कर्जरोखे आधारित

Home » कर्जरोखे आधारित

Debt Funds – कर्ज रोखे आधारित योजना

Debt Funds – कर्ज रोखे आधारित योजना

ज्या व्यक्तींना शेअर बाजाराबद्दल साशंकता असते मात्र जे बँक ठेवींना पर्यायी गुंतवणुकीची इच्छा असते त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडातील कर्ज रोखे आधारित योजना या उत्तम पर्याय आहे. या योजनेतील पैसे हे योजनेच्या उद्दिष्टांनुसार निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवले जातात. यामध्ये शेअर बाजाराची जोखीम असत नाही त्यामुळे या प्रकारच्या योजनेत तुलनेने कमी जोखीम असते. या प्रकारच्या योजनेच्या Fact Sheet मध्ये YTM (Yield to Maturity) म्हणजेच मुदत पुर्तीला मिळू शकणारे व्याजाचे उत्पन्न दर्शवलेले असते. तसेच सोबत (Average Maturity) कर्ज रोख्यांचा सरासरी मुदत संपण्याचा कालावधी दिलेला असतो. त्याचप्रमाणे योजनेचा (Total Expense Ratio) एकूण खर्चाचे प्रमाण यांचा उल्लेख केलेला असतो. याचा वापर करून आपल्याला या योजनेतून किती परतावा मिळू शकेल हे समजू शकते. जर का गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने Average Maturity इतक्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर त्या व्यक्तीला YTM - Total Expense Ratio = मुदती नंतर मिळणारा परतावा योजनेतून मिळू शकतो समजू शकते.

उदा. अबक हि योजना आहे, Fact Sheet मध्ये खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे.

Average Maturity – 2.50 Years

Modified Duration – 1.75 Years

Yield to Maturity – 11.50%

Total Expense Ratio – 1.85%

समजा तुम्हाला रु.५ लाख गुंतवावयाचे आहेत, आता वरील योजनेतून आपल्याला किती कालावधीत किती परतावा मिळू शकेल हे खालीलप्रमाणे समजू शकेल.

Average Maturity – 2.50 Years म्हणजे योजनेतील कर्ज रोख्यांची सरासरी मुदत पूर्ति २.५ (अडीच) वर्षे आहे, म्हणून जर का तुम्ही रु.५ लाखांची गुंतवणूक या योजनेत २.५ वर्षांसाठी केली तर तुम्हाला २.५ वर्षानंतर खालीलप्रमाणे रक्कम मिळू शकेल.

निव्वळ परताव्याचा दर Yield to Maturity – 11.50% - Total Expense Ratio – 1.85% = ९.६५% वार्षिक चक्रवाढ दराने परतावा मिळू शकेल.

५,००,०००/- X ९.६५% = ४८,२५०/- (पहिल्या वर्षाचे व्याज) = ५,४८,२५०/-

एक वर्षानंतर ५,४८,२५०/- X ९.६५% = ५२,९०६/- (दुसऱ्या वर्षाचे व्याज) = ६,०१,१५६/-

दोन वर्षानंतर ६,०१,१५६/- x ९.६५% / १२ x ६ = २९,००५/- (६ महिन्यांचे व्याज) = ६,३०,१६१/- २.५ वर्षांच्या अखेर मिळणारी एकूण रक्कम.

मात्र मधल्या २.५ वर्षांच्या कालावधीत जर का व्याज दारात RBI ने बदल केला तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य त्या दरम्याने बदलत राहील. मात्र जर तुम्ही २.५ वर्षे थांबलात तर तुम्हाला वर दाखवल्याप्रमाणे परतावा मिळू शकतो.

कर्ज रोखे आधारित योजनेतील जोखीम:

१) व्याज दरातील बदल: RBI देशातील आर्थिक परिस्थिती प्रमाणे व्याज दारात नियमितपणे बदल करत असते. याचा परिणाम कर्जरोखे आधारित योजनेवर पडत असतो. जर व्याज दर वाढले तर मिळणारा परतावा कमी होतो व जर व्याज दर कमी झाले तर मिळणारा परतावा वाढतो. हा बदल Modified Duration शी निगडीत असतो.

