वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी म्युच्युअल फंडामधे कशी गुंतवणूक करू?
प्रथमतः आमचेशी मोबाईल ९४२२४३०३०२ वर किंवा इमेल sadanand.thakur@gmail.com द्वारे संपर्क साधून चर्चा करुन गुंतवणूकीची योजना सुनिश्चित करा. मग एकतर याच संकेतस्थळावरुन फॉर्म डाउनलोड करा व पूर्ण भरुन सही / सह्या करुन सोबत चेक किंवा डीडी व आवश्यक ती कागदपत्रे जोडून आमचेकडे कुरिअर किंवा पोष्टाने पाठवा पुढले सारे आम्ही करु. अथवा आमचेकडे मागणी करा आम्ही तुमची विचारलेली माहिती कळवा आम्ही तो तुमचा फॉर्म तुम्हाला पूर्ण भरुन पाठवू सोबत कागद पत्रांची यादि कळवू आता तुम्ही फक्त फॉर्म सही / सह्या करुन सोबत चेक किंवा डीडी व आवश्यक ती कागदपत्रे जोडून आमचेकडे कुरिअर किंवा पोष्टाने पाठवा पुढले सारे आम्ही करु.
म्युचल फंडामधिल गुंतवणूक पारदर्शक असते का?
होय. रोजच्या रोज NAV म्हणजे एका युनिटची किंमत रात्री ८ वाजता https://www.amfiindia.com या संकेतस्थळावर जाहिर केली जाते.
माझ्या गुंतवणूकीवर कसे परतावे मिळतात?
तुमचे पैसे तुमच्या योजनेच्या उदिष्टांनुसार गुंतवले जातात. तुम्ही जर इक्वीटी स्किम निवडली असेल तर पैसे शेअर बाजारात गुंतवले जातात व तज्ञ फंड मॅनेजर त्याचे रिसर्च टिमच्या सहित त्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करतो. त्या व्यवहारातून होणारा नफा अथवा तोटा सर्व गुंतव़णूकदारांमध्ये त्यांचे गुतवणूकीचे प्रमाणात वाटला जातो. प्रथमतः तुमच्या मुळ अथवा नियमित गुंतवणूकीपोटी तुम्हाला त्या त्या वेळच्या बाजार भावानुसार युनिट अदा केली जातात व तुम्हाला त्याचे स्टेटमेंट प्रत्येकवेळी पाठविले जाते त्या युनिटची किंमत रोजचेरोज जाहिर केली जाते – किंमतीत वाढ तुमचा फायदा – किंमतित घट तुमचा तोटा. रिलायन्स ग्रोथ फंड – ग्रोथ ची NAV डिसे १९९५ मधे रु १० होती ती जाने २००८ मधे रु ४८० झाली होती व ३० जाने २०१५ रोजी रु ८१५ एवढी झाली आहे, म्हणजेच २० वर्षात गुंतवणूक ८१.५ पट झाली.
माझा पैसा कोठे गुंतवला जातो?
दर सहा महिन्यानी गुंतवणूकीचा तपशिल जाहिर करणे बंधनकारक असते व तो तसा प्रमुख वॄत्त पत्रात जाहिर केला जातो. आघाडीचे फंड दर महा फॅक्टशीट द्वारे जाहिर करतात तो https://www.amfiindia.com यासंकेतस्थळावर उपलब्ध असतो.
मी छोट्या शहरात अथवा गावात अथवा अगदि परदेशात रहातो मी गुंतवणूक कशी करु?
तुम्ही जगात कोठेहि रहात असा तुम्ही सहजपणे गुंतवणूक करु शकता. आमचे मार्फत करणेसाठी प्रथमतः आमचेशी मोबाईल ९४२२४३०३०२ वर किंवा इमेल sadanand.thakur@gmail.com द्वारे संपर्क साधून चर्चा करुन गुंतवणूकीची योजना सुनिश्चित करा. मग एकतर याच संकेतस्थळावरुन फॉर्म डाउन करा व पूर्ण भरुन सही / सह्या करुन सोबत चेक किंवा डीडी व आवश्यक ती कागदपत्रे जोडून आमचेकडे कुरिअर किंवा पोष्टाने पाठवा पुढले सारे आम्ही करु. अथवा आमचेकडे मागणी करा आम्ही तुमची विचारलेली माहिती कळवा आम्ही तो तुमचा फॉर्म तुम्हाला पूर्ण भरुन पाठवू सोबत कागद पत्रांची यादि कळवू आता तुम्ही फक्त फॉर्म सही / सह्या करुन सोबत चेक किंवा डीडी व आवश्यक ती कागदपत्रे जोडून आमचेकडे कुरिअर किंवा पोष्टाने पाठवा पुढले सारे आम्ही करु.
मला काही वाइट अनुभव आला व मला म्युच्युअल फंडाबाबत, तुमचे बद्दल अथवा दुसरे म्युच्युअल फंड वितरकाबद्दल तक्रार करावाची असेल तर ती कोठे करावी?
म्युच्युअल फंड कंपनी बद्दल प्रथम कंपनीला कळवा आफर डॉक्युमेंट मधे कोणाकडे तक्रार करावी याचा तपशिल दिलेला असतो. तेथे तक्रार निवारण न झाल्यास AMFI India कडे अथवा SEBI कडे तक्रार करावी. आमचेबाबत काही तक्रार असेल तर प्रथम आम्हाला कळवा आम्ही लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करु किंवा योग्या मार्गदर्शन करु आणि जर यात आम्ही कमी पडलो तर आमची तक्रार AMFI India कडे अथवा SEBI कडे तक्रार करावी. तसेच दुस-या म्युचल फंड वितरकाबद्दल करावे.