म्युच्युअल फंडाचे भविष्य उज्ज्वल आहेः
म्युच्युअल फंड गुंतवणूकीद्वारा दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण होवू शकेल याची कारणेः
- भारतीय अर्थव्यवस्था हि जगात अत्यंत वेगाने पुढे जात आहे हे सर्वमान्य सत्य आहे.
- परकीय गुंतवणूकदार नियमितपणे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करितं आहेत.
- अनेक सेझ मंजूर झाले आहेत व भविष्यात ते कार्यरत होतील.
- येत्या ५ ते ७ वर्षात पायाभूत सुविधा विभागात जसे की पॉवर, रस्ते, धरणे, पाणी योजना, टेलिकम्युनिकेशन इ अनेक उद्योग धंद्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्याचे सरकारी व योजना आयोगाचे निर्णय झाले आहेत.
- सर्वच विभागात उद्योग धंद्यांना पोषक वातावरण आहे.
- जीडिपी स्थिर आहे व पुढे वाढ अपेक्षीत आहे.
- काम करणा-या भारतीयाचे सरासरी वय फक्त ३५ आहे.
- सद्या देशातील एकूण गुंतवणुकीपैकी नगण्य म्हणजे ३ टक्के पेक्षा कमी गुंतवणूक म्युचल फंडात आहे.
- उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
- शेती व शेतीला पूरक उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
- अनेक परदेशी कंपन्यांचे काम भारतीय कंपन्या करत आहेत.
- भारतीय शेअर बाजार अद्यावत आहे व त्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
- भारतीय अर्थसंस्था व उद्योगधंद्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
- गुजराथी समाजाने शेअर बाजार व म्युच्युअल फंडाचे माध्यमातून भरपूर संपत्ती निर्माण केली आहे आपण मराठी माणसानेच का मागे राहावे.