेली होती……
Control तुम्ही दिलेली खरेदी किंवा विक्रीची ऑर्डर जशीच्या तशी कोणताही बदल न करता एकस्झीक्यूट केली जाईल याची खात्री बाळगा. यामुळे तुमचे मर्जीनुसार तुम्हाला व्यवहार करता येतो.
Tracking and Review गुंतवणूक करण्याएवढेच किंबहुना यापेक्षाही जास्त महत्वाचे असते ते म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचा मागोवा ठेवणे आणि यासाठीच ICICI Securities तुम्हाला देते तुमचा पोर्टफोलिओ एकत्रितपणे केव्हाही व कोठूनही पाहण्याची सुविधा. त्याचप्रमाणे वॉचलिस्टचा वापर करू शकता यामुळे तुम्ही SMS अलर्ट सुद्धा प्राप्त करू शकता याचा उपयोग तुम्ही गुंतवणुकीचे निर्णयासाठी करू शकता.
- Published in Demat
शेअर्स खरेदी विक्री कशी करता येईल?
एकदा का तुमचे खाते उघडून झाले कि तुम्हाला शेअर्स, म्युचुअल फंड, रोखे, आय.पी.ओ. इ. बाबतची माहिती देण्यात येईल. शेअर ट्रेडिंग/गुतंवणूक कशी करावी, शेअर बाजारातून नियमितपणे फायदाच कसा मिळवावा याचे मार्गदर्शन केले जाईल.
४) शेअर्स खरेदी विक्री करताना तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असल्यास आपण फोन करून केव्हाही माहिती घेऊ शकता.
५) एकदा का व्यवहार (ट्रेड) केला कि तुम्हाला ICICI Securities मार्फत एस.एम.एस./इमेल पाठवला जाईल त्यात तुम्ही केलेल्या ट्रेडचा सारा तपशील दिला जाईल.
६) तुम्ही २४/७ केव्हाही लॉग इन करून तुमच्या खात्याचा सर्व तपशील पाहू शकता किंवा हवे ते रिपोर्टसुद्धा पाहू शकता.
७) तुम्ही जर बाजाराचे वेळेत (सकाळी ९.१५ ते सायंकाळी ३.३० पर्यंत) वेळेअभावी ट्रेडिंग करू शकत नसाल तरी काळजी करण्याचे कारण नाही कारण तुम्ही दिवसाचे कोणत्याही वेळी तुमच्या सवडीनुसार VTC (Valid Till Cancellation) या सुविधेचा वापर करून शेअर्स अथवा अन्य उपलब्ध साधनात खरेदी विक्री ची ऑर्डर देवू शकता, उदा. आज सायंकाळी तुम्ही विविध कंपन्याचे शेअर्सचे भाव टी.व्ही. वर पाहिलेत, मारुतीचा शेअर तुम्हाला खरेदीसाठी आकर्षक वाटला व तुम्ही एका ठराविक दराने मारुती मोटर्स चा शेअर खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही तशी ऑर्डर रात्री झोपण्यापूर्वी केव्हाही लावू शकता अशी दिलेली ऑर्डर १ ते ३ महिने शाबूत राहू शकते व जर या काळात तुम्ही दिलेल्या दाराला जर मारुती मोटर्सच्या शेअरचा भाव कधीही आला तर तो तुमच्या ट्रेडिंग खात्यात घेतला जाईल. समजा तुम्ही आज असणारे दाराचे १०% कमी दराने तो शेअर खरेदी करण्याची ऑर्डर लावली व तो तसा आला कि लगेच तुमच्या खात्यात जमा होईल २ दिवसांनी तो शेअर तुमचे डिमॅट खात्यात जमा होईल यानंतर परत तो १०% वरच्या किमतीने तुम्ही परत विक्रीसाठी VTC ऑर्डर लावली व दर जर १०% शेअरची किंमत वर गेली तर तो शेअर आपोआप विकला जाईल व तुम्हाला फायदा मिळेल. ८) आपण संगणक किंवा मोबाईलचा वापर करून ट्रेडिंग करू शकता.
- Published in Demat
3-In-1 Account
आमचे मार्फत ICICI Securities चा unique 3-in-1 Account उघडा!
३-इन-वन अकाउंट म्हणजे काय?
यामध्ये तुम्हाला मिळते आयसीआयसीआय चे बचत खाते + आयसीआयसीआय चा डिमॅट खाते + ऑनलाईन शेअर ट्रेडिंग खाते याचा वापर करून आपण सुलभपणे शेअर ट्रेडिंग करू शकता. या सुविधेचा वापर करून तुम्ही बँकेचे व्यवहार, शेअर ट्रेडिंग, कंपनीचे शेअर्स मध्ये अथवा म्युचुअल फंडात सुलभपणे गुंतवणूक करू शकता, तसेच वेगवेगळ्या विमा योजना, सरकारी रोखे, आय.पी.ओ. आदी साधनातहि गुंतवणूक करू शकता, तसेच आपण केलेल्या गुंतवणुकीचे मुल्यांकन एकाच ठिकाणी पाहू शकता, वेगवेगळे रिपोर्टहि पाहू शकता.
एकच फॉर्म भरून आपणास हि सुविधा प्राप्त होते. ३-इन-वन अकाउंट कसे उघडावे?
१) आम्हाला संपर्क करा.
२) आमचा प्रतिनिधी आपणास संपर्क करून आपले 3-in-1 account खाते उघडण्यास मदत करेल.
- Published in Demat