तुमच्या दुचाकी, चारचाकी गाडीचा विमा घेऊन तुम्ही दुर्दैवाने तुमच्या वाहनाचा जर अपघात झाला तर त्यापासूनचे संरक्षण तुम्हाला प्राप्त होते. यामध्ये अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती इ. मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळते.
आपल्या भारत देशात दार महिन्याला सरासरी ४ लाख अपघात होत असतात. मोटार कार अपघातात दरवर्षी सरासरी ४% दराने वाढ होत असते. प्रतिदिन वाढणारी गाड्यांची संख्या आणि राज्यातील खराब दर्जाचे रस्ते यामुळेही अपघातात नेहमीच वाढ होत असते, यासाठी मोटार इन्शुरन्स हा अत्यंत गरजेचा आहे. याशिवाय कायद्याप्रमाणेसुद्धा वाहनाचा विमा उतरवणे बंधनकारक आहे. मोटार इन्शुरन्सचा लाभ फक्त तुम्हालाच मिळत नाही तर त्याचा लाभ तुमच्या बरोबर प्रवास करणाऱ्यांनाही मिळतो. तसेच यात नैर्सर्गिक आपत्तीचासुद्धा, ज्यात भूकंप, पूर, आग, इ. बाबींचा समावेश असतो.
कायद्यानुसार हा बंधनकारक आहे. अपघातात जर कोणत्या अन्य व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा शारीरिक इजा झाली किंवा कोणत्या अन्य मालमत्तेचे नुकसान झाले तर विमा कंपनीकडून त्याची नुकसान भरपाई मिळते. थर्ड पार्टी म्हणजे अपघातात सापडलेल्या अन्य व्यक्ती. मात्र यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या बरोबर प्रवास करणाऱ्या सोबतच्या व्यक्ती किंवा तुमच्या गाडीला अपघाताने काही नुकसान झाले किंवा मृत्यू आला तर कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही.
या प्रकारात वरील थर्ड पार्टी इन्शुरन्स मधील मिळणाऱ्या लाभांव्यतिरिक्त तुम्ही स्वतः, तुमची गाडी आणि तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे अपघातामुळे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई सर्व समावेशक (Comprehensive) इन्शुरन्स घेतल्यामुळे मिळते. यासाठीच विमा घेताना हा पर्याय, जरी बंधनकारक नसला तरीसुद्धा, घेणे हे तुमच्या हिताचेच असते.
प्रत्येक व्यक्ती अथवा संस्था जिच्या मालकीचे कोणतेही वाहन असेल त्या वाहनाचा मोटार इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे. मग ते वाहन व्यक्तिगत वापरासाठी असो किंवा व्यावसायिक वापराचे असो त्याचा विमा घेणेआवश्यक आहे.
वैयक्तिक मालकीचे असो किंवा संस्थेच्या मालकीचे असो, व्यक्तिगत वापरासाठी असो किंवा व्यावसायिक वापरासाठी असो, प्रत्येक वाहनासाठी मोटार इन्शुरन्स घेणे हे मोटार वाहन कायदा १९८८ नुसार, बंधनकारक आहे. जेव्हा एखादे वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वीच त्या वाहनाचा विमा इन फोर्स असलाच पाहिजे. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी आणि व्यावसायिक अशा प्रकारातील प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र प्रकारचे विम्याचे प्रकार असतात.
हे एक प्रकारचे आर्थिक सुरक्षा कवच असून त्यापासून मिळणारी नुकसान भरपाई खालील प्रमाणे असते:
विमा कवच घेणारी व्यक्ती, ज्याचा विमा घेतलेला आहे असे वाहन, ज्यांना अपघातामुळे नुकसान होते अशा थर्ड पार्टीज (अन्य व्यक्ती आणि वाहन) याचा समावेश मोटार इन्शुरन्समध्ये होतो. विम्याचा हप्ता हा व्यक्तिसापेक्ष बदलत असतो अधिक माहिती तुमचा सल्लागार किंवा आम्ही देऊ शकतो.
