एस.आय.पी.
Systematic Investment Plan (SIP) म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक:
आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला हा एकच जन्म आहे. गुंतवणुकीचे निर्णय महत्त्वाचे आहेत आहेत कारण आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला त्या निर्णयांचीच मदत होते. Systematice Investment Plan (SIP)म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन दरमहा रुपये 500/- इतक्या कमी रकमेने सुरु करता येतो. म्हणूनच हि योजना म्हणजे काही कालावधीत संपत्ती निर्माण कारण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आर्थिक नियोजनाचे एक सर्वोत्तम साधन आहे.
Systematic Investment Plan (SIP)म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन हे एक गुंतवणुक तंत्र असून त्याद्वारे तुमच्या पसंतीच्या म्युचल फंड योजनांमधून लहान लहान रकमा गुंतवून तुम्हाला भविष्यासाठी तरतुद करता येते. या योजनेद्वारे खात्री होते की गुंतवणूकदाराची गुंतवणूक शिस्तबद्ध रीतीने होत राहील आणि त्यामुळे आपली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी तो योग्य मार्गावर राहील. शिवाय गु्तवणूकीसाठी आयुष्यात लवकर सुरुवात केल्याने दोन शक्तिशाली गुंतवणूक धोरणांचा लाभ घेता येतो : रुपयाच्या किंमतीची सरासरी आणि चक्रवाढीची शक्ति. त्यामुळे चलनवाढ आणि चढत्या किंमती अशी स्थिती असताना दीर्घकालीन गुंतवणूक क्षितीज तुम्हाला संपत्ती निर्माणासाठी आणि उद्याची तरतुद करण्यासाठी मदतच करील.
SIP चे फायदे:
1) गुंतवणुकीचा शिस्तबद्ध पर्याय.
2) रुपयाचे किंमतीचे सरासरीचा फायदा मिळतो.
3) साधी, सोपी, सोयीची आणि लक्ष ठेवण्यास सुलभ अशी योजना.
4) चक्रवाढीचे लाभ.
एक मात्र लक्षात ठेवा म्युचल फंडात पैसे गुंतवताना दीर्घ काळासाठीच करा. शॉर्ट टर्म मध्ये काहीही होऊ शकते पण दीर्घ मुदतीत फायदाच होतो. दीर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष. सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्याय निवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरून देणे. गुंतवणूक शक्यतो काही दशकांसाठीच नियमितपणे करावी.
दरवर्षी आपले पगाराचे किंवा व्यवसायातील उत्पन्न हे वाढतच असते म्हणून आपली एस.आय.पी.ची मासिक गुंतवणूक सुद्धा दरवर्षी १०% ते २५% या प्रमाणात वाढवावी. हल्ली बहुतांशी फंड हाउसेस स्टेप अप एस.आय.पी. हा पर्याय फॉर्म भरतानाच देत असतात ज्यात दर सहा महिन्यांनी अथवा वार्षिक रु.५०० किंवा पाचशेच्या पटीत आपली गुंतवणूक वाढवण्याची सुविधा देतात, याचा प्रत्येक नवीन एस.आय.पी. सुरु करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने वापर अवश्य करावा.
- Published in Investment
एकदाच रक्कम गुंतवून दर महा पैसे काढणे
एकदाच एकरकमी गुंतवणू करुन नियमीत दर महा पैसे काढण्याचे उदाहरण:
म्युच्युअल फंडात एकरकमी रक्कम ठेऊन दरमहा ठरावीक रक्कम काढण्याची सुविधा आहे. या पर्यायालाSystematic Withdrawal Plan(एस.डब्ल्यू.पी.) असे म्हणतात.
हा पर्याय ज्याना नियमीत दर महा उत्पन्न हवे आहे त्यांचेसाठी अतिशय चांगला आहे मात्र रक्कम गुंतवताना ती किमान 10 वर्षासाठी तरी गुंतवावी व सुरुवातीला दर महा 1% म्हणजेच वार्षीक 12% दराने पैसे काढण्यास सुरूवात करावी व प्रत्येक वर्षानंतर आपल्या गुंतवणूकीचे मुल्य तपासून यात आवश्यक तर बदल करावा याचा फायदा हा होतो कि दिर्घ मुदतीत मुदलात भरीव वाढ होते व जस जशी महागाई वाढत जाईल तस तशी आपल्या गरजेनुसार दर महा काढावयाचे रकमेत वाढ करता येऊ शकते जेणे करून महागाईशी सामना करणे सुलभ होईल.
मी मात्र Systematic Withdrawal Plan (एस.डब्ल्यू.पी.) पेक्षा डिव्हिडंड पे आउट या पर्यायाला जास्त पसंती देतो कारण एस.डब्लू.पी. मध्ये आपली युनिट्स कमी करून आपणास पैसे दिले जातात त्यामुळे कधी न कधी तरी आपली युनिट्स संपतातच, तेजीचे कालखंडात हा पर्याय प्रभावी ठरतो, कारण कमी युनिट्स खर्ची पडतात, मात्र मंदीचे कालखंडात जेव्हा जास्त युनिट्स खर्ची पडतात तेव्हा हा पर्याय चांगला ठरत नाही. मात्र जर का आपण डिव्हिडंड पे आउट हा पर्याय निवडला तर आपली युनिट्स कधीच कमी होत नाहीत, कारण आपल्याला जो डिव्हिडंड मिळतो तो प्रती युनिट ठराविक पैसे/रुपये या स्वरुपात मिळतो.
आपली मिळालेली युनिट्स कायम रहातात, मुद्दलाचे मूल्य बाजाराचे चढ उतारानुसार कमी जास्त होते. जर आपले उदिष्ठ दीर्घ मुदतीचे असेल तर हा पर्याय फारच फायदेशीर ठरतो. म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित बहुसंख्य योजना वर्षातून एकदा डिव्हिडंड देतात व त्याचे सरासरी वार्षिक प्रमाण १०% ते १२% असे गुंतवणुकीवर पडते. मात्र काही योजना हल्ली मासिक डिव्हिडंड देतात, त्यापैकी HDFC Prudence Fund हि एक हायब्रीड प्रकारातील योजना असून जानेवारी २०१६ पासून दर महा प्रती युनिट ३० पैसे या दराने डिव्हिडंड देत आहे. हि योजना सन १९९८ पासून नियमित दर वर्षी डिव्हिडंड देत असून तेव्हापासूनचा सरासरी डिव्हिडंड ची रक्कम आपल्या गुंतवणुकीवर १३% पडलेली आहे. सध्या मिळणारे डिव्हिडंड चे मासिक उत्पन्न गुंतवणुकीवर सरासरी १% पेक्षा जास्त प्रतिमाह म्हणजेच वार्षिक १३% पेक्षा अधिक मिळत आहे. परत डिव्हिडंड पासून मिळणारे उत्पन्न वार्षिक रु.१० लाखापर्यंत करमुक्त असते. ज्यांना नियमिती दर महिना उत्पन्न हवे असेल त्यांनी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. ज्यांना वार्षिक डिव्हिडंड चालणार असेल त्यांनी अन्य योजनांची निवड केली तरी चालेल. ज्यांनी HDFC Prudence Fund या योजनेत सन १९९६ साली रु.१० लाख गुंतवले होते त्यांना एप्रिल २०१६ पर्यंत एकूण रु.६० लाख एव्हढा करमुक्त डिव्हिडंड मिळालेला असून मूळ गुंतवणुकीचे मूल्य २४ एप्रिल २०१६ रोजी रु.२८ लाखांपेक्षा जास्त आहे. अशा योजनेत किमान १० वर्षे किवा अधिक काळासाठी गुंतवणूक करावी. आपल्याकडे असणारे एकूण रकमेपैकी साधारण ४०% रक्कम अश्या योजनेत गुंतवावेत व बाकी रक्कम सुरक्षित साधनातच गुंतवावी.

- Published in Investment
एक रकमी गुंतवणुक
एकरकमी गुंवणूक कोणी करावी?
ज्याचेकडे सद्दस्थीतीत एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. अचानक धनलाभ झाला असता अतिरिक्त असणारी रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवावी. मात्र अशी गुंतवणूकीत बाजाराची जोखीम जास्त येते, यास्तव अशी गुंतवणूक करताना जी रक्कम आपणाला पुढील किमान 5 वर्षे तरी लागणार नाही एवढीच रक्कम गुंतवावी. चांगला व अपेक्षी फायदा झाला झाला असता जास्त मोहाला बळी न पडता रक्कम काढून घ्यावी अथवा 15 ते 20 वर्ष विसरुन जाता आले पाहिजे.
एक रकमी गुंतवणूक करताना खालील पर्य़ायाचा विचार अवश्य करा जेणे करुन मुद्दल तर सुरक्षीत राहील व मुद्दलावर मिळणा-या परताव्यासंबधीत गुंतवणूकी परतीच शेअर बाजाराची जोखिम राहील. (खालील पैकीडिव्हीडंड ट्रान्सफर योजनाहा पर्याय निवडून मासीक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करावी).
मासीक उत्पन्न योजना(Monthly Income Plan – MIP)
ज्यांना दरमहा करमुक्त उत्पन्न हवे आहे त्यांनी या प्रकारचे डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी. या योजनेत सर्वसाधारणपणे 80% गुंतवणूक हि निश्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक प्रकारात जसे कि सरकारी कर्ज रोखे, कंपन्यांचे कर्ज रोखे, मनी मार्केट इ. प्रकारचे पेपर्समध्ये केली जाते, ज्याची मुदत 1 ते 7 वर्षे असते असेच पेपर्स गुंतवणूकीसाठी निवडले जातात, जेणेकरुन व्याजदराचे बदलाचा कमीत-कमी परिणाम होतो. उर्वरीत 20% रक्कम हि समभाग व समभाग संबंधीत गुंतवणूक प्रकारात केली जाते. या योजनेत गुंतवणूकदाराला गुंतवणूकीचे तिन पर्याय असतात:
1) वृध्दी पर्याय: या पर्यायात गुंतवणूकीचे मुल्य बदलत जाते (शक्यातो वाढत जाते). रक्कम हवी तेव्हा काढता येते. यातून एक वर्षाचे आत रक्कम काढल्यास 0.25% ते 0.75% एवढा निर्गमन आकार आकारला जातो. एक वर्षानंतर रक्कम काढल्यास संपुर्ण रक्कम दिली जाते. या योजेत ज्याना कमीतकमी जोखिम व चांगले व करमुक्त उत्पन्न हवे आहे अशानी गुंतवणूकीसाठी हा पर्याय निवडावा.
2) डिव्हीडंड पेआऊट पर्याय: यामध्ये परत दोन प्रकार आहेत:
अ) मासिक डिव्हीडंड– हा पर्याय स्विकारला असता दरमहा डिव्हीडंड दिला जातो. प्रतीमहा मिळणारा डिव्हीडंड हा कमी जास्त होतो. मिळणारा डिव्हीडंड हा करमुक्त असतो.
आ) नियमित दर महिना उत्पन्न हवे आहे काय?
तुम्ही निवृत्त झालेली व्यक्ती आहात काय? तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर नियमित दर महिना ठराविक दराने (मासिक सुमारे १%+) करमुक्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा आहे काय? सन १९९८ पासून नियमित दर वर्षी लाभांश दिला जात आहे, जानेवारी २०१६ पासून तो दर महिना देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
इ) तिमाही डिव्हिडंड पर्याय– हा पर्याय स्विकारल्यास दर तिन महिन्यांनी डिव्हिडंड दिला जातो. मिळणारा डिव्हीडंड हा करमुक्त असतो.
ई) डिव्हीडंड पुर्नगुंतवणूक योजना: या योजनेत जाहिर होणारा डिव्हीडंड हा पुन: याच योजनेत गुंतवला जातो व यातील परतावा हा करमुक्त असतो.
उ) डिव्हीडंड ट्रान्सफर योजना: योजनेत जाहिर होणारा डिव्हीडंड हा समभाग संबधीत योजनेत वर्ग केला जातो. ज्या व्यक्तीना आपले मुद्दल पर्णत: सुरक्षीत रहावे व त्याचबरोबर शेअर बाजाराची थोडी जोखिम स्विकारुन आपले भांडवलात आकर्षक वृध्दी व्हाही असे वाटते त्यांचे साठी हा पर्याय सर्वोत्तम आहे. ज्या व्यक्ती एकदाच एक ठरावीक रक्कम गुंतवून हा पर्याय दिर्घ मुदतीसाठी निवडतात त्याना एसआयपी प्रमाणे उत्तम परतावा मिळाला आहे.
३) कॅपिटल अॅप्रीशिएशन सिस्टीमॅटीक ट्रान्सफर प्लान चा प्रभावीपणे वापर करून जोखीम फक्त व्याजापुर्ती मर्यादित ठेवता येते. अशाप्रकारे गुंतवणूक करून एस.आय.पी. चा फायदाही घेता येतो. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा.
- Published in Investment
गुंतवणूकदारांचे माहितीसाठी
केवळ गुंतवणूकदारांचे माहिती व मार्गदर्शनासाठी.
आपण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करु इच्छित असल्यास कोठेही गुंतवणूक करण्या पुर्वी हे अवश्य वाचा.
गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी:
1) स्वकष्टाने मिळविलेला पैसा गुंतवताना तो जेथे गुंतवला जाणार आहे त्याची परीपुर्ण माहिती करुन घ्या.
2) जी व्यक्ती तुम्हाला एखादे गुंतवणूक साधन विकावयास येते तेव्हा त्याची पार्श्वभूमी समजाऊन घ्या, तो हे काम पुर्ण वेळ करतो कि अर्धवेळ करतो आहे.
