आजकालच्या धावपळीच्या जीवनात कधीही काहीही होऊ शकते. अपघात तर नित्यनेमानेच घडत असतात. अपघातात अनेक लोकं मृत्यूमुखी पडत असतात. अशावेळी आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे आर्थिकमान बिघडू नये हि प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणून टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे पती/पत्नी, मुले हि कधीही आजारी पडू शकतात आणि एकदा का आजारपण आले कि अतोनात पैसा खर्च करावाच लागतो. जर पैसा आपल्याकडे नसेल तर उधार उसनवार करूनही वैद्यकीय उपचार हे करावेच लागतात. हा असा प्रसंग आला तर पैशाची चिंता असू नये यासाठी प्रत्येकानेच आरोग्य विमा हा घेतलाच पाहिजे.
जर आरोग्य विमा तरुणपणीच घेतला तर हप्ता सुद्धा कमी बसतो. एकाच हप्त्या मध्ये नवरा बायको आणि तीन मुलांपर्यंत सर्वाना आजारपणाची सुरक्षा मिळू शकते. यासाठी वार्षिक/तिमाही आरोग्य विम्याचा हफ्ता भरण्याची सुविधा असते.
आरोग्य विम्याची काय गरज आहे?
आता भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढलेले आहे त्यामुळे आरोग्यावर होणारा खर्चही वाढला आहे. माणसाच्या जीवन शैली मध्ये बदल झालेला आहे, खाण्यापिण्याच्या सवईतसुद्धा बदल झालेले आहेत. त्यामुळे अनेक गंभीर आजार अचानक उदभवू लागले आहेत. आरोग्यसेवा क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे.
नागरिकांचे उत्पन्न आणि क्रयशक्ती वाढल्यामुळे अचानक उदभवणाऱ्या आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी त्याचे आर्थिक नियोजनाचा एक भाग म्हणून आरोग्य विम्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. कुटुंबात सरासरी ४ माणसे तरी असतात. नवरा बायको, आणि २ मुले हे आजकालचे कुटुंब झालेले आहे यातील कोणालाही आजारपण आले तर त्यासाठी लागणाऱ्या खर्चाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य विमा हा प्रत्येकाचं घेतला पाहिजे.
आरोग्य विमा कोणत्या स्वरूपात मिळू शकतो?
वैयक्तिक आरोग्य विमा
वैयक्तिक आरोग्य विमा योगेश हा आरोग्य विम्याचा सर्वात सोपा पर्याय आहे. यामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र विमा घेता येतो.
कुटुंब आरोग्य विमा योजना योजना
संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य सेवेसाठी येणारा खर्चाची सोय याव्दारे करता येते. एकाच योजनेतून व एकच हप्ता भरून सर्वाना सुरक्षा प्राप्त होते. प्रत्येकाला वेगळा विमा घ्यावा लागत नाही. तुमच्यासह तुमचा जोडीदार आणि तुमची मुले या सर्वांसाठी एकच पॉलिसी मिळते.
जेष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना
६० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसाठी हा चांगला पर्याय आहे. वाढत्या वयाबरोबर आजारपण सुद्धा वाढत जाते म्हणून हा अत्यावश्यक आहे.
आरोग्य विम्याचे लाभ
१) रुग्णालयात दाखल झाल्या नंतर होणारा सारा खर्च, डॉक्टर फी, ऍम्ब्युलन्स खर्च, आरोग्य सेवेचे शुल्क, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च तसेच रुग्णालयातून सोडल्यानंतर होणारा खर्च विमा कंपनी करते.
२) कॅश लेस सेवा घेतल्यास आपल्या खिशातून पैसे द्यावे लागत नाहीत, विमा कंपनी ते परस्पर भरून टाकते.
३) जर कॅश लेस सुविधा घेता आली नाही तर नंतर बिले सबमिट करूनही पैसे परत मिळू शकतात.
४) भरलेल्या हप्त्याच्या रकमेची उत्पन्नात वजावट मिळत असल्यामुळे आयकरात बचत होते.
५) ग्राहकाला जितक्या रकमेचे संरक्षण हवे त्यानुसार विमा हप्त्याचा दार निश्चित केला जात असतो.
आरोग्य विमा घेताना काय काळजी घ्यावी?
आपल्या आरोग्य गरजांसाठी सर्वंकष व पुरेसे विमाकवच मिळण्यासाठी गरजांची पडताळणी करून त्यानुसारच योग्य त्या आरोग्यविमा पर्यायाची निवड करणे महत्वाचे ठरते. यासाठी फक्त किंमत आणि हप्ता न पाहता
१) विम्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश केलेला आहे ते पाहावे
२) विम्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केलेला नाही याची माहिती घ्यावी
३) ग्राहकांना कोणत्या गोष्टींसाठी जास्तीचे पैसे भरावे लागतात हे तपासून घेतले पाहिजे.
४) कोणत्या आजारांना किती कालावधीनंतर विमा कवच मिळते ते पहा
५) जर काही आजार जसे कि डायबेटीस, ब्लडप्रेशर इ. आजार असल्यास त्यासाठी कोणत्या अटी व शर्ती आहेत ते समजून घेतले पाहिजे.
६) कोणकोणत्या हॉस्पिटल बरोबर विमा कंपनी संलग्न आहे ते तपासावे.