समभाग आधारित योजनांचे किती प्रकार असतात?
दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने म्युचुअल फंडाच्या ५ प्रकारच्या योजना असतात.
ELSS (Equity Linked Savings Schemes): या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कलम ८०-सी अंतर्गत वजावट प्राप्त होते. या योजनेत केलेली गुंतवणूक ३ वर्षे काढता येत नाही.
क्षेत्रीय योजना (Sectorial Funds): जसे कि बँकिंग फंड, फार्मा फंड, इन्फ्रास्ट्रक्चर फंड इ. या प्रकारातील योजनेत अधिक जोखीम असते, त्याचप्रमाणे ज्यांना शेअरबाजाराची चांगली माहिती असते अशा लोकांनीच या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करावी.
वैविध्यपूर्ण इक्विटी योजना (Diversified Equity Schemes): यातील प्रमुख प्रकार-
Large Cap Schemes: या योजनेतील पैसे देशातील पहिल्या १०० कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.
Mid Cap Schemes: या योजनेतील पैसे देशातील १०१ ते २५० कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.
Small Cap Schemes: या योजनेतील पैसे देशातील २५१ व पुढील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.
Multi Cap Schemes: या योजनेतील पैसे लार्ज, मिड व स्मॉल या तिन्ही प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.
Global Funds: जगातील अन्य देशातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली ज आते.
Hybrid Fund (संतुलित योजना): या प्रकाच्या योजनेतील पैसे हे काही प्रमणात शेअरबाजारात व काही प्रमाणात कर्जरोख्यात गुंतवले जातात.
समभाग आधारित योजनेत शेअरबाजाराची जोखीम अतर्भूत तर असतेच. पण हुशार गुंतवणूकदारांना हे माहित असते कि ज्याप्रमाणे ताजमहाल सारखे शिल्प एका दिवसात निर्माण करता येत नाही त्याचप्रमाणे इक्विटी योजनेतून चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळाचाच विचार केला पाहिजे, तसेच त्यासाठी संयमहि ठेवावा लागेल. यासाठी तुमची “श्रद्धा और सबुरी” या साईबाबांच्या प्रसिद्ध वाचनावर विश्वास ठेवून संयम पाळावा लागेल.
त्याचप्रमाणे जर तुम्हाला जोखीम कमी करावयाची असेल तर तुम्ही Hybrid Fund (संतुलित योजना) या प्रकारातील योजनेत गुंतवणूक करू शकता. यामुळे तुमची गुंतवणूक, योजनेच्या स्वरूपानुसार, शेअरबाजार आणि रोखे बाजारात विभागली जाते. जेव्हा बाजारात मोठी तेजी असते तेव्हा या प्रकारच्या योजनेतून तूम्हाला फार मोठा परतवा मिळणार नाही हे जरी खरे असले तरी जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा तुम्हाला फार मोठे नुकसानही सोसावे लागणार नाही.
समभाग आधारित योजनेत एक वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केल्यास रु रुपये एक लाखांपर्यंतचा नफा हा करमुक्त असतो आणि जर फायदा एक लाखांपेक्षा जास्त असेल तरच फक्त १०% दराने Long Term Capital Gain tax भरावा लागतो. टी.डी.एस. हि कापला जात नाही. मात्र बँकेच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर तुमच्या उत्पन्नाशी निगडीत दराप्रमाणेच कर भरणा करावा लागतो टी.डी.एस. सुद्धा कापला जातो.
जर का तुम्ही ELSS (Equity Linked Savings Schemes) या प्रकारातील योजनेत गुंतवणुक केली तर भरत सरकारच्या नियमानुसार आयकर कलम ८०-सी अंतर्गत वजावट प्राप्त होते. तुम्ही रुपये १,५०,००० पर्यंतचा फायदा मिळवू शकता. मात्र या योजनेत केलेली गुंतवणूक ३ वर्षे काढता येत नाही.