3) गुंतवणूक करणे हे तुमचे फायद्याचे आहे कि ते विकावयास आलेल्या व्यक्तीचे फायद्यासाठी तो तुम्हाला सुचवत आहे हे पडताळून पहा. तो फक्त त्या साधनाचे चांगल्या बाजुचीच माहिती देत असेल व त्यातील जोखमीची जर पूर्ण माहिती देत नसेल तर सावधान व्हा.
4) तुम्ही गुंतवत असलेल्या रकमेतून किती रक्कम वजा केली जाते हे तपासून पहा. ज्या साधनात गुंतवणूकीचे रकमेतून मुळातच कपात केली जाते अश्या कोणत्याही साधनात गुंतवणूक करू नका त्यात तुमचेच नुकसान व ते विकावयास आलेल्या प्रतीनिधीचाच फक्त लाभ असतो.
5) बाजारात येणा-या नविन योजनेच्या मोहात पडू नका, यांत तुमचेच नुकसान होण्याची शक्यता अधिक.
6) जीवन विमा हा प्रत्येक व्यक्तीलाच अत्यावश्यक आहे मात्र जीवन विमा हे बचतीचे किंवा गुंतवणूकीचे साधन होऊच शकत नाही. गुंतवणूकीसाठी बाजारात अनेक पर्याय आहेत, त्यांची माहिती करून घेऊन अशा साधनात गुंतवणूक करावी. जीवन विमा हा फक्त टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा व गुंतवणूक हि फक्त गुंतवणूक साधनातच करावी.
7) विमा प्रतीनिधी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा तो त्याला टर्म इंशुरन्सबद्दल माहिती देण्यास सांगा ह्यात तो टाळाटाळ करू लागला तर, एक तर त्याचे ज्ञान तोकडे आहे किंवा तो स्वत:चे कमीशनचाच विचार करतो आहे हे पक्के लक्षात घ्या.
8) शेअर बाजाराचे त्रोटक ज्ञान किंवा दुस-याने दिलेल्या टिपस् आधारे शेअर बाजारात गुंतवणूक/ट्रेडिंग करुन नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते, त्यापेंक्षा म्युचअल फंडात दिर्घ मुदतीसाठी पण नियमीतपणे थोडी-थोडी का होईना गुंतवणूक केल्यास चांगला नफा होण्याचीच शक्यता असते.
युलिप व म्युचअल फंड तुलना
म्युचल फंड गुंतवणूकीचे माध्यम | युलिप (Unit Link Insurance Plan) |
म्युचल फंड हे पूर्णतः गुंतवणूकीचे साधन आहे | ULIP हे इंशुरन्स कंपन्याचे प्रॉडक्ट आहे |
म्युचल फंडाला एंट्री लोड अजीबात नसतो त्यामुळे सर्व रक्कम गुंतवणूकिला जाते | युलिप मध्ये पहिल्या वर्षी एंट्री चार्जेस २% ते १०% एवढे भारी असतातयाव्यतरीक्त दरवर्षी सुमाशरे ७% आकार पडतो |
नंतर कितीही वेळा गुंतवणूक केली तरी वरिल प्रमा़णेच एंट्री लोड लागत नाही व सर्व रक्कम गुंतवणूकिला जाते. | युलिप मध्ये दुस-या वर्षापासून ०% ते ४% एवढे असतात. याव्यतरीक्त दरवर्षी सुमाशरे ७% आकार पडतो |
एंजटला कमिशन 0.5% ते 0.75% एवढेच मिळते | एंजटला कमिशन ५% ते १०% एवढे मिळते |
वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तर ३ -या वर्षी एकूण निव्वळ परतावा सुमारे 33% पेंक्षा जास्त होतो | वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तरI ३ -या वर्षी एकूण एकूण गुंतवणूकी एवढेसुध्दा गुंतवणूक मुल्या होत तर नाहीच पण गुंतवणूकदार नुकसानीतच असतो |
गुंतवणूक म्हणूनच विकले जाते आणि गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय | इंशुरन्स प्रॉडक्ट असूनही गुंतवणूकदारांची दिशाभूल करुन एजंट लोकं हे गुंतवणूक प्रॉडक्ट म्हणूनच विकतात |
गुंतवणूकदाराला फायदेशीर | गुंतवणूकदाराचे नुकसान व फक्त एजंट साठी फायदेशीर |
गुंतवणूकदाराने यात गुंतवणूक करावी | जीवन विमा हा अत्यावश्यक आहे यात काहीच संशय नाही मात्र तो टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा |
म्युचअल फंडात गुंतवणूकीचे फायदे:
- गुंतवणूक करताना कोणताही आकार नसल्यामुळे संपूर्ण रक्कम गुंतवणूकीला जाते. वजावट शुन्य.
- तज्ञांचे मार्गदर्शन
- कमी जोखीम
- आवश्यक तेव्हा केव्हाही पैसे काढून घेण्याची सुवीधा.
- रोजचे रोज मुल्य समजते
- कमीत कमी खर्च
- पारदर्शकता
- आयकर मुक्त परतावे
- सेबी व अँफीचे नियंत्रण
- आयकर कलम 80-सी खाली वजावट मिळणारे योजनेत गुंतवणूकीची सुविधा – यात 3 वर्ष पैसे मात्र काढता येत नाहीत.
म्युचअल फंडात गुंतवणूकीचे तोटे:
- परतावे अनिश्चीत असतात.
- शेअर बाजाराचे चढ उताराची जोखीम असते.
- स्वत:ला नियंत्रण ठेवता येत नाही.
- बाजार कोसळून नुकसान झाल्यास दिर्घ काळ थांबण्याची तयारी असावी लागते.
- मागील कामगिरीचे आधारानेच गुंतवणूक करता येते.
