म्युच्युअल फंड कंपनी तिचे योजनेची संपूर्ण माहिती (Offer Document) योजना सुरु करतनाच जाहिर करते गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने ते वाचून समजून उमजून गुंतवणूकदाराने गुंतवणूक करावी म्हणजे नंतर पश्चातापाची वेळ येत नाही. त्या माहिती पत्रकात (Offer Document) काही संज्ञा वापरल्या जातात त्या इंग्रजी आद्याक्षरानुसार खाली दिल्या असून त्याचा थोडक्यात अर्थ तपशिलामधे दिला आहे. जिज्ञासूनी याचा जरुर वापर करावा.
संज्ञा | तपशिल |
AccountStatement | खाते उतारा – प्रत्येक व्यवहाराची तपशिवार नोंद प्रत्येक व्यवहारानंतर गुंतवणूकदाराला याव्दारे कळविला जातो – जसे की खरेदि, विक्रि, डिव्हीडंड, बोनस इ. |
Ajusted NAV | सर्व भार, खर्च वजा जाता एका युनिटचे निव्वळ मुल्य |
Annual Report | वार्षीक अहवाल |
AnnualzedReturns | निव्वळ वार्षीक परतावा |
Asset Allocation | गुंतवणूकीचा विगतवार तपशिल |
AMC | म्युचलफंडाचे व्यवस्थापन करणारी कंपनी |
Average Cost | वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या किंमतिला खरेदि केलेल्या युनिटसची सरासरी किंमत |
Balance Fund | अशी योजना की ज्यामधे ठरावीक प्रमाणात शेअर बाजारात व ठरावीक प्रमाणात कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते. तुलनात्मकदॄष्ट्या कमी जोखमिची योजना. |
Bear Market | मंदिचा काळ – जेव्हा बाजारात विक्रिचा जोर असतो |
Benchmark | योजनेची तुलना करण्यासाठी – जसे की बॅंकिंग फंडाची तुलना बॅंक इंडेक्सचे परताव्या बरोबर केली जाते. |
Beta | बेटा जेवढा जास्त तेवढा मुल्यामधे जास्त चढ उतार व बेटा जेवढा कमी तेवढा कमी चढ उतार |
Bond | कर्ज रोखा – ठरावीक तारखेला ठरावीक व्याज दराने कर्जावू घेतलेली रक्कम परत करण्याचा वायदा असलेला पेपर |
Bonus | जादा दिली जाणारी युनिटस बोनस युनिट नंतर युनिटसची संख्या वाढते पण प्रती युनिट किंमतही कमी होते. |
Broker | म्युचल फंड कंपनीकडे नोंदलेला मध्यस्थ – जो कंपनीच्या योजनांची माहिति गुंतवणूक दाराला देवून फंडाचे वतीने गुंतवणूक जमा करतो व सल्लहि देतो उदा. ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस. |
BSE Index | मुंबई स्टॉक एक्सचेंज – ३० कंपन्याचे किमतिवर आधारलेला असतो ज्याचे चढ उताराने बाजाराची दिशा समजण्यास मदत होते. |
Bull Market | तेजीचा कालखंड – यावेळी गुंतवणूकदारांचा कल खरेदिकडे असतो. |
Capital Gain | भांडवली मुल्यात झालेली वाढ – एक वर्षाचे आत विक्रि केल्यास अल्प मुदतिचा भांडवली नफा समजला जातो ज्यावर इंकम टॅक्स प्रचलित दराने भरावा लागतो सध्या १५% आहे – एक वर्षानंतर विक्रि केल्यास दिर्घ मुदतिचा भांडवली नफा समजला जातो सध्या इंकम टॅक्स लागु नाही.मात्र अनिवासि भारतियाना दोन्हवर टॅक्स भरावा लागतो |
CD | सर्टिफिकेट आफ डिपॉझीट – हे फक्त शेड्यूल्ड बॅंका ९१ दिवस ते १२ महिन्याचे मुदतीसाठी जारी करतात व DFI १ ते ३ वर्षासाठी जारी करतात. एक प्रकारचे विना तारण वचन पत्र असते (Promissory Note). |
Close-EndedScheme | निश्चित मुदत असणारी मुदतबंद योजना – २ ते १५ वर्ष कालावधिची असते. योजनेच्या सुरुवातिचे ठराविक काळातच यांत गुंतवणूक करता येते त्यानंतर युनिटसची खरेदि-विक्री फक्त नोंदविलेल्या स्टॉक एक्सचेंज व्दाराच करता येते. |
CP | कमर्शिअल पेपर – चालू भांडवलाची गरज भागविण्यासाठी लहान मोठे उद्योजक जारी करतात – विनातारण असतात – कमी किंमतीला विकले जाते – गरजेच्या निकडिनुसार मुल्य ठरते व मुदत साधारणपणे ३ महिने ते १ वर्षाची असते – मुदतीअंती पूर्ण किंमतिला पुनः खरेदि करावयाचे असते. |
Compliance Officer | गुंतवणूकदारांच्या विविध कायदेशीर समस्या सोडविण्यासाठी AMC याची नेमणूक करते. |
CDSC | Contingent Deferred Sales Charge – हा एक प्रकारचा ठरावीक काळापूर्वी पैसे काढल्यास लागणारा निर्गमन आकार आहे. |
Corpus | सर्व गुंतवणूकदारानी मिळून एका योजनेत गुंतवलेली एकूण रक्कम. |
COC/TC | Cost of Churning/Turnover Cost – शेअर्सच्या प्रत्येक खरेदि-विक्री वर होणारा खर्च जसे की कमिशन, कस्टोडियन फी, रजिस्ट्रेशन फी, टॅक्स इ. जेवढेवेळा व्यवहार करावे तेवढेवेळ हे खर्च करावे लागतात कधी कधी तर हे खर्च होणारा नफाही खाउन जातात आणि म्हणूनच टायमिंग चुकल्यामुळे सर्व सामान्य गुंतवणूकदार फक्त दलालांसाठी काम करतो व स्वतः मात्र नुकसान सोसतो. फंड मॅनेजर मात्र हा खर्च कमी करण्याची काळजी घेत असतात. |
Custodian | ह्यांचे ताब्यात योजनेची सर्व मालमत्ता, शेअर्स, रोखे इ. सांभाळण्यासाठी असते. |
Cutoff Time | प्रत्येक योजनेच्या खरेदि व विक्री साठी दिवसाची ठरवलेली वेळ या वेळे पुर्वी युनिटची खरेदि व विक्री केल्यास त्या दिवसाच्या NAV ने व्यवहार पुरे केले जातात व या वेळेनंतर केल्यास दुस-या दिवशीच्या NAV ने व्यवहार पुरे केले जातात. |
संज्ञा | तपशिल |
Debt/Income Funds | अशा योजना की ज्यामधिल गुंतवणूक हि कर्जरोखे, बॉंड, ट्रेझरी बिल्स, सीडी व सीपी ज्यावर ठराविक व्याजाचे उत्पन्न असते अश्या सिक्युरिटिज मध्येच गुंतवणूक केली जाते. |
Discount | जेव्हा एखादे योजनेच्या एका युनिटचे बाजारमुल्य हे त्याच्या NAV पेंक्षा कमी असते तेव्हा डिस्काउंट मधे व्यवहार चालू असतात. |
Diversification | म्युचल फंड योजनेची गुंतवणूक हि एकाच वेळी अनेक कंपन्यांचे शेअर्स मधे किंवा सिक्युरिटीज मधे केली जाते त्याला डायर्व्हसिफिकेशन म्हटले जाते ज्यामुळे जोखिम कमी होते. |
Dividend Distribution Tax | Debt योजना अथवा ज्या योजनेत ५०% पेक्षा जास्त गुंतवणूक कर्ज रोखे वगैरे Debt Securities मधे गुंतवले जातात अशा वेळी गुंतवणूकदाराना डिव्हीडंडचे वाटप करण्यापूर्वी जो टॅक्स भरावा लागतो त्याला Divident Distribution Tax म्हणतात. सद्या याचा दर १०% + १०% सरचार्ज असा आहे. |
Dividend Frequency | एका ठरावीक काळात किती वेळा डिव्हीडंड दिला हे समजते. |
Dividend History | योजना सुरु झाल्यापासून किती वेळा डिव्हिडंड दिल्याचा इतिहास. |
Dividendper unit | प्रती युनिट डिव्हिडंड रुपयात. |
Dividend Plan | Dividend Plan या योजनेत जेव्हा अतिरिक्त निधी उपलब्ध होतो तेव्हा डिव्हिडंड जाहिर केला जातो. हा करमुक्त असतो. |