२) Credit Risk – पत जोखीम: जर योजनेने गुंतवणूक केलेल्या कर्ज रोख्याचे पत मापन घसरले/वाढले तर त्यानुसार मिळणाऱ्या परताव्यात बदल होऊ शकतो. त्याच प्रमाणे एखाद्या वेळी जर कर्ज रोखे जारी करणारी संस्था मुदत पुर्तीला पैसे परत करू शकली नाही (Default) झाली तर मिळणारा परतावा कमी होऊ शकतो/नुकसान होऊ शकते. जर जर कर्ज रोखे जारी करणारी संस्था अवसानीत गेली तर नुकसान होऊ शकते.

३) याव्यतिरिक्त अन्य जोखीम: महागाई दरातील बदल, जर महागाई वाढली तर व्याज दर वाढतात आणि दुसरे म्हणजे महागाई तुम्हाला मिळणाऱ्या पैशांची किंमत कमी होते. तरलता, पैसे वेळेवर न मिळणे. क्लोज एन्डेड योजनेत तरलतेचा अभाव असतो कारण या योजनेतील पैसे मुदत संपल्यानंतरच काढता येतात. जरी ती योजना शेअर बाजारात नोंदलेली असली तरी तिच्यात सहसा व्यवहार होत नसतात किंवा अगदी कमी होतात.

कर्ज रोखे योजनेत गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?

• संबधित योजनेची मागील कामगिरी तपासा.

• संबधित म्युच्युअल फंड घराण्याची कर्ज रोखे आधारित योजनेतील मागील कामगिरी तपासा.

• योजनेच्या निधी व्यवस्थापकाने व्यवस्थापन केलेल्या अन्य योजनाची मागील कामगिरी तपासा.

• पोर्टफोलिओ मध्ये असणाऱ्या पेपर्स (कर्ज रोखे) कोणी जारी केले आहेत ते तपासा.

• कर रोख्यांचे रेटिंग तपासा.

• जेवढे रेटिंग वरचे (चांगले) तेवढी जोखीम कमी, याच बरोबर परतावा सुद्धा कमी मिळणार. कारण कर्ज रोख्याचे व्याज कमी असते. जेवढे रेटिंग कमी तेवढी जोखीम जास्त, याच बरोबर परतावा पण जास्त मिळू शकतो. कारण संबधित कर्ज रोख्याचे व्याज जास्त असते.

• याव्यतिरिक्त अन्य गोष्टी सुद्धा तपासाव्या लागतात, यासाठी आम्ही मदत करतो.

कर्ज रोखे आधारित अनेक योजना उदा. लिक्विड, शॉर्ट टर्म स्कीम्स, लो ड्युरेशन, क्रेडिट रिस्क, गिल्ट, एमआयपी, इन्कम इ. अनेक योजना म्युच्युअल फंडामध्ये उपलब्ध असतात व प्रत्येक योजनेशी निगडीत जोखीम वेगवेगळी असते. यासाठी तुम्ही किती काळासाठी गुंतवणूक करू इच्छिता हे महत्वाचे असते. योजना निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

कर्ज रोखे आधारित योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे:

१) बंकेपेक्षा जास्त परतावा (व्याज) मिळू शकते.

२) तरलता: पैसे कधीही काढण्याची सुविधा असते.

३) शेअर बाजारातील चढ उतारांचा परिणाम होत नाही.

४) तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर लॉंग टर्म कॅपिटल गेन चा फायदा मिळतो, यामुळे मोठ्या प्रमाणात कर बचत होते.

५) तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढल्यास बँकेतील मिळणाऱ्या व्याजावर जशी कर आकारणी होती तशीच कर्ज रोखे आधारित योजनेतून मिळणाऱ्या पर्ताव्यावर केली जाते.

६) टीडीएस कापला जात नाही.

अन्य काही लेख - कर्ज रोखे आधारित अन्य योजनाची माहिती पाहण्यासाठी

 • in Debt Funds

  डेब्ट फंडाचे प्रकार

  डेट फंड योजनांचे प्रकार: ओपन एंडेड योजना या प्रकारचे योजनेत बँकेचे बचत खात्याप्रमाणे केव्हाही पैसे भरता येतात अथवा काढता येतात म्हणजेच थोडक्यात कमी अथवा जास्त मुदतीसाठी गुंतवणूक करता येते.  लिक्वीड स्किम्स् या योजना या ज्याना कमी कालावधी म्हणजे  अगदि 2 ते 30 दिवस अथवा 1 ते 3 महिन्यांसाठीच पैसे गुंतवावयाचे असतात त्यांचेसाठी अतीशय चांगल्या ...
 • in Debt Funds

