नवीन गुंतवणुकदाराने कर बचतीच्या ELSS योजना, संतुलित योजना आणि लार्ज कॅप योजना या प्रकारातील योजनेत गुंतवणूक करावी.
समभाग आधारित योजनेतील गुंतवणूक हि दीर्घ मुदतीसाठी असावी. ५ वर्षे, १० वर्षे, १५ वर्षे, २० वर्षे किंवा जास्त काळासाठी गुंतवणूक केली तर निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला बँक ठेवींसाठी पर्यायी गुंतवणूक करावयाची असेल तर कर्ज रोखे आधारित योजनेत (Debt Funds) गुंतवणूक करावी
आमच्या मार्फत नोंदणी केलेले गुंतवणूकदार
ज्यांनी आमच्या मार्फत यापूर्वी एमएफ युटीलिटी सोबत एकदाच रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि त्यांनी लॉगीन सुविधा घेतलेली आहे ते म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करणे, गुंतवलेले पैसे काढणे, त्याच फंडाच्या एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, नवीन एसआयपी सुरु करणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत एसटीपी माध्यमातून ठराविक काळाने (साप्ताहिक, मासिक) पैसे वर्ग करणे इ. आर्थिक व्यवहार ऑनलान करू शकतात.
जर तुम्ही आमच्या मार्फत रजिस्ट्रेशन केलेले असेल मात्र लॉगीन सुविधा घेतलेली नसेल तर तुम्ही आम्हाला clients.tfs@gmail.com या मेल वरून, आम्हाला फोन/Whatsapp (९८३४०७९८१३) करून लॉगीन सुविधा मागवून घेऊ शकता. तुम्ही मागणी केल्यावर आम्ही तुमच्यासाठी MFU कडे सूचना पाठवू, त्यानंतर तुम्हाला MFU कडून एक इमेल येईल त्यामध्ये एक लिंक दिलेली असते त्यावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला हवे ते लॉगीन आयडी आणि तुमचा पासवर्ड तयार करावयाचा असतो. यानंतर तुम्ही कोणत्याही संगणकावरून https://www.mfuonline.com संकेतस्थळावर लॉगीन करून वरीलप्रमाणे सर्व व्यवहार ऑनलान करू शकता. जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून हे व्यवहार करावयाचे असतील तर, गुगल प्ले स्टोअर मधून GoMF हे MFU चे मोबाईल App डाउनलोड करून Install केले पाहिजे. येथे तुमचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही सारे व्यवहार ऑनलान करू शकता.
जर तुम्ही आमच्या मार्फत नोंदणी केलेली नसेल किंवा तुम्ही प्रथमच आमच्या मार्फत गुंतवणूक करणार असाल तर
जर आपण म्युच्युअल फंडात आमच्या मार्फत प्रथमच गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला प्रथम आमच्या मार्फत MFU कडे नोंदणी करावी लागेल. हि नोंदणी आपण दोन प्रकारे करू शकता
ऑनलान नोंदणी:
ऑनलान नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा आणि तुमची माहिती भरा, डॉक्युमेंटस अपलोड करा आणि सबमिट करा. बस्स इतकेच.
ऑनला नोंदणीसाठी आवश्यक बाबी: तुमचा फोटो, आधार कार्ड फोटो, PAN कार्ड फोटो, चेकचा फोटो आणि तुमच्या सहीचा फोटो
फॉर्म डाउनलोड करून नोंदणी करणे व सोबत गुंतवणूक करणे
१) येथे क्लिक करून MF Utility Forms या विभागातील सर्व फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा, फुल्या केलेल्या ठिकाणी सह्या करा.
२) डाउनलोड विभागातील KYC फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा, पहिल्या पानावर आपला फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी सही करा, दुसरी सही दुसऱ्या (पाठीमागील) पानावर फुली केलेल्या ठिकाणी करा.
३) PAN कार्ड आणि आधार कार्डची स्वसाक्षांकित केलेली प्रत जोडा.
४) SIP माध्यमातून जेव्हढी रक्कम दर महिना तुम्हाला गुंतवावयाची असेल तेव्हढ्या रकमेचा चेक MFU Escrow Account हे नाव लिहून जोडा.
५) जर तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावयाची असेल तर तेव्हढ्या रकमेचा चेक MFU Escrow Account हे नाव लिहून जोडा.
आता वरील सर्व कागदपत्रे खालील पत्त्यावर रवाना करा
Thakur Financial Services
Near ICICI Bank, Opp Reliance Trends,
Kaviltali,
Chiplun - 415605
Dist: Ratnagiri