अल्प व मध्यम मुदतीसाठी कर्जरोखे आधारीत (Debt Fund) योजना:
अशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिवस ते ६ महिने एवढ्या काळासाठी गुंतवणूक करणे योग्य होते. ज्याच्या बचत व चालू खात्यात जास्तीची रक्कम असते त्यानी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. तसेच पतसंस्था, ट्रस्ट,सोसायटी, कंपन्या, व्यापारी ज्याच्या चालू खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल त्याप्रत्येक वेळी या योजनेत (लिक्वीड फंड) गुंतवणूक करुन जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी घ्यावी.