पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, सार्वजनीक ट्रस्ट, सहकारी गृहनिर्माण संस्था अशा प्रकारचे संस्थाकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम असते. मात्र अशा संस्था या सर्वसाधारणपणे बँकेच्या ठेवींमध्ये अल्प वा दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असतात. या ठेवींवर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कधी कमी तर कधी जास्त व्याज मिळत असते. मात्र मिळणारे व्याज हे आयकराच्या स्लँब नुसार करपात्र असते. अशा संस्थाचे गुंतवणूकीचे सर्वात महत्वाचे उदिष्ट हे परताव्यापेक्षा सुरक्षीततेवर जास्त असते आणि अशा संस्थांकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे असतात जे सुरक्षीत ठेवणे हे ह्या संस्थाचे कर्तव्यच असते. यापैकी पतसंस्था हि सहकारी निबंधकाच्या नियंत्रणाखाली येत असल्यामुळे जर सहकारी निबंधकाची परवानगी असेल तरच अशा संस्था म्युच्यअल फंडाच्या समभाग आधारीत योजनेत गुंतवणूक करु शकतात. मात्र सध्या त्याना अशी परवानगी नाही मात्र या संस्था म्युच्यअल फंडाच्या कर्जरोखे आधारीत योजनेत गुंतवणूक करु शकतात मात्र अशी गुंतवणूक हि नॉन एसएलआर गुंतवणूकीतच धरली जाते. ट्रस्ट व सहकारी गृहनिर्माण संस्था मात्र त्यांची जोखीम स्विकारण्याची तयारी असल्यास म्युच्यअल फंडाच समभाग आधारीत तसेच अन्य कोणत्याही योजनेत गुंतवणूक करु शकतात.
म्युच्युअल फंडात गुंतवणूकीमध्ये बाजाराची जोखिम अंतर्भुत असल्यामुळे ट्रस्ट सारखे संस्थात्मक गुंतवणूकदार त्यापासून दुर रहाणेच पसंत करतात. परंतु वस्तूस्थिती हि आहे कि जर म्युच्युअल फंडाच्या सर्वच योजनेत शअर बाजाराची जोखीम नसते पैकी लिक्वीड स्किममध्ये केलेल्या गुंतवणूकीमध्ये अशा प्रकारची शेअर बाजाराची कोणतीही जोखीम तर नसतेच, परत कर्जरोखे आधारीत अन्य योजनेत किमान व्याज दराच्या बदलाची व क्रेडिट रेटिंगची जी जोखीम असते ती सुध्दा लिक्वीड फंडात नगण्य स्वरुपाचीच असते. कारण या योजनेत जमा होणारी रक्कम हि प्रामुख्याने मनीमार्केट मध्ये जास्तीत जास्त ९१ दिवसाच्या मुदतीच्या निश्र्चित उत्पन्न देणा-या उच्च पतदर्जा असणा-या सिक्युरिटीजमध्येच केली जाते, त्यामुळे अशा योजनेत जोखीम जवळपास शुन्य असते.
लिक्वीड फंडात अगदी अल्प काळासाठी म्हणजे २ ते ४ दिवस ते कितीही काळासाठी गुंतवणूक करता येते. अगदी दर शुक्रवारी पैसे गुंतवून, लगेचच पैसे काढण्याचीही सुचना देता येते, पैसे सोमवारी (कामकाजाच्या दुस-या दिवशी) दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या बँक खात्यात जमा होतात. मिळणारा परतावा हा मात्र ४ दिवसांचा मिळतो कारण अशा योजनेत हिस्टॉरीकल एनएव्ही मिळण्याची सुवीधा असल्यामुळे जरी शुक्रवारी (दुपारी २.३० पर्यंत) गुंतवणूक केली तरी एनएव्ही मात्र गुरुवारची मिळत असते व पैसे रविवारच्या एनएव्हीने परत केले जातात. इतिहासात आजपर्यंत तरी लिक्विड फंडाची एनएव्ही कमी झाल्याचे उदाहरण नाही. म्हणूनच जर का आपण ह्या सुवीधेचा वापर प्रत्येक आठवडा अखेर त्याचप्रमाणे वर्षातील सर्व बँक सुट्यांच्या दिवसांपुरती जरी वापरली तरी मिळणारे उत्पन्न हे जास्तीचेच असते.
तसेच ज्या संस्था वा व्यक्ती उच्च उत्पन्न गटात मोडतात व ज्याना एकूण ३२.४४५% आयकर भरावा लागतो अशानी जर या योजनेत गुंतवणूक डिव्हीडंड पेआऊट या पर्यायाखाली केली तर आयकरात ७.९५% बचत होते, कारण डिव्हीडंड डिस्ट्रीबुशन टँक्सची आकारणी करण्याची पध्दत वेगळी आहे.
