• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा

लार्ज कॅप योजना

by Sadanand Thakur / Saturday, 22 December 2018 / Published in Equity Schemes

समभाग आधारित योजनांचे प्रकार

१) लार्ज कॅप योजना (मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते)

मोठ्या भांडवली कंपन्यांमधील गुंतवणूक (Large Cap Schemes)या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नावाप्रमाणेच मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात.मोठ्या कंपन्यांची वार्षिक सरासरी वाढ हि स्थिर असते. तसेच या कंपन्या बुडण्याची व नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी म्हणजे जवळपास नसतेच. या कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही स्थिर असतो . या कंपन्यांमधील  गुंतवणूक तुलनेने कमी जोखीमीची असते.गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळालेला दिसतो. शेअर बाजारात तेजी असताना अशा योजनेतून फार चांगला परतावा मिळतो व मंदी असताना नुक्संधी होते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते. मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमित दरमहा (एस आय पी द्वारे ) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी-मंदीवर मात करून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणुकीसाठी तुमचे उद्दिष्ट किमान ७ ते १५ वर्षे असावे. म्हणून शक्यतो आपल्या निवृत्तीपर्यंतची मुदत निवडावी पैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुविधा अशा योजनेत असते. तसेच दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवत नेणे जास्त फायदेशीर होते. गुंतवणुकीला जितक्या लवकर सुरूवात केली जाते तेवढा चक्रवाढीचा व रुपी कॉंस्ट सरासरीचा अधिक फायदा मिळतो. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एस आय पी गुंतवणूक सुरु करावी. या योजनेत गुंतवणूक करून भविष्यातील अनेक गरजा ( लग्न , घर घेणे, गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरची तरतूद इ.) वेळच्या वेळी पूर्ण करणे सहज सुलभ होते. एक लक्षात ठेवा कि म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराच्या चढ-उतारांची जोखीम असते. परंतु जर आपण दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर ही जोखीम एका उत्तम संधीमध्ये परावर्तीत होते. म्युच्यअल फंडाच्या योजनेतून किती उत्पन्न मिळेल याची काहीच खात्री देता येत नसते मात्र इतिहास असे सांगता कि दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित योजनेतून उत्तम परतावा मिळालेला आहे. अनेक चांगल्या योजनेतून वार्षिक सरासरी 20% पेक्षा जास्त चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळालेला आहे.

मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा अशा कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली येतात. लार्ज कॅप प्रकारातील योजनेत २००८-०९ या वर्षात जेव्हा मोठी मंदी होती तेव्हा या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य ३५ ते ४०% इतके कमी झालेले होते. म्हणजे जेव्हा जानेवारी २००८ मध्ये बाजार उच्चतम पातळीवर होता तेव्हा ज्यांनी रु. १,००,०००/- गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य २००९ साली फक्त रु.६०,०००/- ते ६५,०००/- एवढे कमी झालेले होते. नवीन गुंतवणूकदारांनी शक्यतो लार्ज कॅप प्रकारातील योजनेत प्रथमच गुंतवणूक करू नये. जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील  कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.

लार्ज कॅप योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा

(टिप : लार्ज कॅप योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Equity या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील Large Cap या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर लार्ज कॅप प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).

  • Tweet

About Sadanand Thakur

Mutual Fund Distributor having experience of more than 15 years. Share Market experience of more than 25 years. Author of "Mutual Fund - Swapnapurticha Rajmarg" Marathi book.

What you can read next

बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड्स
मल्टी कॅप योजना
बॅलन्सड ( संतुलित योजना )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×