गुंतवणुकीचे पर्याय
एक रकमी गुंतवणुक
म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत तुम्ही एक रकमी किंवा एसआयपी माध्यमातूनही गुंतवणूक करू शकता. समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भुत असते व म्हणूनच अशा योजनेत दिर्घकाळ म्हणजे किमान ५ वर्षे ते २० वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करावी. या प्रकारचे योजनेतील निधीपैकी किमान ८०% व जास्तीत जास्त १००% रक्कम ही निरनिराळ्या कंपन्याचे शेअर्स मध्ये गुंतवली जाते व उर्वरित रक्कम ही निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात बाजाराचे काळाप्रमाणे गुंतवली जाते. म्युचुअल फंडाच्या ओपन एन्डेड योजनेत केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढूनही घेण्याची सुविधा उपलब्ध असते. गुंतवणूक करताना वृद्धी व लाभांश असे दोन पर्याय उपलब्ध असतात. लाभांश मध्ये पे-आउट व पुनर्गुंतवणूक असे दोन पर्याय असतात, तुमच्या गरजेनुसार याची निवड करावी. आपण एक रकमी करतना प्रथम खाते सुरु कताना किमान रु.५००० व जास्तीत जास्त कीतीही रक्कम गुंतवता येते, एकदा खाते उघडून झाले कि नंतर योजनेच्या नियमानुसार किमान रु.५०० ते रु.१००० अश्याप्रकारे कितीही वेळा कितीही रक्कम गुंतवता येते. त्याचप्रमाणे पैसे काढताना किमान रु.१००० किंवा संपूर्ण रक्कम अशी केव्हाही काढता येते. थोडक्यात सांगावयाचे झाले तर बँकेच्या बचत खात्याप्रमाणे म्युचुअल फंडाच्या कोणत्याही ओपन एन्डेड योजनेत पैसे भारता किंवा काढता येतात. फरक एवढाच असतो कि म्युचुअल फंडाच्या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य रोजच बाजारातील चढ उतारानुसार कमी जास्त होत असते. मात्र एक गोष्ट लक्षात ठ ठेवली पाहिजे कि दीर्घ मुदतीत शेअरबाजार हा वाढतच असतो. म्हणून दीर्घ मुदतीत सर्वाधिक फायदा मिळतो, अल्प मुदतीत मात्र मोठा नफा किंवा मोठे नुकसानही होऊ शकते.
एक रकमी गुंतवणूक कोणी करावी?
ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त रक्कम असेल व ती किमान ५ वर्षे किंवा अधिक काळ आपल्याला लागणार नसेल अशा कोणत्याही व्याकीने म्युचुअल फंडात गुंतवणूक करावी. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची पूर्ण माहिती करून घ्यावी. बाजारात मोठी मंदी आली तर किती प्रमाणत नुकसान होऊ शकते तेही समजून घेतले पाहिजे. जर मंदी आली तर तुमची २ ते ३ वर्षे थांबण्याची तयारी असली पाहिजे. म्युचुअल फंडाच्या योजनेतून सर्वसाधारणपणे जो महागाईचा वार्षिक सरासरी दर असतो त्यात देशाच्या जी.डी.पी.च्या वार्षिक वाढीचा सरासरी दर मिळवला असता जी संख्या येते तेवढा तरी परतावा मिळत असतो. आपल्या देशात स्वातंत्र्यापासून पाहिल्यास महागाईचा दर हा ७% आहे आणि सध्या जी.डी.पी.चा दर ७% आहे म्हणूनच म्युचुअल फंडाच्या समभाग आधारित योजनेतून सरासरी वार्षिक १४% किंवा अधिक दराने परतावा मिळू शकतो. म्हणूनच जेव्हा केव्हा गुंतवलेले पैसे काढावयाचे असतील तर किमान वार्षिक १४% चक्रवाढ दराने परतावा मिळत असेल तेव्हाच पैसे काढणे योग्य होते. ज्यांनी १९९५ साली म्युचुअल फंडाचे योजनेत एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्याचे १० ऑक्टोबर २०१८ रोजीचे मूल्य रु.४० लाख ते रु.एक कोटी चाळीस लाख एवढे, योजनेच्या स्वरूपानुसार व योजनेतील जोखीमिनुसार, झालेले आहे. मात्र अशी एक रकमी गुंतवणूक गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठीच करावी. थोडक्यात एकरकमी गुंतवणूक करून त्यात जसे जमेल तशी नियमितपणे काही रक्कम दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिले तर एक मोठी संपत्ती निर्माण करता येऊ शकते.
याचप्रमाणे ज्या व्यक्तींना निवृतीनंतर किंवा अन्य कोणत्याही कारणाने एक रकमी रक्कम मिळते व त्या रकमेवर जर तुम्हाला दर महिना/त्रैमासिक/वार्षिक स्वरुपात नियमित पैसे मिळावे असे वाटत असते त्यांनी एक रकमी गुंतवणूक करून लाभांश पे-आउट हा पर्याय स्वीकारून गुंतवणूक करावी.
एस.आय.पी. माध्यमातून नियमितपणे गुंतवणूक करणे
समभाग आधारित कोणत्याही योजनेत नियमित स्वरुपात दर महीना किंवा त्रैमासिक दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे हा संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे बाजारात तेजी असतानाही गुंतवणूक केली जाते तसेच जेव्हा मंदी असते तेव्हाही गुंतवणूक सुरु राहते, यामुळे सरासरीचा फायदा मिळतो. उदा. ज्यांनी गेले २० वर्षे नियमित दर महीना रु.१०,०००/- (रुपये दहा हजार मात्र) गुंतवणूक केली आहे त्यांची एकूण गुंतवलेली रक्कम झाली रु.२४ लाख, व दि.१० ऑक्टोबर २०१८ चे मूल्य आहे किमान रु.४ कोटी व जास्तीत जास्त आहे रु.८ कोटी. समभाग आधारित योजनेतून मिळणारा परतावा हा योजनेच्या स्वरूपानुसार बदलता असतो. मात्र सर्वसाधारणपणे समभाग आधारित योजनेतून गेल्या २०-२५ वर्षात वार्षिक चक्रवाढ २०% ते २५% दराने परतावा मिळालेला आहे. मात्र आपण गुंतवणूक करताना हा परतावा साधारण १५% वार्षिक चक्रवाढ दराने मिळू शकेल अशा अपेक्षेने गुंतवणूक करावी. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची सर्व माहीती पूर्णपणे समजून घ्यावी, आपले वय, उप्तन्नाचे साधन, जोखीम स्वीकारण्याची तयारी इ. बाबी नुसार योजनेची निवड करावी व गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठीच करावी. सर्वसाधारणपणे गुंतवणुकीचा कालावधी हा किमान ५ वर्षे किंवा जास्त असावा. जेवढा कालावधी जास्त तेव्हढा चक्रवाढ पद्धतीने मिळणारा फायदा जास्त असतो.