स्मॅाल कॅप योजना (लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते)
लहान आकाराच्या भांडवली कंपन्यांमधील गुंतवणूक (Small Cap Schemes ) या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नावाप्रमाणेच लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. लहान आकाराच्या कंपन्यांची वार्षिक सरासरी वाढ हि जास्त होत असते, मात्र या कंपन्या बुडण्याची वा नुकसानीत जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्याच प्रमाणे या कंपन्यांची उपलब्ध असणारी सर्वच माहिती तपासण्याची सुविधा उपलब्ध नसते थोडक्यात पारदर्शकता कमी असते. यामुळे अशा योजनेत सर्वात जास्त जोखीम असते आणि त्यामुळेच दीर्घ मुदतीत सर्वात जास्त परतावा मिळू शकतो. अनेक स्मॅाल कॅप योजनेतून सरासरी ३०% पेक्षा जास्त परतावा चक्रवाढ पद्धतीने मिळालेला आहे. मात्र मागील कामगिरी पाहून या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करू नये कारण जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा अशा कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती सर्वात जास्त प्रमाणात खाली येतात. स्मॉल कॅप प्रकारातील योजनेत २००८-०९ या वर्षात जेव्हा मोठी मंदी होती तेव्हा या योजनेतील गुंतवणुकीचे मूल्य ६५% इतके कमी झालेले होते. म्हणजे जेव्हा जानेवारी २००८ मध्ये बाजार उच्चतम पातळीवर होता तेव्हा ज्यांनी रु. १,००,०००/- गुंतवणूक केली होती त्याचे मूल्य २००९ साली फक्त रु.३५,०००/- एवढे कमी झालेले होते. नवीन गुंतवणूकदारांनी शक्यतो स्मॉल कॅप प्रकारातील योजनेत प्रथमच गुंतवणूक करू नये. जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक सुरु करावयाची असेल तर प्रथम आपली जोखीम घेणायची क्षमता तपासून पहा. त्यानंतर योजेचे काही महत्वाचे रेशो तपासून घ्या. योजनेचा बीटा, अल्फा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो हे रेशो तपासले पाहिजेत. तसेच योजनेमध्ये कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते आणि त्याच बरोबर योजनेतील कमीतकमी व जास्तीत जास्त किती प्रमाणात विविध प्रकारच्या कर्ज रोख्यात गुंतवणूक केली जाते हेही तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे योजनेचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याने अन्य कोणत्या योजनांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले आहे, त्या योजनांची कामगिरी कशी झालेली आहे हे सुद्धा तपासले पाहिजे. तसेच योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य किती आहे, फंड घराणे कोणते आहे, त्या फंड घराण्याचा एकूण AUM किती आहे, किती योजना त्यांच्या बाजारात उपलब्ध आहेत, त्या अन्य योजनांची कामगिरी कशी आहे, मंदीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती नुकसान झालेले आहे व तेजीच्या कालखंडात जास्तीत जास्त किती फायदा झालेला आहे, योजनेचा पोर्टफोलिओ तपासून कोणकोणत्या शेअर्समध्ये किंवा अन्य सिक्युरिटीज मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे या व अन्य काही गोष्टी तपासूनच आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. हे सारे न तपासता जे तुम्ही फक्त मागील एक ते तीन वर्षातील मागील कामगिरी तपासून जर म्युच्युअल फंडातील एखाद्या योजनेत गुंतवणूक केली तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. योजनेसंबंधी सर्व बारकावे नियमितपणे तपासणे हे आमच्या सारख्या म्युच्युअल फंड वितरकाचे कामच असते. म्हणून गुंतवणूक करताना योग्य त्या माहितगार व्यक्ती मार्फत गुंतवणूक करणे गुंतवणूकदाराच्या अंतिम हिताचे असते. आणि यासाठीच आम्हाला कमिशन मिळत असते जे सरासरी, समभाग आधारित योजनेतून वार्षिक ०.७५% ते १% या दरम्याने असते. तर कर्ज रोखे आधारित योजनेतून हेच ०.०५% ते ०.७५% या दराने मिळत असते. यातूनच आमचे ऑफिसचे सारे खर्च पगार, भाडे, वीज बिल, टेलिफोन बिल, प्रवास खर्च, GST भागवून उरणारी रक्कम हा नफा व त्यातून आयकर भरावा लागतो. हा आमचा व्यवसाय आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कि गुंतवणूक कोणाकडून करावयाची कि डायरेक्ट करावयाची. हे सारे समजून चांगल्या जाणकार व्यक्ती मार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तर तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
स्मॉल कॅप योजना या प्रकारातील काही चांगल्या कामगिरी करणाऱ्या योजनांची मागील कामगिरी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
(टिप : स्मॉल कॅप योजनांची कामगिरी पाहण्यासाठी नवीन पाना वरील (https://shthakur.com/topFund/) Fund Category या विभागातील Equity या कॅटेगरीची निवड करा, नंतर Fund Sub Category या विभागातील Small Cap या सब कॅटेगरीची निवड करा, नंतर Product Type मधील Growth हा पर्याय निवडा आता तुमच्या समोर मिड कॅप प्रकारातील आघाडीच्या योजनांची मागील कामगिरी दिसू लागेल).