टर्म इंशुरन्स व म्युचअल फंड असे समीकरणाने गुंतवणूक केली तर पुढे काय होऊ शकते याचे काल्पनीक उदाहरण:
गुंतवणूक सुरु करताना वय | दर महा टर्म इंशुरन्स हप्ता | दर महा म्युचअल फंड गुंतवणूक | एकूण मासीक हप्ता | जीवन विमा मुदत वर्षे | मिळणारे जीवन विमा संरक्षण | गुंतवणूक काढून घेताना वय वर्ष | मिळणारे गुंतवणूक मुल्य |
18 | 382 | 722 | 1104 | 30 | 25 लाख | 48 | 50 लाख |
19 | 391 | 722 | 1113 | 30 | 25 लाख | 49 | 50 लाख |
20 | 397 | 722 | 1119 | 30 | 25 लाख | 50 | 50 लाख |
21 | 411 | 722 | 1133 | 30 | 25 लाख | 51 | 50 लाख |
22 | 423 | 722 | 1145 | 30 | 25 लाख | 52 | 50 लाख |
23 | 436 | 722 | 1158 | 30 | 25 लाख | 53 | 50 लाख |
24 | 450 | 722 | 1172 | 30 | 25 लाख | 54 | 50 लाख |
25 | 466 | 722 | 1188 | 30 | 25 लाख | 55 | 50 लाख |
26 | 484 | 722 | 1206 | 30 | 25 लाख | 56 | 50 लाख |
27 | 505 | 722 | 1227 | 30 | 25 लाख | 57 | 50 लाख |
28 | 527 | 722 | 1249 | 30 | 25 लाख | 58 | 50 लाख |
29 | 552 | 3339 | 3891 | 30 | 25 लाख | 59 | 50 लाख |
30 | 582 | 3339 | 3921 | 30 | 25 लाख | 60 | 50 लाख |
31 | 618 | 3339 | 3957 | 30 | 25 लाख | 61 | 50 लाख |
32 | 662 | 3339 | 4001 | 30 | 25 लाख | 62 | 50 लाख |
33 | 709 | 3339 | 4048 | 30 | 25 लाख | 63 | 50 लाख |
34 | 762 | 3339 | 4101 | 30 | 25 लाख | 64 | 50 लाख |
35 | 821 | 3339 | 4160 | 30 | 25 लाख | 65 | 50 लाख |
36 | 773 | 3339 | 4112 | 25 | 25 लाख | 61 | 50 लाख |
37 | 837 | 3339 | 4176 | 25 | 25 लाख | 62 | 50 लाख |
38 | 907 | 3339 | 4246 | 25 | 25 लाख | 63 | 50 लाख |
39 | 985 | 3339 | 4324 | 25 | 25 लाख | 64 | 50 लाख |
40 | 1073 | 3339 | 4412 | 25 | 25 लाख | 65 | 50 लाख |
41 | 635 | 4000 | 4635 | 20 | 15 लाख | 61 | 50 लाख |
42 | 689 | 4000 | 4689 | 20 | 15 लाख | 62 | 50 लाख |
43 | 751 | 4000 | 4751 | 20 | 15 लाख | 63 | 50 लाख |
44 | 815 | 4000 | 4815 | 20 | 15 लाख | 64 | 50 लाख |
45 | 883 | 4000 | 4883 | 20 | 15 लाख | 65 | 50 लाख |
46 | 696 | 8000 | 8696 | 15 | 12 लाख | 61 | 50 लाख |
47 | 754 | 8000 | 8754 | 15 | 12 लाख | 62 | 50 लाख |
48 | 817 | 8000 | 8817 | 15 | 12 लाख | 63 | 50 लाख |
49 | 886 | 8000 | 8886 | 15 | 12 लाख | 64 | 50 लाख |
50 | 962 | 8000 | 8962 | 15 | 12 लाख | 65 | 50 लाख |
51 | 758 | 19500 | 20258 | 10 | 10 लाख | 61 | 50 लाख |
52 | 821 | 19500 | 20321 | 10 | 10 लाख | 62 | 50 लाख |
53 | 889 | 19500 | 20389 | 10 | 10 लाख | 63 | 50 लाख |
54 | 964 | 19500 | 20464 | 10 | 10 लाख | 64 | 50 लाख |
55 | 1047 | 19500 | 20547 | 10 | 10 लाख | 65 | 50 लाख |
56 | 29000 | 29000 | 0 | 0 | 61 | 25 लाख | |
57 | 29000 | 29000 | 0 | 0 | 62 | 25 लाख | |
58 | 29000 | 29000 | 0 | 0 | 63 | 25 लाख | |
59 | 29000 | 29000 | 0 | 0 | 64 | 25 लाख | |
60 | 29000 | 29000 | 0 | 0 | 65 | 25 लाख |
वयाप्रमाणे जीवन विमा संरक्षण व मुदत यात यांत बदल केला आहे तसेच विमा हप्ता बदलला आहे.
वय वर्षे 18 त 55 पर्यंत मुदती अंती रुपये 50 लाख मिळावेत या दृष्टीने म्युचअल फंड गुंतवणूक 15% दराने करावयास हवी ती धरली आहे.
वय वर्षे 56 त 60 पर्यंत मुदती अंती रुपये 25 लाख मिळावेत या दृष्टीने म्युचअल फंड गुंतवणूक 15% दराने करावयास हवी ती धरली आहे.
हे फक्त उदाहरण आहे. प्रत्यक्षात गुंतवणूकदाराचे गरजे नुसार व द.म. गुंतवणूकीचे क्षमतेनुसार बदल करावा लागेल.
म्युचअल फंडातून मिळणारा परतावा हा शेअर बाजाराचे चढ उतारावर अवलंबून असतो, सबब याकडे फक्त एक उदाहरण म्हणूनच पहावे.
- Published in Investment
विमा ही गुंतवणूक नाही.
विमा ही गुंतवणूक नाही.
जीवन-विमा हा प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु ब-याच व्यक्ती विमा पॉलीसी घेणे म्हणजेचगुंतवणूक करणे असा गैरसमज करुन घेत असतात.
मला हल्लीच एक मेल आला होता. त्यात असे लिहिले होते की ‘गेल्या वर्षी, ‘मी रु.२ लाखाची गुंतवणूक केली होती पैकी रु.८०,०००/- मी विम्यात गुंतवले होते.’ ह्या एकाच वाक्यामुळेच मला हा लेख लिहावा असे वाटत आहे. तसे पाहिल्यास या मेलमध्ये विशेष असे काहीच नाही. कारण मला नेहमीच गुंतवणुकीबाबत सल्ला विचारणारे मेल येतच असतात. परंतु येणा-या बहुतांशी मेलमधील मानसिकता ही अशीच असते, हे खरंच चिंताजनक आहे.
सर्वच माध्यमातून येणा-या जाहीराती व प्रभावी विक्रीतंत्रच या अशा मानसिकतेला कारणीभूत असते. तसेच सर्व विमा कंपन्यांचेएजंट लोकांच्या मनात असा ग्रह करुन देत असतात, की “तुम्ही अमुक एक रकमेचा मासिक/त्रैमासिक/वार्षिक विमा हप्ता भरुन तुमचे भविष्य सुरक्षित करा, तुम्हाला अमुक एक वर्षानंतर एवढी रक्कम मिळेल, परत जर काही अघटीत घडले तर वारसाला एवढी रक्कम मिळेल, शिवाय तुम्हाला कलम ८०-सी अंतर्गत आयकरात सुटही मिळेल”, असंच काहीतरी तुमचा एजंट वर्षानुवर्षे तुम्हाला सांगत असतो व यालाच बळी पडून तुमचा असा समज होतो की विमा काढणे ही फारच चांगली गुंतवणूक आहे.
