KYCअर्थात ग्राहकाला ओळखून घेणेः
म्युच्युअल फंडात अनैतिक मार्गाने मिळवलेला काळा पैसा गुंतवला जावू नये म्हणून Prevention of Money Laundering Act 2002 अंतर्गत व SEBI चे मार्गदर्शक तत्त्वांनुसार म्युच्युअल फंडाचे कोणतेही योजनेत गुंतवणूक करणा-या व्यक्ती अथवा संस्थला KYC ची पूर्तता करून देणे अनिवार्य आहे. हि प्रतिक्रिया एकदाच करावी लागते व गुंतवणूकदाराला Central Depository Services (India) Ltd. (CDSL) मार्फत एक सर्टिफिकेट प्रदान केले जाते ज्याचा वापर कोणत्याही प्रकारचे गुंतवणुकींसाठी होतो तसेच याची प्रत जोडल्यावर अन्य कागदपत्रे द्यावी लागत नाहीत म्हणून KYC करून घेणे गुंतवणूकदाराचे फायद्याचेच आहे.
वैयक्तिक स्वरूपात व्यक्तिगत KYC ची पूर्तता करून देणेसाठी लागणारी कागद पत्रेः
- फोटो.
- राहणेच्या पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी काहीही एकाची सत्य प्रत.
- पॅन कार्ड.
- ओळखीबाबत पुरावा – पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी काहीही एकाची सत्य प्रत.
संस्थात्मक KYC ची पूर्तता करून देणेसाठी लागणारी कागद पत्रेः हिंदू अविभक्त कुटुंबासाठीः
- पॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक
- डिक्लरेशन डिड
- बॅक खाते पुस्तक/उतारा नजिकचे कळतील.
- कंपनी/बॉडी कॉर्पोरेट
- इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट
- मेमोरेंडम व आर्टिकल ऑफ असोसिएशन
- सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या
भागिदारी संस्थाः
- पॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक
- भागिदारी पत्र
- भागिदारी पत्राचे नोंदणी दाखला
- गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
- सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या
ट्रस्ट, फाउंडेशन, एनजीओ, चॅरिटेबल बॉडीज
- पॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक
- नोंदणी दाखला
- ट्रस्ट डिड
- गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
- सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या