  बॅंक एफङी व ङेट फंङ तुलना

  बँक एफ.डी. व डेब्ट फंड योजना एक तुलना  बँक एफ.डी. डेब्ट फंड योजना सध्या एक वर्षाचे एफ.डी. साठी ७.५% व्याजदर आहे. डेब्ट फंडाचे योजनेत सध्या सरासरी ८.८६% एवढा परतावा मिळत आहे, जर रेपो रेट अजून कमी झाला तर मिळणार हाच परतावा शॉर्ट टर्म डेट फंड योजनेत ९.५% पर्यंत जाऊ शकेल.  १०% दराने टी.डी.एस. ची कपात...
 • in Debt Funds

  लिक्वीड फंड

  अल्प व मध्यम मुदतीसाठी Liquid Fund योजना: अशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिवस ते ६ महिने एवढ...
 • in Debt Funds

  अल्प मुदतीसाठी

  अल्प व मध्यम मुदतीसाठी कर्जरोखे आधारीत (Debt Fund) योजना: अशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिव...
 • in Debt Funds

  मध्यम मुदतीसाठी

  ध्यम ते दिर्घ मुदतीसाठी कर्जरोखे आधारीत (Bond Fund) योजना: या प्रकारच्या योजनेतील संपुर्ण रक्कम हि दिर्घ मुदतीच्या सरकारी व खाजगी कंपन्यांच्या कर्जरोख्यात व मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते, ज्यावर ठरावीक दराने व्याजाचे उत्पन्न मिळते. अशा योजनेत व्याजाच्या चढ उताराची व पतदर्जाच्या बदलाची जोखीम असते. व्याजाचे दर कमी झाले कि दिर्घ मुदतीच्या कर...
 • in Debt Funds

  मासीक उत्पन्न योजना

  मासिक उत्पन्न योजना (MIP Schemes) या प्रकारच्या योजनेचे उदिष्ठ  प्रामुख्याने नियमीत दरमहा लाभांश देण्याचे असते. या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक ७५% ते ९०% सरकारी व खाजगी कंपन्याच्या कर्जरोख्यात व दिर्घ, अल्प मुदतीच्या बँक ठेवी, व्यापारी पेपर आदी नियमीत ठरावीक दराने उत्पन्न देणा-या साधनात केली जाते व शेअर बाजाराचाही फायदा मिळून भांडवली मुल्यवृध...
 • in Debt Funds

  एफएमपी

  फिक्सड् मँच्युरिटी प्लान – एफएमपी फिक्सड् मँच्युरिटी प्लान्स हे निश्र्चित कालावधी योजना (Close Ended Income Schemes) या प्रकारच्या योजनेत गणल्या जातात यांच्या मुदतपुर्तीचा कालावधी अगोदरच जाहिर केला जातो. या योजनेत योजना जाहिर केलेल्या कालावधीतच (New Fund Offer period – NFO) गुंतवणूक करता येते. चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था, संस्थात्मक गुंतव...
 • in Debt Funds

  एटिएम

  सेव्हिंग बँक खाते व चालु खाते (Savings Bank & Current A/c) यांच्यासाठी उत्तम पर्याय – पैसे केव्हाही काढण्याची सुविधा तुमच्या बँक खात्याप्रामाणेच उपलब्ध आहे सध्या तुम्हाला मिळतात सेव्हिंग बँक खात्यावर ४% द.सा.द.शे. करंट अकाउंटवर 0% द.सा.द.शे. रिलायन्स म्युच्युअल फंड हाऊस तुमच्यासाठी घेऊन आली  आहे एक योजना जी आहे तुमच्या बचत/चालू खात्य...
 • in Debt Funds

  बचत खाते

  बँकेच्या बचत व चालू खात्याचा वापर करुन अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी. प्र. १: माझ्या सेव्हिंग बँक खात्यात काही रक्कम जमा आहे, ते पैसे मला केव्हाही काढता येतात मात्र त्यावर मला फक्त ४% दराने व्याज मिळते, मला या पेक्षा जास्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा आहे तर मी काय करावे? उत्तर: तुमच्या समोर दोन पर्याय आहेत: १)      जर...
TOP