पूर्वी विमा विकताना एजंट – एजंट मध्ये स्पर्धा असायची. कारण यातून मिळणारे कमिशनचे व विविध लाभ, जसे की अमुक एक टार्गेट पूर्ण केले की काही वस्तु, सोने, गाडी, परदेशदौरा इ. हेही एक कारण होते व आहे. पूर्वी विमा कंपन्यांच्या जाहीराती फारच कमी प्रमाणात केल्या जात असत मात्र सध्यातर अनेक विमा कंपन्या बाजारात असल्यामुळे त्यांच्यातही व्यावसाईक स्पर्धा एवढी वाढली आहे की, त्याना विविध प्रकारच्या माध्यमातून सतत जाहीराती कराव्याच लागतात. हा सततचा होणारा भडिमार हेही ‘विमा म्हणजे गुंतवणूक’ असे समजण्यामागे आहेच. एका सर्व्हेनुसार तीन वर्षापूर्वी जेवढ्या जाहीराती विमा कंपन्या करत होत्या त्यात आता जवळपास ८ पट वाढ झालेली आहे. तसे पाहिल्यास सध्याच्या जगात ह्यात गैर असे काहीच नाही. कारण हा काळच मुळी स्पर्धेचा आहे व स्पर्धा म्हटली की सारे काही माफ. पण ह्यामुळे पुरेसा विमा घेऊन आपल्या वारसांचे जीवन सुरक्षीत केलेले आहे असा लोकांचा गैरसमज होतो. प्रत्यक्षात मात्र खेदाने असे नमूद करावेसे वाटते, की विम्याचा हा जो असा प्रचार व प्रसार केला जात आहे,तोच मुळी चुकीचा आहे.
आणि म्हणूनच हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण विमा कंपन्यांमध्ये जमा केला जाणारा हप्त्याच्या रुपातील पैसा हा, विमा संरक्षणासाठी कमी व गुंतवणूक म्हणून जास्त प्रमाणात केला जातो. ह्याचे सर्वात महत्वाचे व प्रमुख कारण जर कोणते असेल तर गेल्या अनेक पिढ्यांपासून, विमा एजंट या जमातीने असा एक भ्रम सार्वत्रिकरित्या पसरवलेला आहे की ‘टर्म इन्शुरन्स’ विकत घेणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे, कारण यात भरलेले पैसे तुम्हाला कधीच हयातीत परत मिळत नाहीत. हे असं का घडतं? तर तुमच्या मागे नेहमीच कोणता ना कोणता विमा एजंट तुम्हाला गाठून तुम्हाला ‘विमा ही कशी चांगली गुंतवणूक आहे?’ हे तुमच्या कानीकपाळी ओरडत असतो. काही वेळा ही ब्याद आपल्याकडे नको म्हणून काही व्यक्तीच तुमचा रेफरन्स त्याला देत असतात. मात्र तुम्हाला विमा विकताना तो स्वत:हून कधीच ‘टर्म इन्शुरन्स’ बद्दल चकार शब्दसुध्दा बोलत नाही. उलट जर तुम्ही याबाबत त्याला काही विचारले, तर तो तुम्हाला लगेच असे निदर्शनाला आणून देतो की यातून तुम्हाला काहीच परत मिळणार नाही. आणि निश्चितच तुम्ही ज्यातून आपल्याला काहीच जर मिळणार नसेल तर कशाला ‘टर्म इन्शुरन्स’ विकत घ्यावयाचा असा विचार करुन तीच विमा पॉलीसी विकत घेता ज्यातून तुम्हाला काही वर्षानंतर पैसे परत मिळणार असतात. इथे तो एजंट मनात खुश होत गालातल्या गालात हसत असतो, “कसं मी बरोबर पटवल! आता मला पहिल्या वर्षी एवढे कमीशन मिळेल व नंतर अमुक-अमुक वर्षे मला नियमित एवढे-एवढे वार्षिक कमिशन मिळत राहील.” थोडक्यात त्याने तुम्हाला कसे गंडवले हे कधीच कळत नाही.
आता तुम्ही विचाराल की ‘या प्रकारच्या पारंपरिक विमा पॉलिसीतून काही फायदा असतो की नाही?’ तर निश्चितच असतो, पण यातील सर्वात जास्त फायदा हा त्या एजंटला असतो, ज्याने तुम्हाला हा विमा विकलेला असतो. याचे प्रमुख कारण असते ते म्हणजे विमा एजंटने केलेली तुमची मानसिक अवस्था, ज्यामुळे तुम्ही तो विकत घेता. विमा एजंट याला बहुतांशी ‘Life’ संबोधत असतात. येथेच तर सारी गल्लत आहे. ‘Life’ जेव्हा असा विचार करतो की, आपल्याला अमुक एवढे विमा संरक्षण मिळाले आहे, त्याचवेळी विमा एजंट व विमा कंपनी मात्र त्यांच्यासाठी विमा हप्ता हे पैसे मिळवण्याचे एक माध्यम समजत असतात. या वेळी ‘Life’ मात्र विचार करत असतो की जर माझा अचानक मृत्यु झाला, तर माझ्या पत्नीला/पतीला किंवा अन्य वारसाला रु.२० लाख मिळतील जे त्यांचेसाठी पुरेसे असतील. एकदा का ‘Life’ च्या आयुष्याची (Life) किंमत गळी उतरवली की तो एजंट त्याच्या मनातील ‘टर्म इन्शुरन्स’ चा कीडा अलगद बाजूला करण्यात यशस्वी होतो आणि त्याबदल्यात तो विकत असतो एक अतिशय खर्चिक विमा पॉलीसी.
मी जे काही इथे सांगत आहे ते तुम्ही सहजपणे पडताळून पाहू शकता. आता असे करा की तुम्ही तुमच्या माहितीतल्या एका विमा एजंटला फोन करुन सांगा की तुम्हाला रु.२० लाखाचे विमा संरक्षण घ्यावयाचे आहे तेव्हा मला एखादा चांगली विमा योजना सांग.तसेच दुर-या एका विमा एजंटला फोन करून सांगा की तुम्हाला रु.२० लाखाचा जीवन विमा विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी मीवार्षिक रु.३०००/- चाच हप्ता भरण्यास तयार आहे, तेव्हा मला एखादी चांगली विमा योजना सुचव. आता तुम्हाला जो पहिला एजंट भेटावयास येईल तो तुम्हाला ‘टर्म इन्शुरन्स’ बाबत चकार शब्दसुध्दा न सांगता एखादी पारंपरिक विमा योजना तुमच्या समोर सादर करेल. मात्र तुम्ही बोलावलेल्या दुस-या एजंटची जेव्हा खात्री होईल की, तुम्ही वार्षिक रु.३०००/- पेक्षा जास्त हप्ता भरावयास तयार नाही, तेव्हा तो नाईलाजाने का होईना ‘टर्म इन्शुरन्स’ च्या योजनेची माहिती अवश्य देईल. कारण त्याला धंदा घालवावयाचा नसतो.
विमा विक्रीचे सद्य रुप अधिक विमा खरेदी करणा-यांची पॉलीसीच्या लाभाची लालसा याचा एकत्रित परिणाम म्हणजे वर सांगितलेलेविम्याबाबतच अज्ञान, ज्यामुळे बचतीची चांगली सवय असणारे बरेचसे भारतीय, बाजारात अनेक गुंतवणुकीची साधने उपलब्ध असूनही त्यामध्ये गुंतवणूक न करता विम पॉलिसी हेच गुंतवणुकीचे माध्यम समजून त्यात पैसे टाकत असतात. कारण मुळातच त्याना इन्शुरन्स व गुंतवणूक यातील फरकच समजेला नसतो. तसेच विम्याचा सर्वोत्तम पर्याय कोणता? तो कोणी व कधी घ्यावा हे अजिबात माहीतच नसते व त्यामुळे वारंवार त्याच-त्याच चुका केल्या जात असतात. यामुळेच गोंधळाची परिस्थिती उद्भवत असते.
आता हेच पहा, गुंतवणुकीसाठी प्रत्येक माणसाच्या गरजेनुसार व जोखीम स्विकारण्याच्या तयारी/क्षमतेनुसार आर्थिक बाजारामध्येविविध गुंतवणूकीच्या योजना उपलब्ध असतात. मात्र अज्ञानामुळे या चांगल्या माध्यमाचा उपयोग गुंतवणुकीसाठी फारच थोड्या व्यक्ती करत असतात. आता कमिशनच्या बाबतीत बोलवयाचे झाल्यास इन्शुरन्स व अन्य गुंतवणूक पर्याय या दोन्ही प्रकारातील एजंटना कमिशन हे मिळतच असते. कारण गुंतवणूक करु इच्छीणा-याला कोणाला तरी त्याचा मोबदला द्यावा लागतो, एवढ्यावरच या दोन प्रकारच्या एजंट मधील तुलना संपते.
आता आपण प्रथम हे पाहुया की विमा म्हणजे काय? आणि तो कशा स्वरुपात घ्यावा? आणि इन्शुरन्स व गुंतवणुकीतील महत्वाचा फरक तो काय? एका वाक्यात सांगायचे झाले तर विमा म्हणजे भविष्यातील आर्थिक गरजेचे संरक्षण विकत घेणे. जर काही कारणाने एखाद्या मिळवत्या व्यक्तीचा अकाली मृत्यु झाला, तर त्याच्या पश्चात रहाणा-या व त्याच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींनाआर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी जीवन विमा संरक्षण गरजेचे असते. तसेच मालमत्तेचा, आजारपणाचा, कायदेशीर दायीत्वाचा आणि अनेक गोष्टींचा योग्य तो विमा उतरवणे हे जीवनविम्या इतकेच महत्वाचे असते. आपल्या जीवनाचा विमा उतरवताना सर्वोत्तम विमा योजना म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स’ ज्यामध्ये तुम्ही फक्त विम्याचीच रक्कम, ज्या उद्देशासाठी विमा घ्यावयाचा आहे त्यासाठीच भरत असता. कारण विम्याचा खरा उपयोग हा आपल्या प्रिय व्यक्तीना आपल्या पश्चात आर्थिक सुरक्षेची गरज म्हणून असतो. मात्र ज्यावेळी तुम्ही ‘टर्म इन्शुरन्स’ व्यतिरिक्त अन्य विम्याची योजना विकत घेता, त्यावेळी तुम्ही गुंतवणूक समजून तो विकत घेत असता. जेव्हा गुंतवणूक समजून विमा विकत घेता तेव्हा, तुम्ही अन्य गुंतवणुकीपासून मिळणा-या लाभांना मुकत असता. कारण गुंतवणूकीच्या तत्त्वात न बसणारी अनेक कारणे इन्शुरन्समध्ये आहेत. यातील काही कारणे:
तरलतेचा अभाव: गुंतवणूक ही नेहमीच तरल (लिक्वीड) असलीच पाहीजे. कारण हा गुंतवला जाणारा पैसा तुमचा आहे, तो तुम्हाला काही सहजपणे मिळालेला नसतो तर त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागलेले असतात. वर तुमच्या काही इच्छा आकांक्षा बाजुला सारुन तुम्ही तो बाजुला काढलेला असतो. म्हणूनच जर का अचानक गरज लागली तर तो केव्हाही उपयोगात आणता आलाचपाहीजे, अन्यथा वेळेला उपयोगी न येणा-या गुंतवणूकितील पैशाचा उपयोगच काय. आता इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबत काय होते की,गुंतवणूक म्हणून जी रक्कम तुम्ही गुंतवलेली असते ती अतीदिर्घ मुदतीसाठी (विमा पॉलीसीच्या मुदतीनुसार) अडकून रहात असल्याने ती तुम्हाला मध्येच, हवी तेव्हा, काढता येत नाही. या व्यतिरिक्त कोणतीही विमा योजना, त्या प्रकारातील कोणत्याही गुंतवणूक साधनापेक्षा, खूपच कमी परतावा गुंतवणुकीवर मिळवून देत असते. आता अशी कोणती योजना आहे कि जी गुंतवणूकीबरोबरच करबचतीचासुद्धा लाभ देते? तर यासाठी चांगले पर्याय म्हणजे काही रक्कम पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात गुंतवणे व काही रक्कम म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत गुंतवणे हा होय. पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात ५ वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो तर म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत ३ वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो. या दोन्ही योजनेतील लॉक-इन पिरियड हा विमा पॉलिसीपेक्षा खूपच कमी असतो व दोन्ही गुंतवणूकीतून विमा योजनेप्रमाणेच कलम ८०-सी अंतर्गत आयकरात सूट मिळते.
पारदर्शकतेचा अभाव: आम्ही असे मानतो की सर्व प्रकारच्या गुंतवणूक पर्यायात पारदर्शकतेला अनन्यसाधारण महत्व असलेच पाहीजे.ज्या विमा योजनेला बरेच लोकं गुंतवणूक म्हणून पहात असतात त्यात या गोष्टीचा पूर्ण अभाव असतो. ज्या गुंतवणूक साधनात पारदर्शकता नसते त्याच साधनात सर्वसाधारणपणे घोटाळे, अकार्यक्षमता आणि असमाधानकारक कामगिरी होत असते. भारतातील म्युच्युअल फंड उद्योग ज्या प्रमाणात पारदर्शकता व चांगली कामगिरी करत असताना भारतातील विमा क्षेत्रात मात्र त्या तुलनेतकोणतेच मापदंड दुर्दैवाने पाळले जात नाहीत. यामुळेच तुम्ही विमा योजनेत गुंतवलेले पैसे कोठे गुंतवले जातात, ते कोणकोणत्या साधनात व किती प्रमाणात गुंतवले जातात या बाबतच फारच थोडी जाणकारी तुम्हाला विमा कंपनीकडून दिली जात असते. या बाबतीत म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक योजनेत याची माहीती व्यवस्थित पणे दिलेली असते. म्युच्युअल फंडात रोजच्यारोज निव्वळ मालमत्ता मूल्य, गुंतवणुकीचा तपशील, जर नियमात काही बदल झाले तर ते लगेच तुम्हाला समजून घेण्याची सोय असते. जर फंड मॅनेजर किंवा एखाद्या महत्वाच्या जागेवरील व्यक्तीमध्ये बदल झाला तर तो सार्वजनिक केला जातो ज्यामुळे गुंतवणूकीच्या व्यवस्थापनात किंवा निर्णयात काय बदल घडू शकतो याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. हे सारे नियम खरं म्हणजे विमा क्षेत्रालाही लागू करणे गरजेचे आहे. पण सध्या तरी याचा अभावच दिसुन येत आहे.
किंमत (कॉस्ट): जे एजंट म्युच्युअल फंडाच्या योजना, रिझर्व्ह बँकेचे सरकारी रोखे, कंपन्यांचे बॉंड, पोस्टल डिपॉझीटस, पीपीएफ या प्रकारातील आर्थिक उत्पादने विकतात त्याना मिळणारे कमिशन व इन्शुरन्स एजंट यांना मिळणारे कमिशन यात जमिन अस्मानाचा फरक आहे. खर म्हणजे विमा एजंटला दिले जाणारे जास्त कमिशन ही गुंतवणूकदाराची केली जाणारी लूटच आहे. आता तुम्ही जेव्हा एखादी पारंपरिक विमा योजना विकत घेता, तेव्हा विमा एजंटला पहिल्या वर्षी सरासरी ४०% पर्यंत कमिशन दिले जाते, दुस-या वर्षी ते ७.५% ते १०% या दरम्यान दिले जाते व नंतरच्या उर्वरीत वर्षात ते ५% दराने दिले जाते. म्हणजेचे जर करबचत व गुंतवणूक या उद्देशाने तुम्ही पुढील २५ वर्षानंतर मॅच्युअर होणा-या विमा योजनेत दर वर्षी रु.१.५० लाख गुंतवले तर एजंटला मिळणारे एकूण कमिशन होते रु.२,४७,०००/- (पहील्या वर्षाचे रु.६०,०००/- + दुस-या वर्षाचे रु.१५,०००/- + पुढील २३ वर्षाचे प्रत्येक वर्षी रु.७,५००/- प्रमाणे रु.१,७२,५००/-). आता जे आर्थिक उत्पादन तुम्ही गुंतवणुकीचे साधन म्हणून विकत घेत असता, त्याच्या सेवेसाठी दिली जाणारी कमिशनची रक्कम ही फारच मोठी होते, ज्यामुळे मूळ गुंतवणुकदाराला मिळणारा परतावा हा खूपच कमी होत असतो. खरं म्हणजे हा कमिशनचा जास्त दर हाच मुळी विमा योजना ही गुंतवणुकीचे अत्यंत सामान्य साधन आहे हे सांगण्यास पुरेसे आहे.म्हणूनच सोकॉल्ड सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून विमा योजनेत गुंतवली जाणारी रक्कम हे अत्यंत वाईट डिल गुंतवणूकदारासाठी असते.
विमा हा जवळपास प्रत्येकाचीच ठराविक काळापर्यंत गरज आहे यात दुमत असण्याचे कोणतेच कारण नाही. परंतु प्रथम तुम्हाला किती रकमेचे विमा संरक्षण हवे आहे हे निर्धारीत करा व त्यानंतर तेवढे विमा संरक्षण ‘टर्म इन्शुरन्स’ च्या माध्यमातून घ्या व त्याच वेळी तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार बाजारात उपलब्ध असणारी सर्व गुंतवणूक साधने तपासा, त्यांची मागील कामगिरी तपासा व नंतरच तुमच्या गुंतवणूकीचा निर्णय घ्या हाच खरा शहाणपणा होय.
परत एकदा सांगतो की विमा व गुंतवणूक यांची गल्लत करु नका, यातच तुमचे उज्चल आर्थिक भविष्य दडलेले आहे.
- Published in Investment
मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?
मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?
नुकतीच मला Whatsapp गृपवर मध्यमवर्गातील व्यक्तीने कोणत्या साधनात व किती प्रमाणात गुंतणूक करावी असा प्रश्न विचारला गेला होता म्हणूनच हा ताजा लेख मी आजच लिहिला आहे तो आपणास कदाचित मार्गदर्शक होऊ शकेल.
सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय व्यक्ती हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या सुरक्षित साधनात गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत असतो. परंतु आजकाल बँक ठेवींवरील व्याजाचे दर हे ७% पर्यंत कमी झालेले असून जर भविष्यात महागाईचा दर नियंत्रणात राहिला तर RBI व्याजदर आणखी कमी करू शकेल. आपणास माहित असेलच कि मुख्यत्वेकरून आपल्या सारख्या Developing Country मध्ये दरवर्षीच महागाई वाढतच असते यामुळे रुपयाची किंमतही दरवर्षी कमी होत असते. बँकेकडून मिळणाऱ्या व्याजातून जर महागाईचा दर कमी केला तर खरे म्हणजे फक्त पैसे सुरक्षित ठेवण्याचे उद्दिष्टच फक्त यातून पुरे होऊ शकते. यामुळे बँकेत नियमित बचत किंवा ठेवी करून दीर्घ काळात संपत्ती निर्माण करता येत नाही हि वासुस्थिती आहे. यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणुकीचे अन्य पर्याय शोधलेच पाहिजेत.
नियमित किंवा एकरकमी गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्याची ताकद हि शेअर बाजारात सर्वाधिक जास्त आहे हे सिद्ध झालेले त्रिकालाबाधित सत्य आहे, याचा अर्थ आपली सर्वच गुंतवणूक हि शेअरबाजारात किंवा म्युचुअल फंडात करावी असा होत नाही. आपली गुंतवणूक हि विविध साधनात विभागलेली असली पाहिजे कारण शेअरबाजारात कायम तेजी राहणार नाही आणि जर मंदीच्या काळात पैशाची गरज लागली तर नुकसानीत पैसे काढावे लागतील, म्हणून आपली गुंतवणूक विभागून ठेवावी. मात्र आपल्या गुंतवणुकीचा काही हिस्सा हा शेअरबाजारात गुंतवलेला असलाच पाहिजे.
कोणत्या साधनात किती प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी शास्त्र आहे परंतु हे व्यक्तीसापेक्ष बदलत राहते कारण प्रत्येक व्यक्तीची गुंतवणुकीची गरज वेगवेगळी असते, जोखीम स्वीकारण्याची क्षमता व तयारी वेगवेगळी असते. गुंतवणूक कोणत्या साधनात करावी याचा निर्णय करताना अनेक गोष्टी विचारात घ्याया लागतात, वय, मिळकत, मिळकत स्थिर आहे कि अस्थिर आहे, नोकरी का व्यवसाय, घरात किती व्यक्ती आहेत, त्यातील किती व्यक्ती मिळवत्या आहेत असल्यास त्यांचे उत्पन्न किती, किती व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहेत, किती काळासाठी गुंतवणूक करण्याची तयारी आहे, गुंतवणूक कोणत्या उद्देशाने करावयाची आहे, गुंतवणूक नियमितपणे करावयची आहे कि एकरकमी करावयाची आहे इ. अनेक गोष्टींचा विचार करूनच तुमचा चांगला व अनुभवी गुंतवणूक सल्लागार तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देत असतो. यामुळे सर्वांना एकाचप्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला मी देऊ शकत नाही मात्र, काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे.