नियमित वापरामुळे झालेले गाडीचे नुकसान, नियमितपणे करावी लागणारी गाडीची दुरुस्ती, दारू पिऊन गाडी चालवत असताना अपघात झाल्यास आणि युद्धजन्य परिस्थितीत अपघात झाल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. मिळणारी नुकसानभरपाई हि शोरूम किंमत किंवा घसारा वजा केल्यानंतर गाडीच्या होणाऱ्या किंमतीनुसार दिली जाते.
IDV = Insured declared value म्हणजे गाडीच्या विमा कवचाची रक्कम हि गाडीच्या घसारा वजा जात उडणाऱ्या किमतीएवढी किंवा शोरूम प्राईज यानुसार विमा कम्पनीच्या नियमानुसार ठरवली जाते.
प्रत्येक विमा कंपनी त्यांच्या अनुभवानुसार किंवा सांख्यिकी शास्त्राचा आधार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने विमा हप्त्याची गणना करत असतात. काही विमा कंपन्या एखाद्या क्षेत्रात तज्ञ असतात म्हणून त्या काही बाबतीत हप्त्यांमध्ये सवलत देतात. या व्यतिरिक्त प्रत्येक कंपनीचे नफा मिळवण्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते.
ज्याच्या नावाने विमा घेतलेला आहे अशी व्यक्ती सोडून अपघातामुळे बाधित होणाऱ्या अन्य व्यक्ती ज्यामध्ये वाहनातून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, रस्त्याने चालणाऱ्या व्यक्ती किंवा अन्य अशा व्यक्ती ज्या अपघातात सापडतात.
सर्व समावेशक (Comprehensive) इन्शुरन्स पोलिसी घेणे हे सर्वात चांगले असते ज्यामुळे तुम्हाला स्वतःला, तुमच्या सोबत सणाऱ्या सर्व व्यक्तींना विम्याचे कवच प्राप्त होते त्याच प्रमाणे थर्ड पार्टी इन्सुरन्सचे फायदे यात सामाविस्ट होतात. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे जर गाडीचे काही नुकसान झाले किंवा चोरी वगैरे झाली तर नुकसान भरपाई मिळते.
याबाबतची सारी माहिती हि पोलिसी पेपर्समध्ये दिलेली असंगत. काही वेळा क्लेमच्या १०% रक्कम तुम्हाला भरावी लागेल असे लिहिलेले असते अशा वेळी जर तुम्ही रु.५०००० चा क्लेम दाखल केला तर तुम्हाला र.५००० भरावे लागतील. म्हणून पॉलिसी घेताना अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व नियमांची माहिती करूनच घ्यावी, म्हणजे नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही.
होय. जसे कि नो क्लेम डिस्काउंट मिळतो. हा डिस्काउंट पॉलिसीचे नूतनीकरण करताना तुम्हाला वजावट करून मिळतो. काही कंपन्या मोफत मेंटेनन्स चा फायदा देतात.
मोटार इन्शुरन्स देणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत तेव्हा त्यातून एकाची निवड करताना काळजी घ्या. अन्य कंपन्यांच्या पॉलिसीबरोबर तुलना करा. खालील बाबी विचारात घ्या:
आपल्याला बरेच वेळा प्रवास हा करावाच लागतो अशा वेळी त्या प्रवासात अपघाताची किती शक्यता आहे, अपघात झाल्यास विमा संरक्षण आहे कि नाही असल्यास किती रकमेचे आहे इ. गोष्टी तपासून सार्वजनिक वाहनाने प्रवास करताना जसे कि ट्रेन किंवा विमानाने प्रवास करण्यापूर्वीच योग्य ती माहिती घेऊन विमा संरक्षण घ्यावे.
प्रवासी विमा घेतल्यामुळे तुम्हाला प्रवासाच्या दरम्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळते. अनेक विमा कंपन्या याला वेगवेगळ्या नावाने संबोधित असतात. प्रवासी विमा घेण्यापूर्वी तुम्हाला देशाबाहेर कि देशांन्तर्गत प्रवासासाठी कि दोन्ही प्रकारच्या प्रवासादरम्यान विमा संरक्षण मिळते हे तपासा. प्रवासी विमा घेतल्याने प्रवासा दरमयान कोणताही अपघात झाला, अनपेक्षितपणे जर औषोधोपचाराचा खर्च करावा लागला किंवा तुमची बॅग/सामान हरवले किंवा पासपोर्ट हरवला, विमानाला उशीर झाला किंवा तुमचे बॅगेज मिळण्यास विलंब झाला तर तुम्ही प्रवासी विम्याचा क्लेम करू शकता. मात्र यासाठी पॉलिसी घेताना सर्व काळजी घ्या.