Dividend Payout | हा पर्याय स्वीकारला असता जेव्हा डिव्हिडंड जाहिर केला जातो तेव्हा तो गुंतवणूकदाला रोखीत चेकने अदा केला जातो. |
Dividend Reinvestment | हा पर्याय स्वीकारला असता जेव्हा डिव्हिडंड जाहिर केला जातो तेव्हा तो त्याच योजनेत परत गुंतवला जातो व त्याबद्दल जादा युनिट दिली जातात. |
Dividend Warrants | याद्वारे डिव्हिडंडचे वाटप केले जाते. |
Dividend Yield | डिव्हिडंडची प्रती युनिट टक्केवारी समजते. |
Dow Jones Index | अमेरिकन इंडेक्स चे नांव. |
Entry Load | गुंतवणूक करताना आकारला जातो यातूनच आमचे सारखे ब्रोकरना कमिशन मिळते. |
ELSS | Equity Linked Savings Schemes या योजनेत केलेली गुंतवणूक हि इंकम टॅक्स मधिल कलम ८०-सी खाली रु. एक लाखा पर्यंत वजावटीसाठी पात्र असते. हा पर्याय या सवलती साठी सर्वोत्तम आहे. तीन वर्षे काढता येत नाहीत. |
Ex-Bonus NAV | बोनस देउन झाल्यानंतरची NAV. |
Ex-Dividend Date | डिव्हिडंड ज्या तारखेला देण्याचे जाहिर होते ती तारिख. |
Exit Load | ६ त १२ महिन्यां पूर्वी अथवा योजनेत जाहिर केल्याप्रमाणे मुदतिपूर्वी पैसे काढल्यास लागू होतो. |
Expense Ratio | योजना चालविण्यासाठी येणारे खर्चाची टक्केवारी. |
Floating rate Bonds | अर्थसंस्था व मोठे उद्योगसमुह ३ ते ५ वर्ष मुदतिचे कर्ज रोखे विक्रीसाठी काढतात त्याना Floating Rate Bonds म्हणतात. |
Face Value | गुंतवणूकीचे दर्शनी मुल्य. |
Fund Management Cost | योजना चालवण्यासाठी AMC घेत असलेली फी. |
Fund Manager | योजनेचे गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी AMC ने नेमलेली तज्ञ व्यक्ती. |
Gilt/Government Securities | सरकारी कर्जरोखे. |
Global Funds | या योनतेत सर्व जगातिल कंपन्यांचे शेअर्स मधे गुंतवणूक केली जाते. |
Gilt Funds | या योजनेत फक्त सरकारी कर्ज रोख्यातच गुंतवणूक केली जाते. पूर्ण पणे सुरक्षीत गुंतवणूक. |
Growth Scheme | या योजनेचे उदिष्ट दिर्घ मुदतित भांडवली वॄध्दी करुन देणे हे असते. मुल्यात बाजाराप्रमाणे चढ उतार होत असतो. |
संज्ञा | तपशिल |
Income/Debt Fund | या योजनेमध्ये निश्चित उत्पनाचे सिक्युरिटीज मधे गुंतवणूक केली जाते व म्हणून अत्यंत कमी जोखिम. |
Index Funds | या योजने अंतर्गत योजनेच्या उदिष्टांनुसार एका विसिष्ठ बाजाराचे इंडेक्सच्याच शेअर्स मधेच गुंतवणूक केली जाते. |
Indexation | भांडवली नफ्यावरील टॅक्स काढण्यासाठी वापरतात. |
Inflation | महागाईमुळे होणारे चलनाचे अवमुल्यन. |
Inflation Risk | महागाईमुळे होणारे मालमत्तेचे अवमुल्यन. |
Investment Objective | योजनेचे गुंतवणूकीचे उदिष्ठ याचे बाहेर फंड मॅनेजरना गुंतवणूक करता येत नाही. |
Investment Strategy | योजनेची गुंतवणूकिची मार्गदर्शक तत्वे. |
Launch Date | योजना गुंतवणूकिसाठी खुली होण्याची तारिख. |
Liquid Funds/Money Market Funds | या प्रकारचे योजनेत कमी कालावधीचे सिक्युरिटीजमधेच गुंतवणूक केली जाते. २ दिवसापासून १५ दिवसापर्यंतच गुतवणूक करणेसाठी उत्तम पर्याय. |
Liquidity | तरलता. म्युचल फंडाकडे काहि खर्चासाठी व गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी ठेवली जाणारी रोख रक्कम. |
Lock In Period | ठरावीक मुदतिपूर्वी पैसे काढता येत नाहीत. प्रमुख्याने टॅक्स बचतिच्या ELSS Schemes. |
Management Expense Ratio | योजना चालवण्यासाठी येणारा खर्चाचे प्रमाण हे योजनेत जमा असणारे एकूण रकमेवर अवलंबून असते व यावर AMFI व SEBI च्या मर्यादा असतात. |
Market Risk | बाजार भावांचे चढ उताराची जोखिम. |
Market Capitalization | एखादे कंपनीचे भांडवलाचे निव्वळ बाजारमुल्य. |
Money Market | अल्प कालावधीचे सिक्युरिटीजचा बाजार. |
Net Asset Value (NAV) | एका युनिटचे निव्वळ मालमत्ता मुल्य. जे रोज बदलत असते व ज्याचे आधारे नवीन गुंतवणूक करता येते तसेच पैसेहि काढता येतात. |
Nifty | ५० कंपन्यांचा समुह ज्यांचे शेअर्स NSE (National Stock Exchange) वर नोंदविलेले असतात. |
No Load Scheme | या प्रकारचे योजनेत गुंतवणूक करताना तसेच बाहेर पडताना कोणताही चार्ज आकारला जात नाही. |
Nominee | वारस. ज्याला गुंतवणूकिदाराचे पश्चात पैसे मिळण्याचा हक्क असतो. |
संज्ञा | तपशिल |
Offer Documentor Prospectus | कोणतीहि नविन योजना सुरु करताना सेबीचे मार्गदर्शक तत्वानुसार म्युचल फंड कंपनीला Offer document or Prospectus जाहिर करणे बंधनकारक असून या मधे योजनेची सर्व माहिति, गुंतवणूकीचे उदिष्ठ, गुंतवणूकीच्या मर्यादा, देण्यात येणा-या सेवा, गुंतवणूकिची मार्गदर्शक तत्वे इ. सर्व बाबींचा उल्लेख केलेला असतो जेणे करुन आपण जेथे पैसे गुंतवित आहोत त्याची पूर्ण माहिति व्हावी व हि माहिति व्यवस्थीतपणे गुंतवणूकदाराना करुन देणे व त्यांचे गुंतवणूकिचे उदिष्टांनुसार योजना त्याना सुचविणे हे आमचेसारखे मध्यस्थांचे काम असते व त्यासाठीच आम्हाला कमिशन मिळते निव्वळ फॉर्म भरण्यासाठी न्हवे आणि म्हणुनच कोणामार्फत गुंतवणूक करावी हे ज्याचे त्याने ठरवावे. सर्व्हिस व सल्ला हा सुध्दा अत्यंत महत्वाचा असतो. पैसे कोणीतरी सांगतो म्हणून गुंतवू नका तर ज्याला ह्यातल समजत त्याचे मार्फत गुंतवणूक केलीत तर तुमचाच फायदा होईल. आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात यावर तुमचा विश्वास असेलच. |
Open Ended Schemes | थोडक्यात सांगायचे तर या योजना तुमचे बॅंकेतीत बचत खात्याप्रमाणे असतात. |
Opening NAV | योजना सुरु होतानाचे बाजारमुल्य. NAV. |
Premium | एका युनिटचे बाजारमुल्य हे NAV पेंक्षा जास्त असते. |
Performance | कामगिरीचे मुल्यांकन. |
Portfolio | गुंतवणूकीचा विगतवार तपशिल. |
Prospectus | ज्यामधे योजनेची व AMC पुर्ण माहिति देउन गुंतवणूक करण्याचे आवाहान केले जाते. |
Rating | योजनेच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्याची पध्दत. |
Redemption of Units | आपले जवळील युनिटस म्युचल फंडाला परत करुन पैसे काढून घेण्याची मागणी करणे. |
Repurchase | गुंतवणूकदाराची युनिटस योजना पैसे देवून विकत घेते अथवा गुंतवणूकदार युनिटस परत करुन पैशाची मागणी करतो. |
Repurchase Price | निर्गमन आकार वजा करु फंड पुनर्खरेदिची NAV जाहिर करतो त्या किंमतिने गुंतवणूकदाराला पैसे दिले जातात. |
