फिक्सड् मँच्युरिटी प्लान – एफएमपी
फिक्सड् मँच्युरिटी प्लान्स हे निश्र्चित कालावधी योजना (Close Ended Income Schemes) या प्रकारच्या योजनेत गणल्या जातात यांच्या मुदतपुर्तीचा कालावधी अगोदरच जाहिर केला जातो. या योजनेत योजना जाहिर केलेल्या कालावधीतच (New Fund Offer period – NFO) गुंतवणूक करता येते. चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था, संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदार जे एक ठरावीक काळासाठी गुंतवणूक करु इच्छीतात त्यांचेसाठी एफएमपी हा एक अतीशय फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या प्रकारच्या योजनेत ९१ दिवस त ३ वर्षापर्यंत गुंतवणूक करण्याची सुवीधा असते. योजनेत जमा झालेले पैसे जेवढ्या काळाची एफएमपी असेल तेवढ्याच काळाच्या कमर्शीअल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझीटस्, कर्जरोखे अशा निश्र्चित उत्पन्न देणा-या पर्यायातच केली जाते, ज्यांचा व्याजाचा दर अगोदरच ठरलेला असतो, त्यामुळे जोखीम जवळपास शून्य असते. जर गुंतवणूकीचा कालावधी ३६६ दिवसांपेक्षा जास्त असेल तर (नवीन येणा-या डायरेक्ट टँक्स कोड नुसार) फक्त १०% लॉंगटर्म कँपिटल गेन टँक्स भरावा लागेल, म्हणजेच सुमारे २२% करबचत होते. अशा योजना अगदी थोड्या काळासाठीच गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात, म्हणून आम्हाला संपर्क करा.
बँक एफडी ला हा सर्वोत्तम पर्याय आहे. किमान गुंतवणूक रु. १०००० जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवता येते.