अनेक विमा कंपन्या बाजारात आहेत. त्यांच्या पॉलिसी बेनेफिट तपासा. त्यांची एकमेकांशी तुलना करा. सर्वसाधारणपणे खालील प्रकारचे सुरक्षा कवच प्रवासी विम्यामध्ये समाविष्ट असते ते सर्व वाचून व समजून घेऊन मगच तुम्हाला योग्य वाटणारा प्रवासी विमा खरेदी करा:
प्रवासी विम्या अंतर्गत दिली जाणारी प्रवासी विम्याचे कवच तसेच त्यासाठीचा प्रीमियम, तुम्ही कोणत्या देशाचा प्रवास करणार आहात, तुमचे वय, प्रवासाचा कालावधी यावर अवलंबून वेगवेगळा असू शकतो.
प्रवासी विमा घेताना कोणकोणत्या गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत याची पूर्ण माहिती करून घ्या. सामान्यपणे खालील बाबींसाठी विमा मिळत नाही
जर का तुम्ही परदेशात असताना क्लेम करण्याची वेळ आली तर काय करावयाचे याची माहिती अगोदरच घ्या. सर्वसामान्यपणे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमा देणाऱ्या कंपन्या त्यांचा हॉट लाईन फोन क्रमांक यासाठी देत असतात तेथे प्रथम तुम्हाला कळवावे लागेल. याच प्रमाणे कोणताही वाईट प्रसंग आला तर तुम्ही तेथील स्थानिक पोलीस स्टेशन, आपल्या देशाचा परदेशी दूतावास, प्रवासी कंपनी इ. याना प्रथम कळवले पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्या विमा कंपनीलासुद्धा कळवले पाहिजे. अशा प्रकारचा विमा देणाऱ्या कंपन्या पॉलिसींमध्येच क्लेम फॉर्म देत असतात ज्यामुळे क्लेम करणे सुलभ होऊ शकते.
टर्म इन्शुरन्स अर्थात मुदतीचा विमा हा जीवनावरील विम्याचा उत्तम पर्याय आहे, यामध्ये एक ठराविक मुदतीसाठी (वर्षांसाठी) विमा दिला जातो या दरम्याने जर विम्याचे सर्व हप्ते भरलेले असतील व जर दुर्दैवाने विमा धारकाच्या त्या मुदतीच्या दरम्याने मृत्यू झाला तर जेव्हढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतलेले असेल तेव्हढी रक्कम वारसाला दिली जाते. जर मुदत संपल्यावर विमाधारक हयात असेल तर कोणतीही रक्कम दिली जात नाही. याच कारणासाठी याला शुद्ध विमा कवच असेही म्हटले जाते.
खरे पाहता विमा घेण्याचा उद्देश हा विमा धारकाला विमा संरक्षण आणि त्याचे काही बरे वाईट झाले तर त्याच्या वारसाला आर्थिक सुरक्षा देणे हाच असतो.
१) टर्म इन्शुरन्स - शुद्ध विमा - हा विमा प्रकार सर्वात चांगला व स्वस्त असतो. कमीत कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण याच प्रकारच्या विमा पॉलिसीमधून मिळत असते. २५ ते ३० वर्षांच्या व्यक्तीला वार्षिक सुमारे ६ ते ८ हजार रुपये वार्षिक हप्ता भरून सुमारे एक कोटींचे विमा संरक्षण मिळत असते.
२) जीवन विमा + मुदतीअंती विम्याची ठराविक रक्कम मिळणे - यालाच एंडॉनमेंट पॉलिसी असेही म्हणतात. या प्रकारच्या पॉलिसीची मुदत तुलनेने कमी असते व जर तुम्हाला एक कोटी रुपयांचे संरक्षण घ्यावयाचे असेल तर बराच मोठा वार्षिक प्रीमियम भरावा लागू शकतो, जे व्यवहार्य नसते.