गुंतवणुकीचे प्रमाण हे वयोमानानुसार बदलते असावे, यासाठी विविध प्रकारची गणितीय सूत्र अवलंबली जाते. मात्र समजण्यासाठी सोपे म्हणून १०० या संखेतून तुमचे वय वजा करता जी बाकी येईल तेवढ्या प्रमाणातील रक्कम हि दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअरबाजार व म्युचुअल फंडात गुंतवावी व हे प्रमाण दरवर्षी वयानुसार बदलते ठेवणे शक्य होत नाही म्हणून किमान दर ५ वर्षांनी तरी ते बदलत न्यावे.
- नियमितपणे किती गुंतवणूक करावी: सर्वसाधारणपणे भारतीय लोक त्यांच्या मासिकप्राप्तीच्या सरासरी ३५% रकमेची गुंतणूक करतो. हे प्रमाण योग्य आहे, मात्र व्यक्तीसापेक्ष ते बदलू शकते. २५ ते ३० वर्षाचे व्यक्तीने जेव्हा जबाबदारी नसते तेव्हा जास्त गुंतवणूक करावी व एकदा खर्च सुरु झाले कि ती कमी करून किमान ३५ ते ४०% एवढीतरी करावी.
- लिक्विड फंड: आकस्मिक खर्चाच्या तरतुदीसाठी या फंडात किमान आपल्या ६ महिन्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम कायम ठेवावी. यात सरासरी आपल्या गुंतवणुकीच्या १०% रक्कम गुंतवत जावी.
- शेअर मार्केट: शेअरबाजारात जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर मध्यमवर्गीय नोकरदार माणसाने ते शक्यतो टाळावे कारण अभ्यास नसतो व वेळ नसतो. मात्र जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करू इच्छित असाल तर अवश्य करावी. यासाठी अशी एखादी चांगली कंपनी निवडावी कि जिचे कॅपिटल कमी आहे मात्र त्या कंपनीच्या उत्पादनाची सर्वत्र व जास्त प्रमाणात विक्री होते थोडक्यात ज्या कंपनीची उत्पादने सर्वात जास्त लोकं वापरतात. अशी कंपनी निवडल्यावर दर महिना किंवा दर तीन महिन्यांनी एका ठराविक तारखेला किमान एक तरी शेअर विकत घ्यावा. मात्र शेअर बाजार किंवा कमोडीटी बाजारात डे-ट्रेडिंग, फ्युचर्स/ऑप्शन्स या प्रकारापासून दूर रहानाण्याचा शकतो प्रयत्न करा. शेअरबाजारात आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी साधारण १५% रक्कम गुंतवावी.
- म्युचुअल फंड: म्युचुअल फंडात आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थान हे एक तज्ञ फंड व्यवस्थापक करत असतो ज्याला शेअरबाजाराचे चांगले ज्ञान ज्ञान असते तसेच सर्व साधनसामुग्रीही त्याचेजवळ उपलब्ध असते. म्हणून सर्वसामान्य माणसाने म्युचुअल फंडाच्या विविध योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. हि गुंतवणूक एसआयपी च्या माध्यमातून दीर्घकाळासाठी अगदी आपण निवृत्त होईपर्यंत करावी, मध्ये जर आवश्यकता भासली तर पैसे काढावेत. म्युचुअल फंडामध्ये विविध प्रकारच्या योजना असतात तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकीसाठी योग्य योजनेची निवड करावी. याचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या ५०% एवढे तरी असावे.
- रिअल इस्टेट: स्वत:ला राहण्यासाठी जर घर हवे असेल ते घेतलेच पाहिजे मात्र गुंतणूक म्हणून दुसरे घर घेणे किंवा कोठेतरी जागा घेऊन ठेवणे त्यासाठी बँकेचे कर्ज काढणे या गोष्टी टाळलेल्याच चांगल्या कारण एकतर स्थावर मालमत्ता विकत घेताना त्याला चांगला दर द्यावा लागतो पण विकताना तो मिळेलच याची खात्री नसते, या व्यवहारात पारदर्शकता कमी असते. अल्प काळात यातून कधीतरी जास्त परतावा मिळू शकतो मात्र दीर्घ काळात मिळणारा परतावा हा शेअरबाजारापेक्षा कितीतरी प्रमाणात कमी असतो. स्वत:साठी गृहकर्ज घेऊन घर घेत असाल तर जेव्हढा इएमआय असेल त्याच्या १०% रकमेएव्हढ्या रकमेची एसआयपी म्युचुअल फंडात अवश्य करावी जेव्हा तुमचे गृहकर्ज फेडून होईल तेव्ह्या तुम्ही बँकेत भरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळू शकेल. यामुळे स्थावर मालमत्तेत किती प्रमाणात गुंतवणूक करावी याचे प्रमाण देता येत नाही. इएमआय कधीही आपल्या मासिक उत्पनाच्या ३०% ते ४०% पेक्षा जास्त नसावा.
- बॉंड/पोस्ट/बँक ठेवी या प्रकारात १५% ते २०% रक्कम गुंतवावी जी केव्हाही उपयोगी येऊ शकेल.
- सोने: उर्वरित ५% रक्कम सोन्यात गुंतवावी. खरे पाहता सोन्यातील गुंतवणूक हि भावनिक असते मात्र यातून जास्त लाभ मिळत नसतो.
- जीवन विमा: मृत्यू कुणाला केव्हा येईल हे माहित नसते म्हणून प्रत्येकानेच आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रथम विमा घ्यावा. बाकी विम्याचे कोणतेही प्लान घेऊ नयते. २५/३० वर्षाचे व्यक्तीला वार्षिक रु.६ ते ७००० रुपयांच्या वार्षिक हप्त्यात सुमारे रु.१ कोटीची विमा कवच मिळू शकते.
- मेडिक्लेम: प्रत्येकाने आपल्या कुतुबातील सर्व व्यक्तींचा समावेश असणारी मेडिक्लेम पोलिसी अवश्य घ्यावी कारण आपल्या घरातील कोणालाही कधीही आजार येऊ शकतो हे लक्षात ठेवा त्याची तरतूद केली तर आर्थिक भर जाणवणार नाही.
याचप्रमाणे आपले सारे असेटस विमा कवच घेऊन सुरक्षित करणे शहाणपणाचे असते. तसेच आपल्या गुंतवणुकीला वारस हा नेमलाच पाहिजे ज्यामुळे भविष्यात काही अघटीत घडले तर वारसाला त्रास होत नाही. याचप्रमाणे एकदा का आपले असेटस निर्माण झाले कि प्रत्येकाने इच्छापत्र तयार करून ठेवावे.
जर पती-पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांचे दोघांचे उत्पन्नाचा ताळमेळ घालून दोघांचीही वेगवेगळी गुंतवणूक करावी.
- Published in Investment