अनिवाशी भारतीय NRI’s व म्युचल फंड गुंतवणूक
अनिवाशी भारतीयांची म्युचल फंडातिल गुंतवणूक नियमितपणे वाढत आहेः
भारताचे आर्थिक विकासात भारतात रहाणारे भारतीय नागरिकांचा सहभाग तर आहेच पण परदेशात रहाणारे भारतीयांचा सुध्दा यात भरीवं वाटा आहे. म्युचल फंडात परदेशात रहाणारे भारतीयांची गुंतवणूक नियमितपणे वाढतच आहे. रिझर्व्ह बॅकेने जाहिर केलेल्या तपशिलानुसार परदेशी रहाणारे भारतीयांची म्युचल फंडातिल गुंतवणूक २००३ साली रु.१०२८ कोटी होती ती २००४ साली रु.२६६३ कोटी झाली व २००५ साली रु.४९६६ कोटी झाली.
परदेशी रहाणारे भारतीयांनी म्युचल फंडात गुंतवणूक का करावी?
- भारतीय अर्थव्यवस्था हि जगात अत्यंत वेगाने पुढे जात आहे हे सर्वमान्य सत्य आहे.
- परकिय गुंतवणूकदार नियमितपणे भारतिय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करित आहेत.
- अनेक सेझ मंजूर झाले आहेत व भविष्यात ते कार्यरत होतिल.
- येत्या ५ ते ७ वर्षात पायाभूत सुविधा विभागात जसे की पॉवर, रस्ते, धरणे, पाणी योजना, टेलिकम्युनिकेशन इ अनेक उद्योग धंद्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्याचे सरकारी व योजना आयोगाचे निर्णय झाले आहेत.
- सर्वच विभागात उद्योग धंद्याना पोषक वातावरण आहे.
- जीडिपी स्थीर आहे व पूढे वाढ अपेक्षीत आहे.
- काम करणा-या भारतीयांचे सरासरी वय फक्त ३५ आहे.
- सद्या देशातील एकूण गुंतवणुकीपैकी नगण्य म्हणजे 7 टक्के पेक्षा कमी गुंतवणूक म्युचल फंडात आहे.
- उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
- शेती व शेतीला पूरक उद्योगधंद्याला पूरक असे सरकारी धोरण आहे.
- अनेक परदेशी कंपन्यांचे काम भारतीय कंपन्या करत आहेत.
- भारतीय शेअर बाजार अद्यावत आहे व त्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
- भारतीय अर्थसंस्था व उद्योगधंद्यावर उत्तम नियंत्रक म्हणून सेबी व रिझर्व्ह बॅंक काम करत आहेत.
अनिवाशी भारतीय म्हणजे कोण?
भारतिय नागरिक किंवा भारतिय वंशाच्या व्यक्ति जे परदेशात शिक्षण नोकरी किंवा धंद्यासाठी रहातात त्याना परदेशस्थ भारतीय म्हणून ओळखले जाते.
अनिवाशी भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक करु शकतात काय?
होय करु शकतात.
अनिवाशी भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक कशी करु शकतात?
भारतीय म्युचल फंडात गुंतवणूक करण्यासाठी परदेशी भारतीयाना खालिल तीन प्रकारातील कोणत्याहि एका प्रकारचे खाते, ज्या बॅंका अशी सुविधा पुरवतात अशा कोणत्याही बॅंकेत, खाते उघडावे लागतेः
- नॉन रेसिडंट (एक्स्टर्नल) रुपी (एनआरइ) खाते ज्यात भारतीय रुपयात तसेच परदेशी चलनातही पैसे भरता येतात व काढताही येतात व परदेशात नेताही येतात.
- आर्डिनरि नॉन रेसिडंट रुपी (एनआरओ) खाते ज्यात भारतीय रुपयात तसेच परदेशी चलनातही पैसे भरता येतात मात्र परदेशी चलनात काढता येत नाहित व परदेशात नेताही येत नाहीत.
- फूल्ली कन्वर्टीबल नॉन रुपी (एफएनसीआर) खाते हे एनआरइ खात्यासारखेच असते मात्र यातील शिल्लक हि परदेशी चलनातच खात्यात शिल्लक रहाते.< >एनआरइ खात्यावरिल चेक द्वारा रुपयांमधे किंवा अमेरिकन डॉलरमधे त्यावेळच्या विनिमय दरानुसार अदा केले जातात रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाअधीन जर गुंतणूक परदेशी चलनात परत नेण्याचे सुचनेनुसार गुंतविली असेल तरच अमेरिकन डॉलरमधे पैसे परत केले जातात. जर गुंतवणूक एनआरओ खात्यातून केली असेल तर एनआरओ खात्यावरिल भारतीय रुपयात रक्कम परत केली जाते. पैसे परत करताना टिडिएस वजा करुन सर्टिफिकेट सोबत परत केले जातात. परदेशी चलनात पैसे नेण्याच्या सुविधेने गुंतवणूक केली असेल तर ३०% कॅपिटल गेन टॅक्स वजा केलेली रक्कम नेता येते.
- तसेच परदेशी चलनात पैसे नेण्याच्या सुविधेने गुंतवणूक केली असेल तर टॅक्स पश्चात डिव्हीडंडची रक्कमही नेता येते.
अनिवाशी भारतीयाना म्युचल फंडात गुंतवणूक करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेणे आवश्यक आहे का?
बहूतेक भारतिय म्युचल फंड कंपन्यानी त्यांचे योजनेमधे परदेशात रहाणारे भारतीयांनी गुंतवणूक करण्यासाठी आधीच रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घेवुन ठेवलेली असल्यामुळे अशी परवानगी त्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी घ्यावी लागत नाही.
परदेशी चलनात अशी गुंतवणूक करता येते काय?
नाही. भारतीय रुपयातच करावी लागते. एनआरइ खात्यातून अशी गुंतवणूक करणे उत्तम असते.
पैसे कसे काढता येतात?
ओपन-एंडेड स्किममधून पैसे काढण्यासाठी रिडमशन स्लीप एक तर सही करुन आमचेकडे पाठवा अथवा म्युचल फंड कंपनीचे इंव्हेस्टर सर्व्हिस सेंटर कडे पाठवावी. सामान्यतः रिडमशन स्लीप मिळाल्या पासून ३ त ५ दिवसात चेक पाठविले जातात.
क्लोज-एंडेड स्किम असल्यास रिडमशन स्लीप नोंदणीकॄत स्टॉक एक्सचेंज वर विकावी लागते.
काढलेले पैसे कोणत्या स्वरुपात अदा केले जातात?
परदेशी चलनात पैसे नेता येतात काय?
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान मधे गुंतवणूक करता येते काय?
होय करता येते.
गुंतवणूकीचे मुल्य कसे समजेल?
आमचे साइटवर लॉगीन करुन समजेल. तसेच www.amfiindia.com वर रोजचेरोज NAV जाहिर केली जाते.
टॅक्स बाबत
नातेवाईकाना युनिटस् बक्षीस देता येतात काय?
होय
इंडेक्सशेसन फायदा मिळतो काय?
होय. जर गुंतवणूक ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवली असेल तर.
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती आहे?
व्यक्तिला कर रचने प्रमाणे.
या लेखाचे खाली दिलेले टेबल पहा.
अधिक जाणकारिसाठी तुमच्या कर सल्लागाराशी बोला.
गुंतवणूकीचे साधे नियमगुंतवणूक म्हटले म्हणजे काही तरी किचकट प्रकार आहे असा समज आपण उगाचच करुन घेतो. साधे व सोपे नियम पाळले तर हिच गोष्ट फारच सोपी आहे हे समजून येईल. साधी गोष्ट हि आहे कि गुंतवणूकीचे साधे व सोपे नियम पाळून कोणतीही व्यक्ती चांगला गुंतवणूकदार होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या चुकासुध्दा टाळता येतात. येथे मी तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचे साधे व सोपे नियम सांगणार आहे.प्रथमत: प्लान तयार करा:प्रथमतः तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसारच तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. गुंतवलेल्या रकमेपैकी जी रक्कम तुम्हाला पुढील २ ते ३ वर्षात लागणार असेल अशी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड, मनी मार्केट,फ्लोटींग इंटरेस्ट रेट अथवा अल्प मुदतीच्या बॉण्ड मध्ये गुंतवा. जर तुम्ही या पुर्वी अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची गुंतवणूक जास्त जोखमीच्या योजनेत केलेली असेल व जर ती फायद्यात असेल तर अथवा तीफायद्यात येताच रक्कम काढून घ्या व वर सांगितलेल्या योजनेपैकी योग्य त्या योजनेत गुंतवा. हे सांगावयाची गरज नाही कि बाजाराचा निचांक काय असेल अथवा उच्चांक काय असणार आहे याचे ठोकताळे बांधत बसू नका. प्रथमत: हे लक्षात ठेवा कि अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम सुरक्षीत ठेवण्याला प्राधान्य द्या. तुमच्या दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतच गुंतवणूक करा. यासाठी, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, संतुलित (Balanced Schemes and Balanced Advantage Fund) व इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम अशा प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, योग्य योजनेची निवड करण्यासाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. म्युचुअल फंड किंवा शेअरबाजारात गुंतवणूक करतना नेहमीच गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला महत्वपूर्ण असतो कारण तो त्याच्या अनुभवाचा वापर करून तुम्हाला सल्ला देत असतो.साधी गोष्ट:दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी समभाग योजनेतच गुंतवणूक करा व त्यासाठी डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेची (शक्यतो लार्ज कँप किंवा लार्ज अँड मिड कँप फंड योजना) निवड करा. अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम फ्लोटींग रेट बॉण्ड फंड योजनेत गुंतवा. हे गुंतवणूकीचे मुळ नियम आहेत ते काटेकोरपणे पाळणेच तुमच्या हिताचे असते. तुमच्यासमोर गुंतवणूकीचे बरेच काही पर्याय उपलब्ध आहेत अथवा ते तुम्हाला सांगीतले जातील, जसे कि पेट्रो फंड, एमएनसी फंड, गिल्ट इ. स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजना असतात व त्यात गैर कहिही नाही. परंतु नविन गुंतवणूकदाराने चांगल्या म्युच्युअल फंड हाऊसच्या डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेतच गुंतवणूक करण्याचा साधा नियम पाळावा. दिर्घ मुदतीत अशा योजना अत्यंत फायदेशीर होतात. जर एखाद्या तिमाहीत २५% पेक्षा जास्त नुकसान सहन करण्याची तुमची तयारी नसेल तर स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजनांपासून दुर रहाणेच शहाणपणाचे असते.हॉट स्टॉक व फंड योजना टाळा:जर तुम्ही या वर्षातील सर्वात चांगली कामगिरी करणा-या म्युच्युअल फंड योजनेत व समभागात गुंतवणूक केली असेल तर पुढिल वर्षी त्याच्या निचांकी कामगिरीची तयारी ठेवा. कारण साधा नियम लक्षात ठेवा ज्या गोष्टीची किंमत वर जाते ती खाली येणारच. यासाठीच Reversion to the Mean (परत मध्य गाठलाच जातो) हा नियम आहे.नियमित गुंतवणूक करत रहा:आपल्या गुंतवणूक करण्याच्या क्षमतेनुसार कमी अथवा जास्त रक्कम दर महा ठरावीक तारखेला गुंतवत रहाणे हाच जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बाजार उच्चांकी असताना गुंतवणूक करण्याचे या प्रकारेच टाळू शकता. शिवाय अशी सर्वकालीन शहाणी व हुशार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कि जी बाजाराचा कल, तेजीचा किंवा मंदीचा कालावधी (timing) बरोबर साधू शकेल.गुंतवणूक करा पण विकू नका:अल्प काळासाठी (वरचेवर) केलेले व्यवहार (trading) हे गुंतवणूकदारापेंक्षा फक्त ब्रोकरलाच श्रीमंत करतात. तसेच हि प्रवृत्ती आयकर विभागालाही आवडते. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटलात, कि जो असे सांगतो आहे कि मी अल्प काळाचे व्यवहार (trading) करुन भरपूर पैसे मिळवले आहेत, व तुम्ही याबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर मनाची तयारी ठेवा कि लवकरच तो या विषयावार बोलण्याचे टाळून दुस-याच एखाद्या विषयाला महत्व देऊ लागेल व ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. म्हणून साधा नियम पाळा कि फंडात अथवा स्टॉक मध्ये नियमीत गुंतवणूक करत रहा व ती विसरुन जा. यालाच म्हणतात Buy and Hold.टिपवर विश्वास ठेवून गुंतवणूक करु नका:कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्यातरी योजनेत गुंतवणूक करू नका. अनुभवी गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याप्रमाणेच गुंतवणूक कारणे तुम्हाला फायदेशीर होईल.जास्त व्याजाच्या मोहाला बळी पडू नका:जास्त व्याचाचे आमिष आहे म्हणून सहकारी पतसंस्था वगैरे ठिकाणी गुंतवणूक करू नका, कारण यातील एखादा संचालक जरी लबाडी करणारा निघाला तरी अशी संस्था बुडू शकते व तुमचे पैसेही बुडण्याची शक्यता असते.MLM, भीशी, चीट फंड इ. योजनांपासून दूर रहा:अशाप्रकारच्या योजनेतून फक्त सुरुवातीच्या लोकांनाच फायदा मिळतो व नंतर सामील होणाऱ्या सर्वच लोकांना नुकसान सोसावे लागते म्हणून अशा योजना जरी तुमचा जवळचा मित्र किंवा अगदी नातेवाईक घेऊन आला तरी त्याला नाही म्हणायला शिका हाच भविष्यात होणाऱ्या नुकसानीला टाळण्याचा एकच मार्ग आहे. एक लक्षात ठेवा जगात अशी कोणतीही योजना नसते कि जी तुम्हाला अल्प काळात श्रीमंत बनवू शकेल.शेअर बाजारातील डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग आदी मोहांपासून दूर रहा.डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून झटपट पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते पण एक लक्षात ठेवा कि हा एक प्रकारचा सरकारमान्य जुगारच आहे व जुगार खेळून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, जुगार चालवणारा मात्र श्रीमंत होतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून कधीतरी अल्प काळात भरपूर फायदा होऊ शकतो मात्र तो एकदा का मिळाला कि याचे एकप्रकारे व्यसनच लागते, जे सुटता सुटत नाही व मग यात मिळालेला फायदा तर जातोच परत मुद्दलहि जाते, येथे लाखाचे बारा हजार होणे हि म्हण तंतोतंत लागू पडते.लवकर सुरुवात करा:एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कि शेअर बाजारातून फक्त दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारालाच उत्तम प्रकारचा फायदा हमखासपणे मिळत असतो म्हणून गुंतवणूकदार व्हा, ट्रेडर होऊ नका. सर्वसामान्य माणसासाठी म्युचुअल फंड हे शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे.शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेळ महत्वाची नसून तुम्ही किती काळ नियमीत गुंतवणूक करत रहाता हे महत्वाचे असते. नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे सरासरीचा फायदा होतो. चक्रवाढीची ताकद हि एक जादूच आहे असे समजा, यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम दीर्घ काळानंतर अत्यंत वेगाने वाढू लागते हे लक्षात ठेवा. म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतील गुंतवणूक हि नियमीतपणे व दिर्घ मुदतीसाठीच करत रहावयास हवी. गुंतवणूक करतानाच काळजी घ्या, तुमची उदिष्ठ लक्षात ठेवा, तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेचे पुन:रअवलोकन करा, आणि महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज शेअर बाजारावर केल्या जाणा-या टीका टिपणीला फार महत्व देऊ नका. तुमच्या भावना काबूत ठेवावयास शिकले पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यावर ठाम रहा. म्हणूनच जर तुम्ही अजून गुंतवणूकीला सुरुवात केली नसेल तर लगेचच वेळ फुकट न घालवता सुरुवात करा. |
विमा हि गुंतवणूक नाही:
एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि जीवन विमा व गुंतवणूक हे पूर्णतः स्वतंत्र विषय आहेत याची गल्लत करू नका. विमा अत्यावश्यकच आहे परंतु तो गुंतवणूक म्हणून समजू नका. विमा फक्त टर्म इन्शुरन्स या प्रकारचाच घेतला पाहिजे.
देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणलेलीआहेत. अशी केलेली गुंतवणूक किमान ५ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही, तसेच दर वर्षी किमान ५ वर्ष हप्ते भरावे लागतात. असेच अशा योजनेत अनेक प्रकारचे चार्जेस असतात ते समजून घेतलेत तर तुम्ही यात कधीही गुंतवणूक करणार नाही. कारण हे चार्जेस सारा फायदा खाऊन टाकतात. यातील चार्जेसवसुलीसाठी तुमची युनिट्स कमी होतात.
म्युच्युअल फंडात मात्र केव्हाही गुंतवणूक करता येते व केव्हाही काढता येते. तसेच गुंतवलेली संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. यातील सर्वमिळून चार्जेस हे २.५% पेक्षा जास्त नसतात. युनिट्स पैसे काढल्याशिवाय कधीही कमी होत नाहीत. गरजेचेवेळी ५ दिवसात खात्यात पैसे जमा होतात. फक्त फायद्यात असताना गुंतवणूक काढण्याचे पथ्थ पाळणे हिताचे असते.
जर आपला अकाली मृत्यू झाला तर आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा हा प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे. मात्र तो टर्म इन्शुअरन्स स्वरूपात घेणे हे फायदेशीर असते. टर्म इन्शुअरन्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला वार्षिक रु.७५०० मध्ये रु.५० लाखाचा विमा मिळतो. असा टर्म इन्शुअरन्स घेऊन बाकी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हेच ग्राहकाच्या हिताचे असते. म्युच्युअल फंड व टर्म इंशुरन्स चे एकत्रीकरण करुन विमा संरक्षण व गुंतवणूक वृध्दी असे उदिष्ट साध्य करता येऊ शकते व तेच फायदेशीर असते.
कोणतीही गुंतवणूक जर दीर्घ काळासाठी केली तर चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या व्याजाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. म्युचुअल फंडाच्या अनेक योजनांनी गेल्या २५ वर्षात सरासरी २०% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिलेला आहे, म्हणूनच काही योजनेत १९९५/९६ सालात ज्यांनी रु.१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली होती त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य रु.५० लाख ते रु.१ कोटी ३५ लाख इतके झालेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गेले २५ वर्षे नियमित दर महा रु.५००० एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांची आजपर्यंत एकूण गुंतवणूक रु.१५ लाख इतकी झालेली आहे मात्र त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य सुमारे रु.३ कोटी ५० लाख इतके झालेले आहे. म्हणून गुंतवणूक करताना दीर्घ कालीनच विचार केला पाहिजे. बाजारात तेजी नंतर मंदी व मंदी नंतर परत तेजी हि आवर्तने चालूच असतात. मात्र शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत दीर्घ काळात तेजी मंदीवर मात करून उत्तम परतावा देण्याची ताकद असते हे लक्षात ठेवले पाहिजे.
तुम्हाला जर आयकर कलम ८०-सी चा फायदा मिळण्यासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर जीवन विमा, ५ वर्षांची बँक ठेव, पी.पी.एफ. याचेपेक्षा म्युचुअल फंडाच्या Equity Savings Schemes चा आपण विचार केला पाहिजे कारण यातून जास्त परतावा तर मिळतोच परत तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे काढण्याची सुविधासुद्धा उपलब्ध असते.