Recurring Investment Facility | दरमहा अथवा तिन महिन्यानी ठराविक तारखेला गुंतवणूक करण्याचि सुविधा. |
Recurring Withdrawal Facility | नियमित दरमहा अथवा तिन महिन्यानी ठराविक तारखेला गुंतवणूकीपैकी काही ठराविक रक्कम काढून घेण्याची सुविधा. |
Redemption Fee | योजनेतून पैसे काढून घेताना लावला जाणारा आकार. |
Redemption Price | पैसे काढून घेण्यासाठी जाहिर केली जाणारी NAV. |
संज्ञा | तपशिल |
Sale Price | गुंतवणूकदाराने युनिटस खरेदि करण्यासाठी जाहिर केली जाणारी NAV. |
Scheme Objective | याद्वारे योजनेचे गुंतवणूक उदिष्ठ जाहिर केले जाते जेणेकरुन योजनेची गुंतवणूक कोणकोणत्याप्रकारच्या सिक्यरिटिजमध्ये व कितीकिती प्रमाणात केली जाईल याचीही माहिती यात दिली जाते. |
Sector Allocation | वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात केल्या जाणारे गुंतवणूकिचा क्षेत्रनिहाय तपशिल. |
Sector Fund | विशिष्ठ उद्योग क्षेत्रातच केल्या जाणारे गुंतवणूकिची योजना. |
Systematic Investment Plan (SIP) | ज्याना एकरकमि गुंतवणूक करणे शक्य नाहि त्यांचेसाठी दरमहा अथवा तिमाहि ठराविक तारखेला पुढिल तारखेचे आगावू चेक देउन, अथवा ECS किंवा बॅंकेचे खात्यातून परःस्पर पैसे वळते करुन देण्याची गुंतवणूक सुविधा. यामधे दरमहा रु. ५०० एवढ्या कमी रकमेनेहि खाते सुरु करता येते. या योजनेत बाजार चढ उतारामुळे सरासरीचा फायदा होतो. हि योजना गुंतवणूकिसाठी सर्वोत्तम मानली जाते. तरुणपणी दिर्घमुदतिसाठी ह्या योजनेद्वारे गुंतवणूक सुरु केल्यास जीवनातिल अनेक गरजा भागणे शक्य होउ शकते. |
Systematic Transfer Plan (STP) | एका योजनेत (शक्यतो डेब्ट योजनेत) एक रकमि गुंतवणूक करुन दरमहा अथवा तिमाहि एका ठराविक तारखेला ठराविक रक्कम दुस-या योजनेत (शक्यतो इक्वीटि योजनेत) वर्ग करण्याची सुविधा जेणेकरुन एक रकमि गुंतवणूक करुनहि सरासरिचा फायदा घेता येतो. |
Systematic Withdrawal Plan (SWP) | एकदाच एक रकमि गुंतवणूक करुन दरमहा अथवा तिमाहि एका ठराविक तारखेला ठराविक रक्कम काढून घेण्याची सुविधा नियमित उत्पन्न मिळवू पहाणा-यांसाठी उपयुक्त योजना. |
Total Asset Under Management | एका ठराविक तारखेला फंडाकडे असणा-या एकूण गुंतवणूकीचे बाजारमुल्य. |
Trust | दुस-या व्यक्तिची मालमत्ता त्यांचे भल्यासाठी सांभाळण्यासठी स्थापन करण्यात आलेली कायदेशिर व्यवस्था. |
Trustee | म्युचल फंड योजनेची जाहिर करण्यात येणारी NAV बरोबर जाहिर केली जाते कि नाहि तसेच योजनेचे व्यवस्थापन तसेच योजनेची मालमत्ता सुरक्षीतपणे राखली जाते कि नाहि यावर नियमित देखरेख ठेवण्यासाठी अधिकारप्राप्त व्यक्ति अथवा व्यक्तिंचा समुह. |
संज्ञा | तपशिल |
Unit | एक युनिट म्हणजे म्युचल फंड योजनेत गुंतवलेला एक शेअर ज्याचे दर्शनी मुल्य हे सर्वसाधारणपणे रु.१० असते. |
Unit Holder | अशी व्यक्ति ज्याचेकडे युनिटसची मालकी असते. |
Value Stock | असा शेअर कि ज्याचे बाजारमुल्य Price to Earning Ratio पेंक्षा अथवा पुस्तकि मुल्यापेंक्षा कमी असते. |
Yield from Dividend | डिव्हिडंड पासून आपले गुंतवणूकिशी टक्केवारित मिळणारे प्रत्यक्ष उत्पन्न. |