टर्म इन्शुरन्स + गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योजना असे संयोजन केल्यास ते अत्यंत फायदेशीर असते कारण विमा हा दीर्घ मुदतीचा असतो त्याला जर दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक साधनांची जोड दिली तर तुमचा निश्चितच फायदा होतो. कारण दीर्घ मुदतीत शेअर बाजारातून किंवा म्युच्युअल फंडातून उत्तम परतावा मिळतो हा इतिहास आहे.
टर्म इन्शुरन्स हा सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. या प्रकारात कमीतकमी वार्षिक प्रीमियम भरून जास्त मुदतीसाठी जास्त विमा संरक्षण मिळते. कारण यात बचतीचा कोणताही उद्देश नसतो तर फक्त आपल्याला जर मुदतीदरम्याने काही कारणाने मृत्यू आला तर आपल्या वारसाला पुरेशी रक्कम मिळावी हा असतो.
टर्म इन्शुरन्सचा हप्ता हा अत्यंत कमी असल्यामुळे वार्षिक कमी प्रीमियम भरूनही जास्त रकमेचा विमा घेता येतो. जेवढ्या काळासाठी हि विमा पॉलिसी असेल त्या संपूर्ण काळासाठी तेव्हढाच हप्ता राहतो. जर का २५ वर्ष्यांच्या व्यक्तीने ५० वर्षे मुदतीचा रु. एक कोटींचा विमा विकत घेतला तर त्याला वार्षिक फक्त ५००० रुपये प्रीमियम भरावा लागेल (म्हणजेच दिवसाला १५ रुपयांपेक्षाही कमी रक्कम) व या ४० वर्षात जर का कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला रुपये एक कोटी मिळतील.
कोणतीही व्यक्ती टर्म इन्शुरन्स घेतानाच काही अधिकची राईडर्स घेऊन पॉलिसीची उपयुक्तता जास्त वाढवू शकतो.
थोडक्यात जर का एखाद्या २५ ते ३५ वर्षे दरम्यानच्या वयाच्या व्यक्तीने टर्म इन्शुरन्स माध्यमातून रु. १ कोटींचा विमा + रु. १० लाखांचे गंभीर आजारपणाचे राइडर + रु. एक कोटींचा अपघाती राइडर + रु. ५० लाखांचे कायम सरुपी अपंगत्वाचे रायडर + रु.५० लाखांचे इन्कम रायडर घेतले तर त्याला हे सारे कवच वार्षिक फक्त रु.१० ते १५ हजारांचा प्रीमियम भरून मिळू शकते.
काही विमा कंपन्या विमा पॉलिसी घेतानाच भविष्यात काही घटना घडल्यावर आपल्या विमा सुरक्षेत वाढ करण्याची सुविधा देतात. उदा. एखाद्या अविवाहित व्यक्तीने जर टर्म इन्शुरन्स घेतला असेल तर त्याला विवाहानंतर ५०% विमा संरक्षण जास्त वाढवता येऊ शकते पुढे मूल झाल्यावर त्यात आणखीन २५% अधिकची वाढ करता येते. याचा वापर करून तुमच्या आयुष्यात जेव्हा जास्तीच्या जबाबदाऱ्या वाढतील तेव्हा जास्त सुरक्षा घेता येईल.
विमा कंपन्या टर्म इन्शुरन्स मध्ये अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ठे वेळोवेळी समाविष्ट करत असतात. जसे कि धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीला प्रीमियममध्ये सूट दिली जाते. जर टर्म इन्शुरन्स करताना मेडिकल चेकअप करावा लागला तर तो कंपनीच्या खर्चाने केला जातो.
आम्ही छोट्या, माध्यम आणि मोठ्या आकाराच्या कॉर्पोरेटना त्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या विमा सुरक्षेची सुविधा उपलब्ध करून देतो.
Provide Comparative and Competitive Quotes from Insurance Companies
Assist in Policy Administration
Personalized Claims Assistance