लिक्वीड फंड योजनांची मागील कामगीरी जर का आपण पाहिली तर असे दिसून येते कि गेल्या एक वर्षात अशा योजनेतून ८% ते ९% एवढा वार्षीक परतावा मिळालेला आहे.
जर का आपण ३ वर्षे किंवा जास्तकाळ या योजनेत पैसे गुंतवून ठेवले तर इंडेक्सेशनचाही फायदा घेऊन होणा-या नफ्यावर फक्त १०% लॉंग टर्म भरावा लागतो इंडेक्सेशन हे महागीईशी निगडीत असल्यामुळे सध्याचा महागाईचा दर (जवळपास ६%) विचारात घेतल्यास जवळपास काहीच कर भरावा लागत नाही. म्हणूनच ज्याना एक वर्षाच्या मुदत ठेवीत पैसे ठेवावयाचे असतील त्यांच्यासाठी हि योजना अतीशय फायदेशीर तर होतेच वर गरज लागल्यास केव्हाही पैसे मिळू शकतात.
हि योजना चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था,संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती यांचेसाठी सर्वोत्तम अशी आहे.
मूळ गुंतवणूक लिक्विड योजनेत गुंतवून एकदाच कॅपिटल अॅप्रीशिएशन सिस्टीमॅटिक ट्रान्स्फर व्दारे मुदलात वाढणारी रक्कम मात्र नियमित दररोज, साप्ताहिक, मासिक अथवा त्रैमासिक तत्वावर एखाद्या इक्विटी किंवा बॅलन्सड योजनेत वर्ग करण्याची सूचना दिली तर जोखीम फक्त मिळणारे फायद्यापुरतीच मर्यादित राहील.
लिक्वीड फंडाव्यतरीक्त डेब्ट फंडाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत मात्र या योजनेत व्याजाचे दर बदलाची तसेच पतमापन दर्जाबदलाची जोखीम असते, ती लिक्वीड फंड योजनेत जवळपास शून्य असते.
या योजनेत गुंतवणूकीचे महत्वाचे फायदे:
१) चांगला परतावा.
२) एंट्री व एक्झीट लोड नाही.
३) कमी एक्सपेन्स रेशो.
४) मुदत नाही म्हणून पैसे केव्हाही काढता येतात.
५) बँक ठेवीत पैसे ठरावीक मुदतीसाठी अडकून पडतात तसे या योजनेत अडकून पडत नाहीत.
६) एकदा का खाते उघडले कि ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी पिन मिळते, तिचा वापर करुन हवे तेव्हा पैसे गुंतवता, काढता येतात.
७) पैसे काढण्याची सुचना दुपारी २.३० पुर्वी, कोणत्याही कामकाजाच्या दिवशी दिली असता, कामकाजाच्या दुस-या दिवशी आपल्या खात्यात पैसे जमा होतात.
८) असे खाते उघडण्यासाठी आम्ही मदत करतो.
एफएमपी (फिक्सड् मँच्युरिटी प्लान)
चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था, संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती ज्या एक ठरावीक काळासाठी गुंतवणूक करु इच्छीतात त्यांचेसाठी एफएमपी (फिक्सड् मँच्युरिटी प्लान) हा एक अतीशय फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या प्रकारच्या योजनेत ९१ दिवस ते ३ वर्षापर्यंत गुंतवणूक करण्याची सुवीधा असते.
या योजनेत गुंतवणूकीचे महत्वाचे फायदे:
१) लिक्वीड फंडाप्रमाणेच जवळपास शून्य जोखीम.
२) योजनेत जमा झालेले पैसे जेवढ्या काळाची एफएमपी असेल तेवढ्याच काळाच्या कमर्शीअल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझीटस्, कर्जरोखे अशा निश्र्चित उत्पन्न देणा-या पर्यायातच केली जाते, ज्यांचा व्याजाचा दर अगोदरच ठरलेला असतो.
३) अशा योजनेत एक वर्षापेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक केली तर लिक्वीड फंडाप्रमाणेच कर बचतीचा फायदा होतो.
४) मात्र जर गुंतवणूकीचा कालावधी ३ वर्षा पेक्षा जास्त असेल तर इंडेक्सेशनचाही फायदा घेऊन फक्त १०.१% लॉंगटर्म कँपिटल गेन टँक्स भरावा लागेल, म्हणजेच सुमारे २२.२% पर्यंत करबचत होते.
५) अशा योजना शेअर बाजारात नोंदवल्या जातात, त्यामुळे आवश्यक तर पैसे केव्हाही काढता येतात.
६) अशा योजनेत केलेल्या गुंतवणूक तारण ठेऊन काही बँका कर्जही देतात.
७) अशा योजना अगदी थोड्या काळासाठीच गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात.