माझ्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले आहे म्हणून मी एसआयपी बंद करू का?
गेले काही दिवस मला ठाकूर फायनान्शियल सर्व्हिसेसच्या गुंतवणूकदारांचे अनेकवेळा फोन येत असतात त्यांचे म्हणणे असते कि त्यांना त्यांची चालू असणारी एसआयपी बंद करावयाची असते. एसआयपी बंद करण्याचे कारण काय आहे असे विचारले कि बहुमतांशी गुंतवणूकदारांचे म्हणणे असते कि आमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होत आहे मी जेवढे पैसे गुंतवले आहेत त्यापेक्षासुद्धा गुंतवणुकीचे मूल्य कमी झालेले आहे. मी जर हेच पैसे बँकेच्या आर.डी. मध्ये गुंतवले असते तर असे झाले नसते. त्यांचे हे म्हणणे १००% बरोवर आहे, बँक किंवा पोस्टाच्या आर.डी. मध्ये पैसे कधीच कमी होत नसतात. पण म्हणून चालू असलेली एसआयपी बंद करणे हा निर्णय योग्य होईल काय? आता आपण एका चांगल्या योजनांची कामगिरी पाहूया:
Franklin India Bluechip Fund – हि योजना लार्ज कॅप प्रकारातील आहे. हि योजना १ डिसेंबर १९९३ रोजी सुरु झाली, या योजनेत ज्यांनी सुरुवातीपासून दर महिना रु.१००० ची एसआयपी सुरु केली होती व ती जर आजपर्यंत चालू ठेवली असती तर एकूण गुंतवणूक झाली असती रु.३,०३,०००/- आणि त्या गुंतवणुकीचे ११/०२/२०१९ चे मूल्य आहे रु.५८,५६,५५०/- वार्षिक सरासरी चक्रवाढ दराने मिळालेला परतावा २०.२५%
आता या योजनेची आपण वाटचाल पाहूया.
१/१२/१९९४ गुंतवणूक १२००० मूल्य १८२६८ फायदा आहे
१/१२/१९९५ गुंतवणूक २४००० मूल्य २३४१३ नुकसान झाले आहे.
१/१२/१९९६ गुंतवणूक ३६००० मूल्य २८३१३ नुकसान झाले आहे
१/१२/१९९७ गुंतवणूक ४८००० मूल्य ५२००४ फायदा आहे
१/१२/१९९९८ गुंतवणूक ६०००० मूल्य ८०४३३ फायदा आहे
यानंतर कधीही नुकसान नाही
१/१२/२००३ गुंतवणूक १२०००० मूल्य ५२२६७५ फायदा आहे
१/१२/२००८ गुंतवणूक १८०००० मूल्य १२१५४४० फायदा आहे
१/१२/२०१३ गुंतवणूक २४०००० मूल्य ३१४०२३० फायदा आहे
१/१२/२०१८ गुंतवणूक ३००००० मूल्य ५९२२१४० फायदा आहे
अशी प्रत्येक प्रकारातील (लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, संतुलित इ. प्रकारातील) अनेक योजनांची मी उदाहरणे देऊ शकतो. सगळीकडे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात हेच दिसून येईल.
एक लक्षात ठेवले पाहिजे कि दीर्घ मुदतीत म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही चांगल्या योजनेतून फायदा हा होतच असतो मात्र मधल्या मंदीच्या काळात नुकसानही होत असते. तेजी मंदीची आवर्तने बाजारात नेहमीच चालू असतात कधी कधी मंदीचा कालावधी जेव्हा वाढतो तेव्हा आपल्याला जास्त काळ नुकसान होत असते. बाजारात साधारणपणे ८ किंवा ९ वर्षांची सायकल असते यातील कोणतीतरी ३ वर्षे हि भरपूर फायदा मिळवून देणारी असतात. जर ती आपल्या वाट्याला सुरुवातीला आली तर पुढे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते मात्र जर तीच पहिली ३ वर्षे मंदीची आली तर फायद्यात येण्यासाठी जास्त काळ वाट पहावी लागू शकते. मात्र जेव्हा बाजारात मंदीनंतर परत तेजी येते तेव्हा फायदासुद्धा जास्त होतो कारण आपण मंदीच्या काळात गुंतवणूक नियमित करत राहिल्यामुळे आपल्याला जास्त युनिट्स प्राप्त होत असतात आणि मग तेजीच्या काळात जेव्हा एनएव्ही वाढते त्यामुळे आपला जास्त फायदा होतो.
बँक किंवा पोस्टाच्या आर.डी. मध्ये नुकसान होत नाही हे जरी खरे असले तरी त्यातून वार्षिक ७ किंवा ८% पेक्षा जास्त फायदासुद्धा मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे. अधिक मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो तो वेगळा.
म्युच्युअल फंडाच्या योजनेत तुम्ही कायमपणे कधीच फायद्यात राहू शकत नाही मात्र यातून तुम्हाला दीर्घ मुदतीत किमान १२ ते १५% वार्षिक दराने परतावा तो सुद्धा चक्रवाढ दराने मिळण्याचा हेतू साध्य होऊ शकतो हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.
गरज आहे तो थांबण्याची “श्रद्धा और सबुरी” आखिरकार सबुरीका फल हमेशा मिठाही होता है.
तुम्ही चालू असणारी एसआयपी बंद करायला सांगितलीत कि आम्हाला ती बंद करणे बंधनकारक आहे मात्र अशा वेळी आम्ही जे सांगतो ते तुम्ही ऐकलेत तर तुमचा निश्चित फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा.
हा माझा ताजा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर जरूर माझ्या नावासकट पुढे पाठवा. Facebook आणि Twitter वर नावासकट शेअर करण्याश हरकत नाही.
Sadanand Thakur,
Thakur Financial Services,
15 Years experienced Mutual Fund Distributor
Cell: 9518752605 or 9422430302
Email: Sadanand.thakur@mutualfundmarathi.com
Visit us: https://www.mutualfundmarathi.com