जीवन विमा

Home » जीवन विमा

Don't Have an Insurance ! or

Want guidance in selecting a plan, just fill the form below & get in touch with us

जीवन विमा का घ्यावा?

आर्थिक नियोजन करताना सर्वात प्रथम जीवन विम्याचे नियोजन प्रत्येकानेच केले पाहिजे. विमा घेणे म्हणजे तुम्ही ज्यांचावर प्रेम करता त्यांचे भविष्य सुरक्षित करणे. जीवन विमा घेणे म्हणजे भविष्यात होणारे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान भरून काढणे हाच तुमचा उद्देश असला पाहिजे. आजकालचे जीवन हे धावपळीचे आहे कधी काय होईल हे सांगता येत नाही, जर अचानक आपला मृत्यु झाला तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या  व्यक्तींना आपल्या पश्चात सुद्धा नियमित उत्पन्न मिळावे व त्यांच्या सर्व आर्थिक गरजा भागवल्या जाव्यात म्हणून सर्वात प्रथम पुरेसा जीवन विमा घेतला पाहिजे.  अन्य सारे उद्देश गौण आहेत. अशाप्रकारे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण जी रक्कम भरतो त्यालाच प्रीमियम असे म्हटले जाते. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे कि विमा व गुंतवणूक याची गल्लत करू नका. योग्य तोच विम्याचा प्रकार निवडा आणि य यासाठी तुम्हाला आवश्यक असेल तर आम्ही मदत करु शकतो. त्यासाठी आम्हाला संपर्क करा आम्ही योग्य तोच सल्ला देतो.

विमा घेण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपल्या पश्चात आपल्या वारसांना कोणाकडे हात पसरावा लागू नये, नैमित्तिक खर्चासाठी कोणते तरी हलके सालके काम करावे लागू नये, मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, इ. कारणांसाठी प्रत्येकाने विमा हा घेतलाच पाहिजे.  मात्र तो टर्म इन्शुरन्स स्वरूपातच घ्यावा कारण या प्रकारात कमी हप्ता भरून जास्तीत जास्त विमा संरक्षण प्राप्त होते. कोणत्याही पारंपरिक विमा योजनेतून अत्यल्प विमा कवच मिळते ज्याचा काहीच उपयोग नसतो आणि त्यावर मिळणारा वार्षिक परतावा हा साधारणपणे फार तर ४% दराने मिळत असतो. तुमची गुंतवणूक हि अन्य कोणत्याही गुंतवणूक साधनात करावी मात्र अशा गुंतवणूक साधनातून मिळणारा परतावा हा वाढणाऱ्या महागाईवर मात करून व आयकरात बचत करणारा असावा असे पाहावे.  यासाठी म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार व जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध प्रकारच्या योजना उपलब्ध असतात.

जीवन विमा किती रकमेचा घेतला पाहिजे?

जीवनावरील विमा पॉलिसी घेताना हे अवश्य पहिले पाहिजे कि मी कितीं रकमेचा जीवन विमा घेतला आहे? तो पुरेसा आहे का? विमा पॉलिसी कोणत्या प्रकारची आहे? ती माझी विम्याची गरज भागवण्यासाठी योग्य आहे काय? जर तुम्ही चुकीची विमा पॉलिसी घेतलेली असेल तर ती सरेंडर करण्याची तुम्ही मानसिक तयारी ठेवली पाहिजे कारण विमा योजनेत पुढील हप्ते भरत रहाण्यापेक्षा जर दुसरी कमी हप्ता व जास्त सुरक्षा देणारी योग्य पॉलिसी घेऊन जास्त जाणारी विमा हप्त्याची रक्कम अन्य गुंतवणूक साधनात गुंतवून तुम्ही जास्त फायदा मिळवू शकता हे लक्षात ठेवले पाहिजे.

विमा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा विमा सुरक्षा हि पुरेशी असली पाहिजे ज्यामुळे जर का दुर्दैवाने तुमचे काही बरेवाईट झाले तर तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या भविष्यातील सर्व आर्थिक गरजा त्या विमा कवचातून मिळणाऱ्या रकमेतून असे मासिक उत्पन्न मिळाले पाहिजे कि ते तुमच्या सध्याच्या उत्पन्नातून जसे भागवल्या जाऊ शकतात तश्याच त्या भविष्यातही भागवता आल्या पाहिजेत व परत महागाईमुळे जी आर्थिक हानी होते तीही भरून गेली पाहिजे.  म्हणून तुम्हाला आज जो दर महिना पगार/उत्पन्न मिळत असेल त्याच्या किमान ३ ते ४ पट मासिक उत्पन्न तुमच्या वारसाला मिळाले पाहिजे जेणेकरून तो त्याचे आर्थिक नियोजन करून भविष्याची तरतूदही करू शकेल.  म्हणजेच आज जर तुमचा दर महिन्याचा पगार/उत्पन्न रु.५०००० असेल तर तुम्ही किमान रु.१.५० कोटीचे बेसिक इन्शुरन्स कव्हर अधिक रु.१.५० कोटीचे अपघाती मृत्यु कवच घेतले पाहेजे, कारण आजकालच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. जर का तुम्ही हे विमा कवच टर्म इन्शुरन्स सोबत अपघाती विमा कवच असे घेतलेत तर ते अत्यल्प वार्षिक प्रीमियम भरून सहजपणे प्राप्त होऊ शकते.

जीवन विमा केव्हा घेतला पाहिजे?

कोणतीही गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या जीवनाचा विमा उतरवला पाहिजे. कोणताही चांगला आर्थिक सल्लागार तुम्हाला हेच सांगेल.  तुमचे पहिले उत्पन्नाचे साधन सुरु झाले मग तो पगार असो किंवा व्यवसायातून मिळणारा नफा असो तुमची प्रथम तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तिंचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुमच्या जीवनाचे विमा कवच घेतले पाहिजे. जर तुमचे लग्न झालेले असेल तर याला सर्वोच्च प्राथमिकता द्या.

TOP